पोस्ट्स

9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

शांतीदूत विश्वकर्मी डॉ विश्वनाथ कराड यांच्याकडून मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा गौरव.

इमेज
*शांतीदूत विश्वकर्मी डॉ विश्वनाथ कराड यांच्याकडून मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा गौरव.* पुणे ( विशेष प्रतिनिधी) भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा वारसा जपण्यात योगदान असणारे, महाराष्ट्राभूषण व्यक्तिमत्व, तत्वज्ञानी, विश्वकर्मी शांतीदूत,पाच विद्यापीठाचे संस्थापक,एम आय टीचे संस्थापक डॉ प्रा विश्वनाथ दा कराड यांनी कोथरुड शैक्षणिक संकुलात लातूर चे लोकप्रिय, संसद रत्न,कार्यसम्राट माजी खासदार,प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा स्मृती चिन्ह आणि मानाची शाल देऊन यथोचित गौरव केला. डॉ विश्वनाथ कराड यांनी माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी २०१४ ते २०१९ या काळात केलेल्या कामाचे कौतुक करुन उच्च शिक्षित खासदार म्हणून अनेक केंद्र सरकार च्या विकास कामाच्या योजना आणि विशेष म्हणजे लातूर ला आणि नांदेड ला NEET परीक्षा केंद्र आणि पासपोर्ट सेवा केंद्र आणि रेल्वे बोगी कारखाना आणि सुपर स्पेशिलिटी हॉस्पिटल असे अनेक लोकउपयोगी काम केल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पुढील काळासाठी डॉ सुनील गायकवाड यांना शुभेच्छा देऊन अत्यंत आनंदानी विद्यापीठ कॅम्पस मधे गौरव करुन शुभेच्छा दिल्या. शिक्षक दिनाच्

ऑगस्टपर्यंत पिण्याचे मुबलक पाणी; अहमदनगर जिल्ह्यातील धरणांत 38 टक्के साठा

इमेज
ऑगस्टपर्यंत पिण्याचे मुबलक पाणी;   अहमदनगर जिल्ह्यातील धरणांत 38 टक्के साठा  अहमदनगर; पावसाळा लांबल्यामुळे जनतेचे लक्ष आता साहजिकच जिल्ह्यातील धरणांच्या पाणीसाठ्याकडे वळाले आहे. आजमितीस धरणांत 18 हजार 783 दलघफू इतका पाणीसाठा उपलब्ध आहे. एकूण क्षमतेच्या 37.42 टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. मुळा धरणात 9 हजार 350 व भंडारदरा धरणात 5 हजार 697 दलघफू इतका पाणीसाठा शिल्लक आहे. पाऊस लांबला तरीही, या दोन मोठ्या धरणांवरील पाणीयोजनांना ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी पाणी पुरणार आहे. जिल्ह्यात मध्यम व मोठे असे एकूण आठ धरणे आहेत. त्यांची एकूण पाणीसाठवण क्षमता 50 हजार 188 दलघफू इतकी आहे. गेल्या तीन-चार वर्षांपासून जिल्हाभरात सरासरीपेक्षा अधिक पाऊस झालेला आहे. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात अधिक पाऊस झाल्याने जिल्हाभरातील लहान-मोठी धरणे ओव्हरफ्लो झाली. धरणांच्या लाभक्षेत्रात देखील चांगला पाऊस झाल्यामुळे भूजलपातळी देखील कमालीची वाढलेली आहे. त्यामुळे गावागावांतील विहिरींची पाणीपातळी देखील वाढलेली होती. त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांसाठी आवर्तनाची म्हणावी अशी गरज लागली नाही. त्यामुळे गेल्या दोन-तीन वर्

पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहणार

इमेज
पुणे आकाशवाणीचा वृत्त विभाग सुरूच राहणार         सर्वाधिक श्रोते असलेल्या आकाशवाणीच्या पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाकडून प्रसारित होणारी बातमीपत्रे छत्रपती संभाजीनगर केंद्राकडे सोपविण्याच्या निर्णयाला अखेर गुरुवारी प्रसारभारतीने स्थगिती दिली.   पुणे : आकाशवाणी पुणे केंद्राची स्थापना स्वातंत्र्याच्या 5-6 वर्षानंतर म्हणजेच 1953 रोजी झाली. गेल्या 40 वर्षापासून या केंद्रावरुन नियमित बातमीपत्र प्रसारित होत होत्या. आकाशवाणीची बातमी म्हणजे विश्वास, आकाशवाणीची बातमी म्हणजे खात्री, आकाशवाणीची बातमी म्हणजे इम्पॅक्टची हमी असं चित्र आजही आहे. पुढील आदेशापर्यंत सध्याचीच व्यवस्था कायम राहील, असे प्रसारभारतीच्या आदेशात म्हटले आहे. प्रादेशिक वृत्त विभागाकडून प्रसारित होणारी बातमीपत्रे छत्रपती संभाजीनगर केंद्राकडे सोपविण्याच्या निर्णयाला होणारा विरोध पाहता त्या पार्श्वभूमीवर प्रसारभारतीने तूर्तास तरी स्थगितीचा निर्णय घेतला आहे. प्रसारभारतीतर्फे गुरुवारी दुपारी याबाबतचे आदेश काढण्यात आले. या आदेशात आकाशवाणी पुणे केंद्रावरून सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी प्रसारित होणारे बातमीपत्र तस

सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे संचालक राजकुमार शर्मा यांचा वाढदिवस उल्हासनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा

इमेज
सिमरन सेवा प्रतिष्ठान एनजीओ चे संचालक राजकुमार शर्मा यांचा वाढदिवस उल्हासनगर मध्ये मोठ्या उत्साहात साजरा उल्हासनगर: राजकुमार शर्मा यांच्या वाढदिवसानिमित्त लहान मुलांना वह्या पेन आणि खाऊ वाटप करण्यात आला तसेच गरजवंत महिलांना राशन किट वाटप करण्यात आली उल्हासनगर कॅम्प नंबर ५ मधील श्री स्वामी शांती प्रकाश वृद्धाश्रम या ठिकाणी वृद्ध नागरिकांसोबत केक कापून राजकुमार शर्मा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला यावेळी जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनल चे संपादक हरी आल्हाट , जनहित स्वयंसेवी संस्थेच्या महाराष्ट्र अध्यक्षा ज्योती पवार, प्रिया समाज विकास सामाजिक संस्था च्या संस्थापिका सौ प्रिया गायकवाड, प्रिया समाज विकास सामाजिक संस्थाच्या खजिनदार सौ सुरेखा तळेकर तसेच जनहित न्यूज महाराष्ट्र चे कार्यकारी संपादक हर्षद पठाडे, तसेच अनेक महिला व बालके उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

माजी नगरसेवक . सुभाष साळुंके यांनी वाढ दिवासानिमित्त खासदार मा. डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या हस्ते अद्यावत "संवाद रुग्णवाहिका"चे लोकार्पण केलें

इमेज
माजी नगरसेवक . सुभाष साळुंके यांनी  वाढ दिवासानिमित्त खासदार मा. डॉ.श्रीकांतजी शिंदे यांच्या हस्ते अद्यावत "संवाद रुग्णवाहिका" चे  लोकार्पण केलें  अंबरनाथ : कोरोना महामारीच्या दुसऱ्या जीवघेण्या लाटेत अनेकांना ऑक्सिजन अभावी आपले प्राण/जीव गमवावे लागत होते,यावेळी निदान घराच्या घरी किंवा पोस्ट कोव्हिड रूग्णांना ऑक्सिजन पुरवठा याकरिता माजी नगरसेवक –सुभाष साळुंके, यांनी 8 मे 2020 च्या वाढदिवशी 3 ऑक्सिजन concentrator machince लोकसेवेत रुजू केले होते, आतापर्यंत 48 जणाचे प्राण वाचविण्यात यश आले आहे. अंबरनाथमधील नागरीकांना आवश्यक व जनउपयोगी सुविधा देणे च्या दृष्टीने सुभाष साळुंके प्रयत्नशील असतात,त्याच भावनेतून गरजू रुग्णांना व नागरीकांना अत्यावश्याक  वेळी रुग्णवाहिका उपलब्ध करून वेळेवर हॉस्पिटल मध्ये योग्य उपचार होणेकरिता रुग्णवाहिकेची आवश्यकता होती, त्यासाठी संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके यांच्या मागणी नुसार गेले 2 वर्षा पासून प्रयत्न सुरू होते, दि.8 मे 23 रोजी सुभाष साळुंके यांनी आपल्या वाढदिवसानिमित्त   मारुती सुझुकी कंपनीची इको

