पोस्ट्स

बातमी जनहित/ जनहित न्युज महाराष्ट्र 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग व समग्र शिक्षा विभागाच्या वतीने कार्यशाळा आयोजित

इमेज
उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग व समग्र शिक्षा विभागाच्या वतीने कार्यशाळा आयोजित दि.28/04/2023 उल्हासनगर: दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तींना Online दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत निर्देशप्राप्त झाले  त्याअनुषंगाने आज दिनांक 28/04/2023 रेाजी महापालिका महासभागृह येथे दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID देण्याबाबत दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग व समग्र शिक्षा विभागाच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये उल्हासनगर क्षेत्रातील मनपा शाळा, खाजगी शाळा, अनुदानीत शाळा, विना अनुदानीत शाळांमधील मुख्यध्यापक तसेच दिव्यांग सेवा संस्थांच्या पदधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या मध्ये सुमारे 200 त 250 मुख्यध्यापक व विविध संस्थांचे एन.जी.ओ. उपस्थित होते. श्री. भारत वेखंडे, जिल्हा सम्नवयक, डायट, रहाटोली, तसेच व श्री. नारायण भालेराव यांनी यु.डी.आय.डी. व यु डाईस प्लस बाबत मार्गदार्शन केले आहे. 

कुस्तीपटूंच्या भेटीसाठी प्रियांका गांधी जंतरमंतर वर आंदोलना साठी बसलेल्या कुस्तीपटूंसोबत चर्चा

इमेज
प्रियांका गांधी यांचा कुस्ती पटूंना पाठिंबा,आंदोलनाबाबत चर्चा कुस्तीपटूंच्या भेटीसाठी प्रियांका गांधी जंतरमंतर वर आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंसोबत चर्चा दिल्ली :  बृजभूषण यांच्याविरोधात कुस्तीपटूंचं आंदोलन  भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंची काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत चर्चाही केली. यावेळी महिला कुस्तीपटूंना भावना अनावर झाल्याने प्रियांका यांनी मायेने त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवत त्यांना धीर दिला. जंतरमंतर वर बसलेल्या कुस्तीपटूंच्या धरणे आंदोलनाचा सातवा दिवस आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू आंदोलनासाठी बसले आहेत. बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहे. यावेळी प्रियांका यांनी बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.