पोस्ट्स

जनहित न्यूज महाराष्ट्र/ बातमी जनहित 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी व अधिकारासाठी अर्थात फेलोशीप साठी बेमुदत उपोषण

इमेज
विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी व अधिकारासाठी अर्थात फेलोशीप साठी बेमुदत उपोषण . मुंबई: दिनांक ३१ॲक्टोंबर २०२३ ओबीसी (OBC), विमुक्त जाती भटक्या जमाती (VJNT) आणि विशेष मागास प्रवर्ग SBC समुदयातील विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी व अधिकारासाठी अर्थात फेलोशीप साठी बेमुदत उपोषण  दिनांक: ३० ऑक्टोबर, २०२३ पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी सुरू आहे महाराष्ट्र शासनाच्या यादीनुसार इतर मागासप्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती व विशेष मागासप्रवर्ग याच्या जातींची संख्या ४१२ असून एकूण लोकसंख्येच्या साधारण ५२% पेक्षा अधिक आहे. मात्र या समुदायाचे उच्चशिक्षणातील प्रमाण अत्यल्प आहे आणि संशोधनाच्या क्षेत्रात तर त्यांचे प्रमाण नगण्य आहे. २००८ मध्ये शिक्षणात आरक्षण लागू झाल्यानंतर उच्च शिक्षणाच्या मुख्यप्रवाहात येण्यास सुरुवात झाली आहे. मात्र सरकार वरील जमातीतील लोकांना उच्च शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा डाव आखीत असून मागील वर्षी १२३८ लोकांना फेलोशिप देण्यात आली आणि ह्यावर्षी सुरुवातीला मात्र ५० आणि आता २०० जागा हा तुटपुंजा न्याय देवून हजाराहून