पोस्ट्स

संपादक हरी आल्हाट 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

श्री संत रोहिदास महाराज चौकाचे जयंती पूर्वी सुशोभिकरण मनसे चे वतीने उमपा आयुक्तांचे आभार

इमेज
श्री संत रोहिदास महाराज चौक चौकाचे जयंती पूर्वी सुशोभिकरण मनसे चे वतीने उमपा आयुक्तांचे आभार   उल्हासनगर कॅम्प 3 मधील  क्रिटिकेयर हॉस्पिटल समोर श्री.संत रोहिदास महाराज चौकाची मोठया प्रमाणात दूरअवस्था झाली होती .या बाबत मनसेच्या वतीने वारंवार लेखी व तोंडी पाठपुरावा सुरु होता  5 फेब्रुवारीला श्री संत रोहिदास महाराज यांची जयंती आहे व या जयंतीच्या अगोदर या चौकाचे सुशोभिकारण करण्यात यावे अशी मनसेची मागणी होती जर 5 फेब्रुवारी पर्यंत या चौकाचे सुशोभिकरण केले नाही तर जयंतीच्या दिवशी याच चौकात मनसेच्या वतीने लक्षणिक उपोषण करण्यात येणार होते परंतु मा.आयुक्त अजीज शेख, शहर अभियंता प्रशांत सोळंकी,उपाभियंता संदीप जाधव यांनी 5 फेब्रुवारी पर्यंत जयंती पूर्वी या चौकाच्या सुशोभीकरणाचे काम पूर्ण करण्यात येईल असे लेखी आश्वसन दिले होते व ते प्रधान्याने पूर्ण केल्या बद्दल मनसे शहर अध्यक्ष बंडू देशमुख यांनी मा.आयुक्त,शहर अभियंता व उपाभियंता यांचे आभार मानले .या साठी जिल्हा सचिव संजय घुगे,उपशहर अध्यक्ष मुकेश सेठपलांनी,शैलेश पांडव,सचिन बेंडके,सुभाष हटकर,अनिल ज

राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 ने बबन सहदेवराव नागले सर सन्मानित

इमेज
राज्यस्तरीय महात्मा फुले आदर्श शिक्षक पुरस्कार 2022 ने बबन सहदेवराव नागले सर सन्मानित संपूर्ण महाराष्ट्रात प्रसारित होणारे मासिक, शिक्षण संवेदन मासिक (अनुराग प्रकाशन) वतीने १५ वा वर्धापन दिनानिमित्त राज्यस्तरीय पुरस्कार सोहळ्याचे आयोजन शिवजयंती दिनी १९ फेब्रुवारी २०२२ रोजी अचार्य अत्रे नाट्यगृह कल्याण येथे करण्यात आले. पुरस्कार सोहळ्याची सुरुवात दीपप्रज्वलन, भारतीय संविधान पूजन व शिवजयघोषाने प्रमुख अतिथींच्या हस्ते करण्यात आली. शिक्षक बबन सहदेवराव नागले हे मूळ खडका, वरुड जिल्हा: अमरावती गावचे रहिवाशी असून नॅशनल हायस्कूल, उल्हासनगर  येथे पर्यवेक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची एकूण सेवा २७ वर्ष पूर्ण झाली आहे. तसेच ते  महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शारीरिक शिक्षण शिक्षक महामंडळ अमरावती जिल्हा शाखा ठाणे, चे सचिव व नाशिक विभागाचे अध्यक्ष आहेत, समाज प्रबोधन ग्रंथालय चे अध्यक्ष,  बोधिवृक्षशिक्षण संस्था अध्यक्ष, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सक्रिय कार्यकर्ते.आर. एस. पी. अधिकारी, उल्हासनगर अशा विविध पदांवर काम करत आहेत. बबन सहदेवराव नागले करत असल