पोस्ट्स

एप्रिल, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

इमेज

मामा आमच्या आईच्या अस्थी मिळतील ना ? पुणे: जगभरात करोनाने थैमान घातलं आहे.या आजाराने आपल्या जवळच्या लोकांना कायमचं गामावल्याने अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.पुणे शहरातही अनेक स्मशानभूमीत करोनामुळे मृत्यू झालेल्या रुग्णावर अंत्यसंस्कार करण्यासाठी रांगा लागल्याचे भीषण चित्र पाहण्यास मिळत आहे.या स्मशानभूमीत काम करणार्‍या कर्मचार्‍यांना दररोज अनेक अनुभवांना सामोरे जावे लागत आहे.असाच एक अनुभव कैलास स्मशानभूमीत काम करणारे ललित जाधव यांनी ‘लोकसत्ता डॉट कॉम’शी बोलताना सांगितलाय.अस्थींमुळे करोना होण्याच्या भीतीने नातेवाईक येत नसल्याने पालिका कर्मचारीच करतायत अस्थी विसर्जन “संध्याकाळची वेळ होती,आम्ही सर्व जण स्मशानात आणले जाणारे मृतदेह विद्युत दाहिनीजवळ एक एक करून ठेवत होतो.तेवढ्यात स्मशानभूमीत एक रुग्णवाहिका दाखल झाली.त्यातील बॉडी आम्ही खाली घेतली.त्या रुग्णवाहिकेच्या बाजूला एक आलिशान चार चाकी गाडी येऊन थांबली.त्या गाडीतून दोन मुलं उतरली.त्यांचं वय साधारण आठ ते दहा वर्ष असेल.ते इकडे तिकडे पाहत होत.अचानक माझ्याकडे येऊन म्हणाले, ही माझी आई आहे.आमच्या मागे आता कोणी नाही.आहो मामा आमच्या आईच्या अस्थी मिळतील ना ओ?,असं म्हणत ती दोन्ही मूलं ढसाढसा रडू लागली.त्यांच रडणं पाहुण मला ही रडू आवरल नाही,” असं जाधव यांनी सांगितलं.“त्या दोन्ही मुलांना जवळ घेऊन आता यांच्याशी काय बोलाव सुचत नव्हतं.बाळांनो रडू नका,त्यांना पाणी आणून दिले.दोघांना शांत केले आणि म्हटलं, बाळांनो हो मी तुम्हाला अस्थी देतो,” असं त्या मुलांना सांगितल्याचं जाधव म्हणाले.“आजवर अनेकांचा इथे आक्रोश पाहिला.पण या मुलाकडे पाहून आता याचं कसं होणार हाच विचार मनात घोंघावत राहिला

इमेज

लाल, पिवळ्या, हिरव्या स्टीकरचा आदेश मुंबई पोलिसांकडून रद्द मुंबई ,,: कोरोनाच्या पार्श्वभूमिवर मोठा गाजावाजा करून सुरू केलेली 'कलर कोड' नियम मागे घेण्यात आले आहे. तसे पत्रकच मुंबई पोलिस दलातील मुख्य नियंत्रण कक्षातून काढण्यात आले आहे. हे नियम कोणत़्या कारणास्तव मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला हे अद्याप कळू शकले नसले. तरी या नियमाबाबत सुरवातीपासूनच संभ्रम नागरिकांमध्ये निर्माण झाले होते.*प्रिय मुंबईकरांनो*लाल, पिवळा, हिरवा रंग वर्गीकरण बंद केले जात आहे. तथापि, संपूर्ण तपासणी चालू ठेवली जाईल आणि आम्ही आशा करतो की, आपण मध्ये आमच्या पाठीशी उभे राहाल आणि घराबाहेरची सर्व अनावश्यक / विना-आपत्कालीन हालचाल टाळाल.विशेष म्हणजे हे स्टिकर घरातच बनवून लावण्याचे आदेश दिल्याने अनेक अत्यावश्यक सेवेत नसलेल्या वाहन चालकांनी ही आपल्या गाडीला हे स्टिकर लावल्याचे तपासा दरम्यान निर्माण निदर्शनास आले.नागरिकांमध्ये असलेला संभ्रम आणि ही पध्दत पोलिसांसाठीच तापदायक बनल्याने अवघ्या सात दिवसांत कलर कोडचा निर्णय मागे घेण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील वाहनांवर पिवळा कलर कोड असणार आहे. मेडिकल सेवा पुरवणाऱ्या वाहनांवर लाल कलरचा तर भाजीपाल्याच्या वाहनांवर हिरवा कलर कोड देण्यात आला होते. सध्या जिल्हा बंदीचे नियम असल्याने पोलिसांनी पुन्हा ई-पास सेवा E-Pass सुरू केली आहे. त्यात ही अत्यावश्यक सेवा आणि मेडिकल एमर्जन्सी वगळता कुणालाही ई-पास दिले जाणार नाही. मागच्या लाँकडाऊनमध्येही ई-पासमुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली होती. काही ठिकाणी ई- पासचा काळाबाजार झाल्याचेही उघडकीस आले होते.

इमेज

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर सीबीआयचे छापे मुंबई, २४ /४/२०२१ राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर आणि त्यांच्या मालमत्तांवर सीबीआयने छापे टाकले आहेत. दरम्यान, मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी केलेल्या आरोप प्रकरणी अनिल देशमुख यांच्याविरोधात सीबीआयने एफआयआर दाखल केले आहे.उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराजवळ सापडलेल्या स्फोटकं प्रकरण आणि त्यानंतर या प्रकरणावरून बराच गदारोळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या पोलीस आयुक्त पदावरून तत्कालीन आयुक्त परमबीर सिंह यांची उचलबांगडी करण्यात आली होती. सिंह यांच्याकडून तपास चुका झाल्याचं विधान अनिल देशमुख यांनी केल्यानंतर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकला.परमबीर सिंह यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना एक पत्र पाठवलं होतं. ज्यात अनिल देशमुख यांनी १०० कोटी वसूलीचं टार्गेट दिलेलं होतं, असा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणी परमबीर सिंह यांनी आधी सर्वोच्च न्यायालय आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मुंबई उच्च न्यायालयाने सीबीआयला प्राथमिक चौकशी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सीबीआयने प्रकरणाचा तपास सुरू केला होता.

