पोस्ट्स

एप्रिल, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

हायटेक हेरगिरी करणारे जहाज मालदीवच्या समुद्रात

इमेज
चिनचे 4500 टन वजनाचे हायटेक हेरगिरी करणारे जहाज पुन्हा एकदा मालदीवच्या समुद्रात आले आहे. दोन महिन्यांनंतर या द्विपसमूह राष्ट्राच्या विविध बंदरांवर जाऊन एका आठवडय़ानंतर हे जहाज पुन्हा मालदीवमध्ये आले आहे.   जियांग यांग होंग 03 हे जहाज गुरुवारी सकाळी थिलाफुशी औद्योगिक द्विपच्या बंदरावर उभे होते. हिंदुस्थान आणि अमेरिकेने या जहाजाच्या हेरगिरी केल्यावरून चिंता व्यक्त केली आहे. परंतु मालदीव सरकारने या चिनी हेरगिरी जहाजाच्या पुन्हा येण्याचा अद्याप खुलासा केला नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रपती मुइझ्झू यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मालदीव आणि चीन या दोन देशांमधील संबंध आणखी दृढ झाले आहेत. चीन हेरगिरी जहाजसंबंधी मालदीवकडून स्पष्टीकरण देण्यात आले. जहाज आता विशेष आर्थिक क्षेत्र (ईईझेड) ला पार केल्यानंतर परत आले आहे. जियांग यांग होंग 03 जानेवारीपासून मालदीव क्षेत्रात किंवा त्यांच्या जवळपास सक्रिय आहे. जहाज याआधी 23 फेब्रुवारीला मालेच्या पश्चिम भागात जवळपास 7.5 किमी दूर थिलाफुशी बंदरावर थांबले होते. एक महिना लोटल्यानंतर हे जहाज 22 फेब्रुवारीला मालदीवच्या सम

चित्रपट निर्माता अनेक कुटुंबांचा पालक असतो

इमेज
चित्रपट निर्माता अनेक कुटुंबांचा पालक असतो मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ मराठी चित्रपटसृष्टीचा आधार म्हणजे निर्माता एक चित्रपट निर्माता अनेक कुटुंबांचा पालक असतो. आज आपल्या पालकांचे अस्तित्व टिकवणे प्रत्येक कलाकर्मीयांचे कर्तव्य आहे. यासाठी आपण दादासाहेब फाळके यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी हिंदमाता चौक, दादर स्टेशन (पूर्व) जवळ, मुंबई येथे दि. 30 एप्रिल 2024 रोजी सकाळी 9 ते 1 पर्यंत उपस्थित रहावे  करोनाच्या महामारी पासून चित्रपट व्यवसायात प्रचंड मंदी आली आहे त्यामुळे प्रत्येक कलाकर्मी हतबल झाला आहे. आपण अनुदान अपात्र मराठी चित्रपटांना पात्र करून घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे विनंती करत आहोत. ज्या मराठी चित्रपटाचे अनुदान नाकारले आहे त्या निर्मात्यांनी अपात्रेचे पत्र घेऊन हजर रहावे  चित्रपट व्यवसायातील अनेक कलाकर्मी आपल्याला सपोर्ट देण्यासाठी येत आहेत. तुम्हीही या असे अहवान  अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळ यांच्या वतीने करण्यात आले आहे अशी माहिती मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर यांनी दिली 

अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा चित्रपट २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला

इमेज
अनेक आंतरराष्ट्रीय महोत्सवात गौरवलेला परंपरा चित्रपट २६ एप्रिलला प्रेक्षकांच्या भेटीला परंपरा" हा चित्रपट २६  एप्रिल रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर लाँच करण्यात आला असून, उत्तम अभिनय, श्रवणीय संगीत, आशयघन कथानक असलेल्या या चित्रपटाविषयी या ट्रेलरने उत्सुकता निर्माण केली आहे.  हरीश कुमार आणि अँड्र्यू रिबेलो  यांच्या स्टार गेट मूव्हीज या निर्मिती संस्थेअंतर्गत "परंपरा" या चित्रपटाची निर्मिती केली असून फैजल पोपरे हे या चित्रपटाचे सहनिर्माते आहेत. तर दिग्दर्शन प्रणय निशाकांत तेलंग यांचे आहे. अभिनेते मिलिंद शिंदे आणि अभिनेत्री वीणा जामकर यांच्यासह प्रकाश धोत्रे, अरुण कदम, नम्रता पावसकर, किशोर रावराणे, जयराज नायर, रोहित चव्हाण, प्रशांत नेमण, भूषण घाडी, मास्टर मच्छिंद्र, दिवंगत अभिनेते जनार्दन परब यांचा दमदार अभिनय हे या चित्रपटाचं वैशिष्ट्य आहे. चित्रपटाची पटकथा प्रणय निशाकांत तेलंग आणि संजय सावंत यांची असून छायाचित्रण निशा तेलंग यांनी केले आहे. मंगेश कांगणे यांनी लिहिलेल्या गीतांना आनंद मेनन यांचे मधुर संगीत लाभले आहे. श्रीकांत तेलंग यांनी संकलक म्