उल्हासनगर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील दोनशे ते अडीचशे आशा स्वयंसेविका महिला यांना मनसे संघटनेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त पहिल्यांदाच मिळाले सानुग्रह अनुदान
उल्हासनगर महानगरपालिकेच्या क्षेत्रातील दोनशे ते अडीचशे आशा स्वयंसेविका महिला यांना मनसे संघटनेच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त पहिल्यांदाच मिळाले सानुग्रह अनुदान उल्हासनगर महानगरपालिका क्षेत्रात दोनशे ते अडीचशे अशा स्वयंसेविका , ऊन ,वारा ,पाऊस, सहन करत घरोघरी जाऊन आपले कर्तव्य बजावत असतात परंतु त्यांची दखल उल्हासनगर महानगरपालिकेने कधीही घेतलेली नाही कोरोना काळात स्वतःची काळजी न घेता नागरी सुविधासाठी त्यांनी उत्तम प्रकारे आपले कर्तव्य बजावले होते त्यांच्या या कार्याचे कौतुक सुद्धा केले गेले होते. आशा स्वयंसेविका यांनी सुरुवातीच्या अनेक वर्षापासून उल्हासनगर महानगरपालिकेकडे दिवाळीनिमित्त सानुग्रह अनुदान मिळावा याकरिता मागणी केली होती अनेक वेळा आंदोलन सुद्धा केले होते परंतु महानगरपालिकेने आज पर्यंत दखल न घेतल्याने आशा स्वयंसेविका यांनी आज दिनांक 20 नोव्हेंबर 2023 ...