इमेज

उल्हासनगर दिनांक २३/४/२०२१. प्रभाग क्रमांक ४ च्या सभापती अंजली साळवे यांनी लसीकरण केंद्र शाळा नंबर २८ प्रभाग उ न म पा अधिकारी पंजाबी यांना भेट दिली व डॉ सुवेदीका सोबत चर्चा करून तेथील लसीकरणा बाबत आढावा घेतला .दिनांक २४ एप्रिल सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत लाईट बंद राहणार असल्यामुळे तेथील लसीकरणावर परिणाम होऊ नये यासाठी तिथे तत्काल इन्व्हर्टर उपलब्ध करून देण्याबद्दल प्रभाग अधिकार्‍यांना सांगण्यात आले तसेच तसेच तिथे स्टाफ ची कमतरता पडत असल्याने व गर्दी वाढत असल्याने तिथे स्टाफ वाढवण्यात यावा याबद्दल मा.नाईकवाडे व डॉ पगारे यांच्या सोबत चर्चा करण्यात आली, तसेच एक मेपासून १८ वर्षावरील सर्वांचे लसीकरण सुरू होणार आहे तेव्हा लवकरच दुसरे लसीकरण केंद्र सुरु करण्यात यावे ही मागणी करण्यात आली.

इमेज

तृतीयपंथियों की मदद कैसे हों ? सरकार के पास कोई सूची नहीं... आजतक सरकार से कोई सहायता नहीं मिली, ना ही कोई सर्वे करने आया : विद्यासागर देडे 1 मई के बाद मा ठाणे जिलाधिकारी महोदय से सर्वे के बारेमें चर्चा की जायेगी : सोनिया धामी कोरोना महामारी के संकट में राज्य सरकार किन्नरों को प्रति 1500 रुपए की आर्थिक सहायता उपलब्ध करा सकती है, सरकार ने किन्नरों को राहत देने के लिए सकारात्मक कदम उठाया है, सरकार की तरफ से किन्नरों को आर्थिक सहायता देने के लिए राज्य के समाजकल्याण आयुक्तालयको प्रस्ताव भेजने के निर्देश दिया गया है, समाजकल्याण आयुक्तालय को राज्य में किन्नरों की संख्या, मदद के लिए सरकारी तिजोरी पर पड़ने वाला आर्थिक भार और मदद करने की प्रणाली के बारे में जानकारी देने को कहा गया है, इसलिए अब समाजकल्याण आयुक्तालय के उपायुक्त रवींद्र पाटील ने समाज कल्याण विभाग के सभी प्रादेशिक उपायुक्त और सहायक आयुक्तों को पत्र लिखकर संबंधित जानकारी मांगी है, इस पत्र के जरिए विभागीय तृतीयपंथीय (किन्नर) अधिकार संरक्षण और कल्याण मंडल व जिलास्तरीय शिकायत निवारण समिति की मदद से जिलेवार किन्नरों की संख्या, मदद के लिए पड़ने वाला आर्थिक भार और मदद के लिए डीबीटी समेत अन्य विकल्पों समेत अन्य जानकारी 26 अप्रैल तक मांगी गई है, इससे पहले राकांपा सांसद सुप्रिया सुले ने सरकार से किन्नरों को मदद करने की मांग की थी,परंतु सरकार को प्रश्न है कि तृतीयपंथियों की मदद कैसे हों? क्योंकि सरकार के पास कोई तृतीयपंथियों की सूची बनी नहीं है,उक्त विषय पर उल्हासनगर अंबरनाथ कल्याण के 250 किन्नरों का प्रतिनिधित्व करने वाले विद्यासागर देडे जी ने बताया कि आजतक सरकार से कोई सहायता नहीं मिली, ना ही कोई सर्वे करने आया,सुप्रिया सुळे जी द्वारा की गई मांग को लेकर उल्हासनगर राकांपा अध्यक्षा श्रीमती सोनिया धामी जी ने बताया कि 1 मई के बाद मा ठाणे जिलाधिकारी महोदय से सर्वे के बारेमें चर्चा की जायेगी।

इमेज

शीना बोरा हत्येप्रकरणी भायखळा कारागृहात असलेल्या इंद्राणी मुखर्जीसह 40 महिला कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याने खळबळ उडाली आहे. त्यांच्यावर कारागृहातील क्वॉरंटाइन भायखळा कारागृहातील एका महिला कैद्याला 30 मार्च रोजी सुनावणीसाठी न्यायालयात नेण्यात आले होते. त्यानंतर काही दिवसांनी या महिलेला ताप आल्याने जे.जे. रुग्णालयात दाखल केले.तिची कोरोना चाचणी करताच त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. कारागृहाने तत्काळ कारागृहातील सर्व महिला, पुरुष कैद्यांसह कारागृह कर्मचारी, अधिकाऱ्याची चाचणी केली. त्यात इंद्राणी मुखर्जीसह 40 महिला कैदी पॉझिटिव्ह आल्या आहेत. शुक्रवारी त्यांचा प्राथमिक अहवाल येताच, त्यांना कारागृहाच्या क्वॉरंटाइन सेंटरमध्ये ठेवण्यात आले.या महिलांना कुठलीही लक्षणे नसल्याचेही कारागृह अधिकाऱ्यांनी सांगितले.महिला कैद्यांना कोरोनाची बाधा झाल्याच्या वृत्ताला कारागृह अधीक्षक सदानंद गायकवाड यांनीही दुजोरा दिला आहे. कोरोनाचे संक्रमण नेमके कसे झाले, याबाबत कारागृह प्रशासन अधिक तपास करत आहे. भायखळा महिला कारागृहात 262 कैद्यांची क्षमता असताना 363 महिला कैदी आहेत. त्यामुळे यावर वेळीच नियंत्रण मिळवण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे

इमेज

अमित शहां नी केलं मोठं विधान .म्हणाले ठाकरे सरकार कोसळणार. नवी दिल्ली......,.................................................. भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे शहा यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढण्यात येत आहेत.गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यापासून ते भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यापर्यंत सर्वच जणांनी लवकरच महाराष्ट्रातील ठाकरे सरकार कोसळणार असल्याचा दावा केला आहे. या नेत्यांचा हा दावा ताजा असतानाच भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ठाकरे सरकारबाबत मोठं विधान केलं आहे. त्यामुळे शहा यांच्या या विधानाचे अनेक राजकीय अर्थ काढण्यात येत आहेत. अमित शहा यांनी ‘टाइम्स नाऊ’ला विशेष मुलाखत दिली. त्यात त्यांना राज्यातील ठाकरे सरकार किती दिवस चालेल असा सवाल करण्यात आला होता. त्यावर शहा यांनी थेट उत्तर दिलं. शिवसेनेने आमच्या सोबत निवडणूक लढवली होती. शिवसेना हा आमचा छोटा मित्र पक्ष होता. त्यांनी आम्हाला मुख्यमंत्रीपदावर दावा करण्याची मोकळीक दिली होती. हे सरकार त्यांच्या ओझ्यानेच कोसळेल, असा आमचा विश्वास आहे. आम्हाला काहीही करावं लागणार नाही, असं शहा म्हणाले शहा यांनी अगदी मोजक्याच शब्दात आपली भूमिका मांडली आहे. परंतु, त्यातून त्यांनी शिवसेनेला डिवचले आहेत. या मुलाखतीत त्यांनी शिवसेनेला छोटा मित्र पक्ष म्हटलं आहे. महाराष्ट्रात शिवसेना-भाजप युतीत शिवसेना हाच मोठा पक्ष राहिला आहे. किंबहुना शिवसेनेच्या खांद्यावरच राज्यात भाजप मोठा झाला आहे. फक्त गेल्या दहा वर्षात राजकीय वारं बदलल्याने त्याचा फटका शिवसेनेला बसला. त्यामुळेच शहा यांनी शिवसेनेला डिवचण्यासाठी शिवसेनेला छोटा मित्र पक्ष म्हटलं आहे, असं राजकीय निरीक्षक सांगतात. ठाकरे सरकार आपल्याच ओझ्याने कोसळणार असल्याचं शहा यांनी म्हटलं आहे. त्यांनी थेट भाजप सरकार पाडणार असं म्हटलं नाही. मात्र, ठाकरे सरकार कोसळणार हे सांगून त्यांनी बरेच संकेत दिले आहेत, असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. त्यामुळे शहा यांच्या वक्तव्यावरून तर्कवितर्क लढवले जात आहेत.

इमेज

किराणा मालाची दुकानं, डेअरी, मच्छी मार्केट दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरूराज्यातील कोरोनाची वाढती आकडेवारी लक्षात घेता संक्रमण रोखण्यासाठी राज्य सरकार कडून लागू करण्यात आलेले निर्बंध अधिकाधिक कठोर केले जात आहेत. आताच मिळालेल्या अपडेटनुसार महाराष्ट्र सरकारने सध्या सुरू असणाऱ्या निर्बंधाच्या गाइडलाइन्समध्ये काही बदल केले आहे. नवीन आदेशानुसार आता किराणा मालाची दुकानं, डेअरी, मच्छी मार्केट सकाळी ७ ते ११ याच वेळेत सुरू राहणार आहे.राज्यातील सर्व किराणा, भाजी दुकाने, फळ दुकाने, डेअरी, बेकरी, सर्व खाद्य दुकाने .चिकन, मटण, पोल्ट्री , फिश यासह .कृषि उत्पादनाशी संबंधित दुकानं, पाळीव प्राण्यांची खाद्य दुकानं, येणाऱ्या पावसाळ्याशी संबंधित वस्तूंची दुकानं देखील दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ या वेळेतच सुरू राहतीलमात्र या दुकानांना सकाळी ७ ते रात्री ८ या वेळेत होम डिलिव्हरी करता येईल. स्थानिक प्रशासन त्यांच्या वेळांच्या बाबतीत परिस्थिती पाहून निर्णय घेईल.कोरोना विषाणूचे संक्रमण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ‘ब्रेक द चेन’ मोहिमेअंतर्गत २० एप्रिल २०२१ रात्री ८ वाजल्यापासून ते १ मे सकाळी ७ वाजेपर्यंत लॉकडाऊन जाहीर केला आहे. याच मोहिमेअंतर्गत सरकारने आता नवी गाइडलाइन जारी केली आहे.

इमेज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अंबरनाथ औद्योगिक क्षेत्रातील कारखानदारांकडून सहकार्य करण्यात यावे यासाठी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी सोमवारी कारखानदारांसोबत बैठक घेतली. या बैठकी दरम्यान - अंबरनाथ शहरातील कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता बाधितांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता कारखानदारांकडून नगरपालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन आमदार डॉ. बालाजी किणीकर यांनी केले.- यावर औद्योगिक कारखानदार असोसिएशन (आमा) यांच्याकडून कंपन्यांच्या CSR फंडमधून १५ व्हेंटिलेटर व १०० बायपँप मशिनस उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे असोसिएशनचे अध्यक्ष श्री.उमेश तायडे यांनी सांगितले.- तसेच १०० आय.सी.यु. बेडसाठी लागणारे वैद्यकीय यंत्र सामग्री उपलब्ध करून देण्यात येणार आहे.- यावेळी औद्योगिक क्षेत्रातील कामगारांकरिता लसीकरण केंद्र सुरू करण्यात यावे याबाबत ही चर्चा झाली.- कारखानदार असोसिएशन ( आमा) च्या वतीने औद्योगिक क्षेत्रातील कामगारांसाठी "शिवभोजन थाळी " सुरू करण्यात येत असून शेकडो कामगारांना याचा फायदा होणार असल्याने आमदार डॉ. किणीकर यांनी त्यांचे या कामाबद्दल कौतुक केले.याप्रसंगी उपशहरप्रमुख श्री.गणेश कोतेकर, असोसिएशनचे अध्यक्ष श्री.उमेश तायडे, माजी नगरसेवक श्री. सुभाष साळुंखे, विभागप्रमुख श्री.सचिन गुडेकर, शाखा प्रमुख श्री. सुरेश कदम, मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी श्री.धीरज चव्हाण, नोडल अधिकारी डॉ. नितीन राठोड, एमआयडीसी उपअभियंता श्री.पवार, असोसिएशनचे सेक्रेटरी श्री. परेश शहा,सह सचिव श्री.संदीप तोंडापूरकर, मोदी पंपचे श्री.सुमित मोदी तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

