चेंढरे ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील सर्वप्रथम क्यु आर कोड घर क्रमांक असलेली ग्रामपंचायत
चेंढरे ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील सर्वप्रथम क्यु आर कोड घर क्रमांक असलेली ग्रामपंचायत रायगड जिल्हा परिषद, अमृतग्राम डिजीटल करप्रणाली अंतर्गत, चेंढरे ग्रामपंचायत ही महाराष्ट्रातील सर्वप्रथम क्यु आर कोड घर क्रमांक असलेली ग्रामपंचायत बनली आहे, महाराष्ट्रामध्ये प्रथमच ग्रामपंचायत चेंढरे ता.अलिबाग जि.रायगड यांनी अमृतग्राम डिजीटल कर प्रणाली द्वारे घरपटटी व पाणीपटटी प्रत्येक घराला दिलेल्या क्यु आर कोड ने मोबाईल अँड्राईड ऍ़प द्वारे वसुली करण्याचा उपक्रम हाती घेतलेला आहे. ग्रामपंचायत आर्थिक दृष्टया सक्षम करण्याचा मुलभूत पाया म्हाणजे करवसुली आहे. घरपटटी व पाणी पटटी वसुलीची पारंपारीक पध्दत तितकीशी प्रभावी पणे राबविता येत नाही तसेच आजचे डिजीटल युग अँड्राईड चा वापर सर्रास पणे करीत आहेत त्याच प्रमाणे कोविड-19 च्या वेळेस नागरीकांना ब-याचश्या गोष्टी घरबसल्या मिळाव्यात आशा अपेक्षा सुध्दा निर्माण झालेल्या आहेत त्या अनुशंगाने सदरची अमृतग्राम डिजीटल करप्राणाली चेंढरे ग्रामपंचायत व रायगड जिल्हा परिषद यांनी विकसीत केलेली असून ती अत्यंत उपयुक्त आहे. सदर करप्रणाली सर्वकष उपयुक्त होण्याच्या