पोस्ट्स

जनहित न्युज महाराष्ट्र / बातमी जनहित: संपादक हरी आल्हाट लेबलसह पोस्ट दाखवत आहे

श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त "भक्ती-शक्ती" चौक येथील प्रतिमेला पुष्पहार अर्पण

इमेज
श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंती निमित्त "भक्ती-शक्ती" चौक येथील प्रतिमेला पुष्पहार अर्पण अंबरनाथ: नगरसेवक श्री सुभाष साळुंके यांच्या संकल्पनेतून  उभारलेल्या छत्रपती शिवराय व जगतगुरु तुकाराम महाराज यांच्या भेटीचे शिल्प अर्थात "भक्ती-शक्ती" चौक येथील प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले, छत्रपती शिवाजी महाराज व संत तुकोबाराय यांच्या प्रतिमेला ज्येष्ठ शिवसैनिक श्री. चद्रकांत फाळके मामा यांना पुष्पमाला अर्पण करण्याचा मान देण्यात आला. मा.नगरसेवक श्री. सुभाष साळुंके यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात पोवाडे व घोषणांनी परिसर दणाणून गेला. यावेळी श्री. सुभाष साळुंके यांच्या सोबत  मा.नगरसेवक श्री. रविंद्र करंजुले,संवाद फाऊंडेशन अध्यक्षा सौ. सुवर्णा साळुंके , आम्ही रायगडकर प्रतिष्ठान चे कैलास फलके, अनेक शिवप्रेमी नागरिक, संस्था व मान्यवर उपस्थित होते. बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी सम्पर्क साधा संपादक हरी आल्हाट ९९६०५०४७२९