इमेज

राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके यांनी शरदचंद्र आरोग्य मंदिर भाळवनी या ठिकाणी ११०० बेड चे कोविड सेंटर केले सुरू १०० बेड्स ला ऑक्सीजन सुविधा .........................पारनेर, १७ एप्रिल: ........................... राज्यात दिवसेंदिवस करोनाचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. दररोज मोठ्यासंख्येने नवीन करोनाबाधित आढळून येत आहेत , रुग्णांच्या मृत्यू मध्ये सुद्धा वाढ सुरूच आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात १५ दिवसांसाठी लॉकडाउन देखील जाहीर करण्यात आले आहे. तरी देखील करोनाबाधितांची संख्या ही वाढल्याचे समोर येत आहे. आज दिवसभरात राज्यात ६३ हजार ७२९ करोनाबाधित वाढले असून, ३९८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. राज्यातीलर मृत्यू दर १.६१ टक्के आहे. राज्यात आजपर्यंत ५९ हजार ५५१ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.आज ४५ हजार ३३५ रूग्ण करोनातून बरे देखील झाले आहेत. राज्यात आजपर्यंत एकूण ३०,०४,३९१ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ८१.१२ टक्के एवढे झाले आहे.राज्यातील स्थिती कोरोनामुळे बिघडलेली असताना काही दिवसांपूर्वी शरद पवार यांनी पक्षातील नेत्यांना लोकांच्या मदतीचं आवाहन केलं होतं. त्यांच्या आवाहनाला चांगला प्रतिसाद मिळण्यास सुरुवात झाल्याचं पाहायला मिळतंय. राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी भाळवणी येथे शरदचंद्र आरोग्य मंदिर येथे ११०० बेड कोविड सेंटर सुरू केलं आहे. विशेष म्हणजे यामधील १०० बेड्सना ऑक्सिजनची सुविधा आहे.तसेच कोविड सेंटरसाठी आमदार लंके यांनी नागरिकांना अन्नदान व विविध सुविधांसाठी मदत करण्याचे आवाहन केले होते. या आवाहनाला मोठा प्रतिसाद मिळाला व तालुक्यातून १७ लाख रुपये रोख जमा झाले आहेत. मुंगशी गावाकडून ५ टन धान्य व ५० हजार रुपयांची मदत करण्यात आली आहे.

इमेज

रोज मरे त्याला कोण डरे.................................................................... राज्यात कोरोना महामारी मुळे मागील वर्षी कडक लोक डाऊन घोषित केला आणि महाराष्ट्रातील सर्व व्यापार उद्योग बंद झाले त्यातच सिनेमागृह नाट्यगृह बंद करण्यात आले व सिनेमाची शूटिंग सुद्धा रद्द करण्यात आली. त्यामुळे सर्व नागरिकांचे उद्योगधंदे बंद असल्याने उपासमार व कर्जबाजारी सहन करावी लागली. चित्रपट निर्माते करोडो रुपये फायनान्स करणाऱ्या बॅंकांकडून घेऊन बनवत असलेले चित्रपट थांबले गेले. सिनेमा थियेटर. बंद पडली. थीयेटर मध्ये काम करत असलेले कित्येक लोक बेरोजगार झाले. नाट्यकलावंत व नाट्यगृहातील कर्मचारी त्यांच्यावर मोठे संकट कोसळले होते जोपर्यंत जवळ असलेले पैसे होते तोपर्यंत सगळे व्यवस्थित होते परंतु लॉकडाउन वाढत गेला आणि अडचणी निर्माण झाल्या अनेक लहान सहान भूमिका करणारे कलावंत यांची उपासमार होऊ लागली तर नाट्यगृहात काम करीत असलेले कर्मचारी यांचीही उपासमार होऊ लागली. हे सर्व घडत असताना शिवाजी मंदिर चे बुकिंग क्लार्क हरी पाटणकर हे उघड्या डोळ्याने पाहत होते. त्यांना काही सुचत नव्हते नेमके करावे काय. त्यावर त्यांनी एक तोडगा काढला सर्व सहकाऱ्यांची मदत घेतली आणि अनेक वरिष्ठांकडे मदतीची मागणी केली आणि त्यांना यश मिळाले ..जोपर्यंत लॉक डाउन होते तो पर्यंत मिळेल तिकडून त्यांनी मदत घेतली. आणि त्यातूनच नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांचा थोडाफार का होईना प्रश्न हरी पाटणकर यांनी सोडविला. तब्बल एक वर्ष लॉकडाऊन ला होत आले होते अखेर शेवटी सरकारचा नाट्यगृह सुरू करण्याचा आदेश आला आदेश येताच सर्व नाट्य कलावंत आणि नाट्यगृहात काम करीत असलेले कर्मचारी यांना आनंद झाला आणि लॉंग लाईफ नाटकाचा पहिला प्रयोग दामोदर नाट्यगृह येथे झाला नाट्यगृह सुरू होताना अनेक माध्यामानी आणि मिडिया चॅनेलने बातम्या चे प्रसारण केले. परंतु निसर्गाला हे मान्य नव्हतं. एक वर्ष सुनसान व ओस पडलेले रस्ते पुन्हा वर्दळी चे भाग बनले आणि कोरोना महामारी चा दुसरा टप्पा सुरू झाला . शासनाला सुरुवातीला वाटलं होतं की सर्व काही ठीक होईल परंतु ठीक ठिकाणी नागरिकांची गर्दी रेल्वे लोकल ट्रेन बस सेवा मध्ये भारी प्रमाणात होणारी प्रवाशांची गर्दी . तसेच शॉपिंग मॉल. भाजी मंडई. हॉटेल. नाईट क्लब. बियर बार. अशा अनेक वर्दळीच्या ठिकाणी नागरिकांची गर्दी वाढत होती आणि एकीकडे कोरोना चे रुग्ण ही वाढत होते . त्यातच एप्रिल 2021 मध्ये पुन्हा राज्यात संचारबंदी बंदी लागू करण्यात आली. आणि पुन्हा एकदा सर्व काही ठप्प झाले. नाट्यगृहातील कर्मचाऱ्यांना पुन्हा प्रश्न पडला. मागील वर्षी २०२० मध्ये जी काही थोडीफार मदत मिळाली होती. आता मिळणे जवळपास. दुरापास्त याला कारण म्हणजे. रोज मरे त्याला कोण डरे. हीच चिंता पुन्हा एकदा नाट्यगृहातील बुकिंग क्लार्क हरी पाटणकर यांना पडली आहे.. कारण नाट्यगृह दुसऱ्यांदा बंद पडले आहेत. २०२० च्या काळात भोगलेल्या यातना .आपल्याच माणसांनी फिरवलेली पाठ. जगायला आवश्यक असलेल्या गोष्टीचा वनवा. हातात पैसा नसल्यावर डोक्यात उच्छाद मांडणारे भुंगे... आता पुन्हा बंद. आता कसे होणारं.? यामुळेच हरी पाटणकर पुन्हा निराश झाले. आज नाट्यक्षेत्रात बुकिंग क्लार्क. व्यवस्थापक. रंगमंच कामगार. काम करीत आहेत. त्यांना कोणी मदत देत नाही आणि लक्षही देत नाही. तरी त्यांचा वाली कोण ? याचे उत्तर कोण देणारं ? आत्ता आम्ही करायचं तरी काय ? हरी ला पडलेले हे प्रश्न आज प्रत्येक क्षेत्रात कोणाला ना कोणाला तरी पडलेले आहेत परंतु त्याची उत्तरे मात्र कोणालाच माहित नाहीत कारण या कोरोना महामारी पुढे सगळेच हातबल झाले आहेत. तरीसुद्धा हरी ची जिद्द अजूनही कायम आहे तो म्हणतोय हे ही दिवस सरतील. व पुन्हा एकदा नाट्यक्षेत्राला सोनेरी कळस लागेल .पण तो पर्यंत कोणी मदत केल्यास जगणे सुलभ होईल.

