पोस्ट्स

सप्टेंबर, २०२२ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

शिवसंग्राम चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ - नागपूर ऑफिस ला निवेदन सादर

इमेज
शिवसंग्राम चित्रपट सांस्कृतिक विभागाच्या वतीने अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ - नागपूर ऑफिस ला निवेदन सादर शिवसंग्राम चित्रपट व सांस्कृतिक विभाग चे वतीने विदर्भ नागपूर येथे बैठक घेण्यात आली शिवसंग्राम चित्रपट व  सांस्कृतिक विभागाच्या विदर्भ अध्यक्षा राधिका उर्फ मंगलाताई ठक यांच्या नेतृत्वात  राष्ट्रीय अध्यक्ष डॉ ज्योतीताई मेटे महाराष्ट्र प्रदेशअध्यक्ष तानाजीराव शिंदे सुप्रसिद्ध डायरेक्टर आणि शिवसंग्राम चित्रपट सांस्कृतिक विभाग महाराष्ट्र राज्य अध्यक्ष  दीपक कदम यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक घेण्यात आली .या वेळी विदर्भातील नागपूर विभागाची व नागपूर जील्याचया काही लोकांची सदस्य म्हणून  नियुक्ती करण्यात आली  सदस्य आदित्य कापसे , अविनाश अरोरा, लीना पाटील , निकिता पानतावणे , विद्या खोब्रागडे , कल्पेश चव्हाण  यांची नियुक्ती करण्यात आली . सोबतच नागपूर मध्ये चित्रपट सृष्टीमध्ये काम करणाऱ्या लोकांना काय अडचणी येतात व चित्रपट सृष्टी मध्ये काम करणाऱ्या लोकांसाठी काय मदत करता येईल या विषयावर चर्चा करण्यात आली . नागपूर येथील चित्रपट महामंडळाचे ऑफिस फारच छोटे आहे आणि नागपूर विभाग हा

उल्हासनगर मध्ये इमारत दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्याना वाहिली श्रध्दांजली

इमेज
उल्हासनगर मध्ये इमारत दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्याना   वाहिली श्रध्दांजली   उल्हासनगर कॅम्प नंबर ५ मध्ये  इमारतीचा स्लॕब कोसळून  या   दुर्घटनेत चार निष्पाप जिवांचा बळी गेला होता  त्या मृतात्म्यांना   भावपूर्ण श्रध्दांजलीचा कार्यक्रम हा सोमवार दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी  काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार, यांनी  आयोजन केला होता. या प्रसंगी लोकनेते पप्पू कालानी,  उद्योगपती महेश प्रकाश आहुजा, माजी नगरसेवक किशोर वनवारी, काँग्रेस चे शहर जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष सविता जाधव , महासचिव ताराचंद्र तायडे, राधाचरण करोतिया, काँग्रेस सेवादलच्या फातिमा खान, निलम पांडे, दिनेश  लहरानी , महेश्वरी शेट्टी, इंद्रायणी नेतकर, कमल सोनवणे, अशोक गोपलानी, मुन्ना श्रीवास्तव , अनिल यादव, गणेश मोरे, बाबू आढाव, आबा साहेब साठे, लालचंद तिवारी,  राष्ट्रवादीचे  कमलेश निकम, शिवाजी रगडे, जलीलभाई खान, यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी इमारत दुर्घटनेत मरण पावलेल्या मृतात्म्यांना भावपूर्ण  श्रध्दांजली वाहिली , या वेळी  इ

मोनालीसा आणि निखिलची जमली जोडी ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

इमेज
मोनालीसा आणि निखिलची जमली जोडी  ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित प्रेम म्हणजे नाजूक, अलवार अनुभूती. अर्थात प्रेम करणे सोपे पण निभावणे अतिशय कठीण. त्यातही पहिल्या प्रेमाची तर बातच न्यारी... प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवणाऱ्या ‘तू फक्त हो म्हण’ या चित्रपटातून मोनालीसा बागल आणि निखिल वैरागर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एन एच स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचा दिमाखदार पोस्टर अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना मोनालीसा आणि निखिल म्हणाले कि, एक उत्तम चित्रपट करायला मिळाल्याचा आम्हांला आनंद आहे. यातील कथा व गाणी प्रत्येकाच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करतील. या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ.गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव म्हणाले की, ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अनुभवलेली प्रेमकथा आम्ही प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. आमच्या या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच दाद देतील. येत्या १४ ऑक्टोबरला ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वैभव आणि पूजा पुन्हा एकत्र