त्रीलोकनाथ निधी लिमिटेड बँकेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर विजय गायकवाड यांचा वाढदिवस साजरा

इमेज
त्रीलोकनाथ निधी लिमिटेड बँकेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर विजय गायकवाड यांचा वाढदिवस साजरा त्रिलोकनाथ निधी लिमिटेड बँकेचे बोर्ड ऑफ डायरेक्टर व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ठाणे जिल्हा उपाध्यक्ष विजय गायकवाड यांच्या वाढदिवसानिमित्त अंबरनाथ येथील पौराणिक शिवमंदिर या ठिकाणी प्रत्येक वर्षाप्रमाणे याही वर्षी महादेवाचे पूजन करण्यात आले तसेच लहान मुलांना वह्या पेन तसेच खाऊ वाटप करण्यात आला त्रिलोक नाथ निधी लिमिटेड बँकेचे बोर्डऑफ डायरेक्टर विजय गायकवाड हे नेहमीच गोरगरीब, गरजवंत ,दिव्यांग, तसेच अनाथ मुले, विधवा व वृद्ध महिला यांना मदत कार्य करीत आहेत ठाणे जिल्ह्यातील अनेक आश्रम मध्ये जाऊन त्यांनी मदत कार्य केले आहे त्यांच्या या कार्याची कौतुक शहरातील नागरिक करीत आहेत विजय गायकवाड यांच्या कार्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने घेतली असून सध्या त्यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ठाणे जिल्हा उपाध्यक्ष म्हणून पद नियुक्त करण्यात आले आहे  विजय गायकवाड परिवार तसेच त्यांच्या मित्र मंडळी मध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या पद नियुक्ती व वाढदिवसान

उल्हासनगर महापालिके मध्ये भेट देताना उल्हासनगर महापालिकेचे अति आयुक्त जमीर लेंगरेकर, यांचा सत्कार

इमेज
उल्हासनगर महापालिके मध्ये भेट देताना उल्हासनगर महापालिकेचे अति आयुक्त जमीर लेंगरेकर, यांचा सत्कार करताना उल्हासनगर शहर विकास मंच चे अध्यक्ष राजेश फक्के , समाज सेवक दत्तात्रय भाने, पत्रकार  अशोक एफ शिरसाट , हे छायाचित्ररात दिसत आहेत

अकोल्यात गावरान मोहा दारू व देसी दारू वर धाड ,२,०५,५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त

इमेज
अकोल्यात गावरान मोहा दारू व देसी दारू वर धाड ,२,०५,५०० रूपयांचा मुद्देमाल जप्त अकोला जिल्हा मुर्तीजापुर ग्राम लाखपुरी  येथे  ०७ सप्टेंबर २०२२ रोजी पोलिस अधीक्षक जी श्रीधर,यांच्या आदेशाने विशेष पथकानी मूर्तिजापूर तालुक्यातील अवैध धंद्यावर छापा टाकून,गावरान मोहा  हातभटी ची  दारू काढून विक्री करीत असलेल्या ,करण मोहन कौथ्वास,दीपक सुभाष सातकुठे, प्रशांत सुरेश गामोत,सुनील दीपक इंगळे,प्रभुदास वासुदेवराव ढोरे, हे  लाखपुरी या ठिकाणी अवैध रित्या मोहा हातभटी ची दारू बनवताना व विक्री करताना मिळून आले, त्यांच्या जवळून देसी मोहा दारू व दारू बनिवण्याच्या साहित्य असा एकूण १,७२,००० रू चा मुदेमाळ जप्त करण्यात आला, या पैकी एक इसम अर्जुन देविदास कौथ्वस ,हा अवैध रित्या दारू ची वाहतूक करताना मिळून आला,असून त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारू बंदी कायद्या अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे सदर दोन कारवाईत ६ आरोपी विरुद्ध गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून एकूण २,०५,५०० रू  चा मुदेमाळ जप्त करण्यात आला, सदरची कारवाई पोलिस अधीक्षक जी श्रीधर,अप्पर पोलीस अधीक्षक मो