इमेज

*राजेश्री कॉलनी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती साजरी* दिनांक १५/४/२०२१. राजेश्री कॉलनी चिंचपाडा, कल्याण (पूर्व) येथे भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३० वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी मधुकर गंगावणे , जीवनसंघर्षकार नवनाथ रणखांबे,निलेश पवार,भागवत गमरे,सुधिर चाबूकस्वार, अविनाश शिरकर, राजेश चौहान, विशाल पटवा, प्रज्ञा गंगावणे , प्रेरणा गंगावणे, मुख्याध्यापिका आशा रणखांबे , संजय बालनाईक , ज्ञानेश्वर राठोड, रामदास सोनवणे तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.या वेळी लहान मुलांना मंचावर धाडस यावे, त्यांच्यामधील सामान्य ज्ञान जागृत व्हावे. याकरता प्रश्न मंजुषा स्पर्धा घेण्यात आली .या स्पर्धेमध्ये प्रश्नांचे योग्य उत्तर देणाऱ्या सर्व स्पर्धकांना शालेय वस्तू प्रोत्साहन म्हणून बक्षिसे देण्यात आली. अशी माहिती. आशा रणखांबे यानी दिली.

इमेज

कल्याणमध्ये कोरोना रुग्णांची वाढ होऊ नये याकरिता शहरात कडक बंदोबस्त. दिनांक १५एप्रिल २०२१. कल्याण मध्ये रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन. ठीक ठिकाणी . रस्त्यावर बंदी गेट लावण्यात आले व प्रत्येक चौकात काटेकोरपणे बंदोबस्त लावण्यात आला . मागील वर्षी कल्याणमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अंबरनाथ उल्हासनगर बदलापूर पेक्षा अधिक होती त्यामुळे सध्याची परिस्थिती लक्षात घेता. कोरोना रुग्णांची वाढ होऊ नये. यासाठी पर्याप्त उपाय योजना करण्यात आलेली आहे..

इमेज

मुंबई, १५ एप्रिल: कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे राज्यात कठोर निर्बंध लागू झाल्यानंतर देखील लोकल ट्रेनमधल्या गर्दीमध्ये फारसा फरक दिसून येत नाही. स्थानकात प्रवेशासाठी कोणतेही निर्बंध लावले गेलेले नाहीत. आधीच्या लॉकडाऊन प्रमाणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर सर्वांना टिकीट दिली जात आहे. तसेच आरपीएफ आणि जीआरपी देखील प्रवाशांचे आय कार्ड किंवा क्यू आर कोड तपासताना आढळून आले नाहीत. याचे कारण म्हणजे राज्य सरकारकडून रेल्वेला कोणत्याही प्रकारचे आदेश अजूनही प्राप्त झालेले नाहीत.राज्य सरकारने स्थानकात कोणाला प्रवेश घ्यावा आणि कोणाला देऊ नये या संदर्भातल्या लेखी आदेश रेल्वेला दिले नाहीत. तसेच यावेळी निर्बंध लावताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बैठकीला देखील बोलावले गेले नव्हते. त्यामुळे रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रत्येकाला प्रवेश दिला जात आहे. तिकीट खिडक्यांवर देखील घेण्यासाठी आलेल्या सर्वांना तिकीट दिले जात आहे. त्यामुळे या कडक निर्बंधांचा काही उपयोग होईल का अशी शंका आहे.दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला दिले आहेत. राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे ही बैठक झाली. अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य शासनाने दुर्बल घटकांसाठी जाहीर केलेले आर्थिक साहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेतराज्य सरकारने स्थानकात कोणाला प्रवेश घ्यावा आणि कोणाला देऊ नये या संदर्भातल्या लेखी आदेश रेल्वेला दिले नाहीत. तसेच यावेळी निर्बंध लावताना रेल्वेच्या अधिकाऱ्यांना बैठकीला देखील बोलावले गेले नव्हते. त्यामुळे रेल्वे स्थानकात घेणाऱ्या प्रत्येकाला प्रवेश दिला जात आहे. तिकीट खिडक्यांवर देखील घेण्यासाठी आलेल्या सर्वांना तिकीट दिले जात आहे. त्यामुळे या कडक निर्बंधांचा काही उपयोग होईल का अशी शंका आहे.दरम्यान, कोरोनाची साखळी तोडण्यासाठी लागू करण्यात आलेल्या निर्बंधांची अतिशय काटेकोरपणे अंमलबजावणी होईल, याकडे सर्व जिल्हाधिकारी व पोलीस यंत्रणेने लक्ष द्यावे. गर्दी झाल्यास अत्यावश्यक सेवाही बंद कराव्यात, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जिल्हाधिकारी-पोलीस प्रशासनाला दिले आहेत. राज्यात १५ दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे.राज्यातील सर्व विभागीय आयुक्त व जिल्हाधिकारी, पालिका आयुक्त तसेच पोलीस अधिकाऱ्यांच्या बैठकीत मुख्यमंत्री बोलत होते. दूरचित्रसंवाद यंत्रणेद्वारे ही बैठक झाली. अंमलबजावणी करताना मनात गोंधळ ठेवू नका, स्पष्टता ठेवा, असेही मुख्यमंत्री म्हणाले. राज्य शासनाने दुर्बल घटकांसाठी जाहीर केलेले आर्थिक साहाय्य व्यवस्थित त्यांच्यापर्यंत पोहोचावे तसेच कोणत्याही तक्रारी येणार नाही, यादृष्टीने चांगले नियोजन करण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या आहेत.

इमेज

केंद्राचा मोठा निर्णय कोरोनाचे मोठे संकट वाढतं असल्याचे लक्षात घेऊन केंद्र सरकारने CBSE बोर्डाच्या परीक्षाबद्दल मोठा निर्णय घेतला आहे.CBSE Exam : दहावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या तर बारावीच्या परीक्षा लांबणीवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत दहावीची परीक्षा रद्द करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला आहे. त्यासोबतच बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने याची माहिती दिली आहे. करोनाच्या संकटात केंद्राच्या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना हा मोठा दिलासा मानला जात आहे.

इमेज

हरीआल्हाट ........................................................उल्हासनगर कॅम्प नंबर ५ मध्ये महामानव डाँ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३० व्या जयंती निमित्त डाँ बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारक उल्हासनगर ५ येथे लहुजी संघर्ष सेनेच्या वतीने जयंती साजरी करण्यात आली यावेळी दिपक सोनोने.सुर्यकांत साबळे. रवि सोनोने. अनिल धूळे. ज्ञानेश्वर गायकवाड .शंकर लोखंडे . तसेच अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

इमेज

उल्हासनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन..................................................................... आज दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी उल्हासनगर. यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले या वेळी अनेक नागरिकांनी रक्तदान करून आपले कर्तव्य बजावले सध्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे त्याकरिता रुग्णांसाठी रक्ताची सोय व्हावी या उद्देशाने श्रीमती सोनिया धामी मॅडम तसेच भारत राजवानी गंगोत्री यांच्या माध्यमातून या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले . आज दिनांक १४ एप्रिल २०२१ रोजी परमपूज्य डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त ह्या रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले अशी माहिती श्रीमती सोनिया धामी मॅडम . तसेच भारत राजवानी यांनी दिली यावेळी अनेक पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते..

इमेज

हरी आल्हाट .................................................... उल्हासनगर कॅम्प नं.५ विर तानाजी नगर या ठिकाणी प पू डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन दीपक नामदेव आढाव यांच्या वतीने करण्यात आले. या वेळी मधुकर साबळे. सज्जन शेकटे. महादेव शेलार. गोपी मयेकर. अनिल हिवाळे. दीपक माने. गणेश मोरे. गौतम शिरोळे. संदीप गव्हाळे. बाळासाहेब साबळे. रवि हिवाळे. अख्तर खान. अब्बा साठे. दशरथ शिरवाळे उपस्थित होते..

इमेज

लॉक डाऊन मुळे पर प्रांतीय नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण. ............................................................. सध्या महाराष्ट्र राज्यात लॉक डाऊन चे वारंवार येणारे नवं नवे आदेश. तसेच राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या. पाहून परप्रांतीय नागरिकांना मागील वर्षाचे लॉक डाऊन आठवत असेन. त्या मुळेच त्यांनी सावधगिरी बाळगली आहे असे दिसत आहे. येणाऱ्या काळात सरकार कडून कोणता निर्णय येईल हे मात्र कोणाला ही सांगता येणार नाही. सध्या राज्यात रुग्णांची संख्या वाढत असून. महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर नियंत्रण कसे करता येईल ही उपाय योजना करीत आहे. बऱ्याच प्रमाणात यशस्वी सुद्धा होत आहे. परंतु महाराष्ट्र राज्याची लोकसंख्या जास्त असल्या मुळे कुठे तरी कमी पडत आहे हे जाणून आहे. त्या साठी महाराष्ट्र सरकार परिस्थितीवर नियंत्रण आणण्या साठी शर्तीचे प्रयत्न करीत आहे.. महाराष्ट्रातील नागरिक आणि व्यापारी वर्ग सुद्धा बऱ्या पैकी सहकार्य करत आहेत. मात्र . परप्रांतीय नागरिक यांच्यातच भीतीचे वातावरण पसरले असल्याचे ह्या चित्रातून दिसत आहे. तेव्हाच अनेक जंक्शन रेल्वे स्टेशन वर परप्रांतीय नागरिक यांची मायदेशी परत जाण्या साठी गर्दी दिसत आहे..

इमेज

भाजप सरकार लस वाटपात महाराष्ट्रा सोबत दुजाभाव करत असल्याच्या निषेधात उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनूसुचित जाती विभागाच्या वतीने आंदोलन करण्यात आले...................... ........... उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी अनूसुचित जाती विभागाचे .प्रदेश अध्यक्ष नानाभाऊ पटोले .अनूसुचित जाती विभागाचे अध्यक्ष विजय अंभोरे . उल्हासनगर प्रभारी नंदकुमार मोरे यांच्या आदेशनुसार तसेच उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांच्या मार्गदर्शनाखाली उल्हासनगर कॅम्प नंबर ५ दुधनाका चौक या ठिकाणी निदर्शन करण्यात आले............................. .... या वेळी. अनूसुचित जाती विभागाचे अध्यक्ष- दिपक सोनोने तसेच भागवत तायडे. ज्ञानेश्वर गायकवाड. अनिल धुळे . रवि सोनवणे . राहुल आहुजा उपस्थित होते..

इमेज

महाराष्ट्रात नवा कडक लॉकडाऊन

इमेज
 नवा कडक लॉकडाऊन  मुंबई : राज्यात कोरोनाच्या वाढत्या प्रकोपामुळं पुन्हा एकदा कडक लॉकडाऊन लागण्याची शक्यता आहे. आज या संदर्भात मुख्यमंत्र्यांची सर्व पक्षांच्या नेत्यांसोबत बैठक सुरु आहे. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून आयोजित केलेल्या या बैठकीला मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री अशोक चव्हाण, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रवीण दरेकर, चंद्रकांत पाटील, एकनाथ शिंदे, विजय वडेट्टीवार, मुख्य सचिव सीताराम कुंटे उपस्थित आहेत.  राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी हा लॉकडाऊन होऊ शकतो. याबाबत काल मुख्यमंत्र्यांसह विरोधी पक्षनेते आणि सर्व पक्षांच्या नेत्यांची बैठक झाली होती. या बैठकीत देखील लॉकडाऊनबाबत चर्चा झाली होती, अशी माहिती आहे. सध्या राज्यात कोरोना वाढत चालल्याने आता 30 एप्रिलपर्यंत कडक निर्बंध घालण्यात आले आहेत.   दरम्यान लॉकडाऊनच्या शक्यतेबाबत बोलताना मंत्री विजय वडेट्टीवार काल म्हणाले होते की, कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता आता कोरोनाची शृंखला तोडण्यासाठी किमान तीन आठवड्यांचा कडक लॉकडाऊन आवश्यक आहे. मुख्य

सत्तेसाठी लोकांच्या जीवाशी खेळ?, मोदी सरकार म्हणजे माणुसकीला काळीमा आहे - भाई जगताप मुंबई, १० एप्रिल २०२१. कोरोना विषाणू पासून बचाव करण्यासाठी लस मिळवण्याच्या धडपडीत लसीचा तुटवडा जाणवत आहे. महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि ओडिशानंतर आता बिहार, उत्तर प्रदेशातही लसीचा तुटवडा हाेऊ लागला आहे. या राज्यांत अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद करावी लागली. अनेक राज्यांत एक ते दाेन दिवसांचाच साठा शिल्लक आहे. परंतु राज्यांना पाठवण्यात येणाऱ्या लसीमध्ये राजकारण हाेत असल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी फेटाळून लावला आहे. काेलकात्यामध्ये एका पत्रकार परिषदेत ते म्हणाले, लसीची काेणतीही कमतरता नाही. सर्व राज्यांच्या गरजेनुसार लस उपलब्ध करून देण्यात आली आहे. दुसरीकडे काही राज्यांमधील भोंगळ कारभार देखील समोर आला आहे.गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या दुप्पट आहे. तरीही केंद्र सरकारने गुजरातला आतापर्यंत 1 कोटी लसींचा साठा दिला आहे. तर महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या 1 कोटी 14 लाख लसी आल्या आहेत, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणाविषयी नाराजी व्यक्त होती.त्यानंतर आता मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर बोचऱ्या शब्दात टीका केली आहे. यासंदर्भात ट्विट करताना आमदार भाई जगताप म्हणाले कि, “भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांना व इतर राज्यांना लसींचा पुरवठा करताना भेदभाव केला जातोय…सत्तेसाठी लोकांच्या जीवाशी खेळ ? मोदी सरकार म्हणजे माणुसकीला काळीमा आहे.भाजपाची सत्ता असलेल्या राज्यांना व इतर राज्यांना लसींचा पुरवठा करताना भेदभाव केला जातोय

इमेज

पुणे : पुण्यात आज सायंकाळी ६ पासून पुण्यात कडक लॉकडाऊन राबवण्यात येत आहे. विकेंड लॉकडाऊनची पुण्यात अंमलबजावणी सुरू झाली आहे. पुण्यात शुक्रवारी ६ पासून ते सोमवारी सकाळी ७ पर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. मात्र या दरम्यान दूध आणि मेडिकल सुविधा सुरू राहणार आहेत. नागरिकांना वैद्यकीय आणि अतितातडीच्या कारणास्तव बाहेर पडता येणार आहे. कोणत्याही कारणास्तव बाहेर पडल्यास पोलिसांकडून खातरजमा होणार आहे, पुणे पालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी हे आदेश दिलेले आहेत.दरम्यान पुण्यातील स्थानिक व्यापाऱ्यांनी कडक निर्बंधांना ना पसंती दाखवली होती. यासाठी पुण्यातील काही व्यापाऱ्यांनी दुकानांसमोर येऊन आंदोलन केलं होतं, काहींनी फलकबाजीही केली आहे.आमचे आर्थिक नुकसान होत असल्याचं कारण व्यापाऱ्यांनी सांगितलं होतं, तसेच आज काही व्यापाऱ्यांनी भाजीपाला विकण्याचं आंदोलन त्यांच्या दुकानासमोर येऊन केलं. यात मोठ्या प्रमाणात फलकबाजी देखील झाली होती.पुण्यात रुग्णसंख्या वेगाने वाढत असल्याने कडक निर्बंध लावणे अनिवार्य असल्याचं प्रशासनाकडून सांगण्यात येत होतं, मात्र आता अखेर पुण्यात लॉकडाऊनची अंमलबजावणी सुरु झाली आहे

इमेज

देशभरात ५० टक्के रुग्ण असणाऱ्या राज्याला ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का ? मुंबई, ८ एप्रिल २०२१. ....... आज महाराष्ट्रात सातारा, सांगली, पनवेल ला लसीकरण बंद पडलं आहे. बुलढाण्यात फक्त आजच्या दिवसाचा साठा आहे. आपण लसीकरण केंद्र देखील वाढवले आहेत. हर्ष वर्धन यांच्या बोलण्यावरून जाणवत नाहीये की त्यांना जाणीवपूर्वक विरोध करायचा आहे. पण देशभरात ५० टक्के रुग्ण असणाऱ्या राज्याला ७.५ लाख आणि इतरांना जास्त डोस का ? असा सवाल टोपेंनी केला आहे.गुजरातमध्ये कोरोना रुग्णांची अ‍ॅक्टिव्ह रुग्णांची संख्या महाराष्ट्रापेक्षा निम्मी आहे. लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्र गुजरातच्या दुप्पट आहे. तरीही केंद्र सरकारने गुजरातला आतापर्यंत १ कोटी लसींचा साठा दिला आहे. तर महाराष्ट्राच्या वाट्याला अवघ्या १ कोटी १४ लाख लसी आल्या आहेत, असे सांगत राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणाविषयी नाराजी व्यक्त केली आहे.ते गुरुवारी मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकारपरिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी केंद्र सरकारच्या लस वाटप धोरणातील त्रुटींवर बोट ठेवले. आम्हाला केंद्र सरकारशी भांडायचे नाही. केंद्र सरकार महाराष्ट्रा ला सहकार्य ही करत आहे. मात्र, केंद्र सरकारने महाराष्ट्राला प्रत्येक आठवड्याला असणारी ४० लाख लसींची गरज लक्षात घेतली पाहिजे. सध्या महाराष्ट्राकडे जवळपास 9 लाख लसी आहेत. हा साठा दीड दिवस पुरेल. केंद्र सरकारने नव्याने १७ लाख लसी दिल्या असल्या तरी आठवड्याला ४० लाख या मागणीच्या तुलनेत हा साठा अपुरा आहे, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

इमेज

रायते गावात 11 वर्षापासुन श्मशान भुमि नाही...तर,म्हारळ गावची स्मशानभुमीच चोरीला गेली आहे...!!! उल्हास नदी किनारी २८०० लोकसंख्या असलेल्या रायते गावात गेली ११ वर्षे श्मशानभुमि नसल्याने उघड्यावर उल्हास नदी पात्रात प्रेत अग्निसंस्कार करावे लागत असल्याचा गम्भीर प्रकार घडत आहे, तर दुसरी कडे उल्हास नदी किनारी वसलेले म्हारळ गाव कल्याण तालुक्यात येते. मात्र हा परिसर उल्हासनगर मतदार संघात १० वर्षांपासून समाविष्ट आहे.या गावची स्मशानभुमीच गेल्या काही वर्षांपासून चोरीला गेली आहे. गावची हक्काची स्मशानभुमी मिळावी. म्हणून गावातील तरुणांनी हज़ारों पोस्टकार्ड च्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांना पत्र लिहुन आपली व्यथा कथित केली आहे.म्हारळ गाव हे मुरबाड -अहमदनगर महा मार्गावरील छोटसं गाव. या गावातील लोकसंख्या वाढली.आणि या गावाचे दोन भाग झाले.एक म्हारळ गाव व दुसरा म्हारळ पाडा. या गावाचे दोन भाग झाले तरी ग्रामपंचायत एकच. तर स्मशान भुमी देखिल एकच असायला हवी. मात्र गेल्या १० वर्षा पासून या गावातील नागरीक आपल्या आप्तजनांचे मृत दहन करण्या साठी उल्हासनगर महापालिकेच्या स्मशान भुमीत येतात. तिथं त्यांना अधिकचे पैसे भरावे लागतात. आपण या गावचे स्थानिक नागरीक असतांना हा भुर्दंड का भोगायचा? असा प्रश्न या गावातील तरुणांना भेडसावत आहे, आणि आपल्या गावची हक्काची स्मशान भुमी कुठं गेली? याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.तेव्हां या तरुणांच्या लक्षात आले की आपल्या गावची स्मशानभुमी चोरीला गेली आहे. ती परत मिळावी म्हणून या तरुणांनी ई-मेल, फेसबुक, इंस्टाग्राम आदी सोशल मीडियाचा वापर न करता भारतीय डाक पध्दतीचा वापर करत ५० पैश्याच्या पोस्टकार्ड वर आपल्या गावची व्यथा मुख्यमंत्री यांच्याकडे मांडली आहे.

इमेज

भारत राजवानी (गंगोत्री )यांच्या सभागृहनेता फंडातून भव्य हायमास्ट लाईटचे उद्घाटन दि.४/४/२०२१ रोजीडॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सुभाष टेकडी उल्हासनगर 4 परिसरातील नागरिकांसाठी विकास रतन खरात यांच्या प्रयत्नातून. भारत राजवानी (गंगोत्री )यांच्या सभागृहनेता फंडातून भव्य हायमास्ट लाईटचे उद्घाटन करण्यात आले.प्रमुख उपस्थिती *हरकिरण कौर (सोनिया) धामी मॅडम, (जिल्हाध्यक्षा) राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.* भारत राजवानी (गंगोत्री ) सभागृह नेता तथा प्रदेश चिटणीस.सुनिता बगाडे मॅडम, नगरसेविका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.वैशाली रतन खरात,समाजसेविका.शारदाताई अंभोरे, सचिव राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.कल्पनाताई साळवे, महासचिव राष्ट्रवादी महिला काँग्रेस पार्टी.अनिल बंगाळे अध्यक्ष, सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.रमाताई भालेराव, महिला अध्यक्ष सामाजिक न्याय विभाग राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी.राजेश गवई, अध्यक्ष जितेंद्र आव्हाड विचारमंच. शेकडो सुभाष टेकडी परिसरातील नागरिकांच्या उपस्थित भव्य हाय मास्ट लाईट चे उद्घाटन करण्यात आले. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते.

इमेज