इमेज
*वैभव आणि पूजा पुन्हा एकत्र* कलाकारांच्या काही जोडया खूप हीट होतात. मोठ्या पडद्यावर झळकलेल्या अशा काही जोडया आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत जोडी ही त्यापैकीच एक. प्रेक्षकांची मने जिंकलेली ही जोडी परत एकत्र कधी येणार? याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असतेच. वैभव आणि पूजा या जोडीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.   ‘हॅण्डसम’ वैभव तत्ववादी आणि ‘ब्युटीफुल’ पूजा सावंतची लव्हेबल केमिस्ट्री परत एकदा जुळणार आहे. पण ही जोडी कशासाठी एकत्र येतेय? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे या दोघांनी पुन्हा एकत्र काम करणार असल्याचे संकेत दिले आहेत. चित्रपट, अल्बम, जाहिरात यापैकी कोणत्या माध्यमातून ही जोडी एकत्र येणार याची खूप उत्सुकता शिगेला पोहचली  असली तरी बऱ्याच कालावधीनंतर ही जोडी एकत्र येणार असल्याने चाहत्यांना नक्कीच आनंद होणार आहे. लवकरच हे दोघे त्यांच्या या आगामी प्रोजेक्टची घोषणा करणार आहेत. प्रतिनिधी गणेश तळेकर जनहित न्युज महाराष्ट्र मुंबई  बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी

संतोष आणि पूर्वाचे ‘३६ गुण’ जुळणार

इमेज
*संतोष आणि पूर्वाचे ‘३६ गुण’ जुळणार* लग्न जुळवताना ‘३६ गुण’ पाहिले जातात. दोनजणांमध्ये वाद किंवा भांडण असेल तेव्हा दोघांमध्ये ‘३६’ चा आकडा आहे असं म्हटलं जातं. तर अशा या ‘३६’ आकडयाने अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे. समित कक्कड दिग्दर्शित आगामी ‘३६ गुण’ या चित्रपटात संतोष जुवेकर व पूर्वा पवार हे दोघे कलाकार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. तरुण पिढीच्या दृष्टीकोनातून भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा मनोरंजक चित्रपट आहे. मुंबई आणि लंडनमधील तब्बल ९० नयनरम्य लोकेशन्सवर हा चित्रपट चित्रीत झालेला असल्याने आतापर्यंत न पाहिलेले लंडन आणि वेगळा विषय ही प्रेक्षकांसाठी ‘स्पेशल ट्रीट’ ठरणार आहे. येत्या ४ नोव्हेंबरला ‘३६ गुण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घरदारं बघून चहा पोह्यांचा रीतसर कार्यक्रम करून, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने विवाह झालेले, सुधीर आणि क्रिया त्यांचा मधुचंद्र लंडनला करायचा ठरवतात आणि तिथे पोहचल्यावर मात्र त्यांना एकमेकांमध्ये दिसणाऱ्या गुण-अवगुणांची, आपआपसातील वेगळेपणाची

पीडब्ल्यूडीच्या शाखा अभियंत्याचा प्रतापमलबार हिल सेवा केंद्रात बेकायदा कर्मचा-यांची घुसखोरी

इमेज
पीडब्ल्यूडीच्या शाखा अभियंत्याचा प्रताप मलबार हिल सेवा केंद्रात बेकायदा कर्मचा-यांची घुसखोरी मुंबई ; संगणकीय कामासाठी एखादा कर्मचारी नेमण्याचा अधिक असताना मलबार हिल सेवा केंद्रातील शाखा अभियंत्याने आपल्या कार्यालयात एका तरुणीसह चार  कर्मचा-यांची बेकायदा भरती-नियुक्ती केल्याचा प्रकार उजेडात आला आहे. त्या शाखा अभियंत्याचे नाव ओमप्रकाश पवार असे आहे. त्यांनी केलेल्या नियमबाह्य आणि अनावश्यक नियुक्त्यांमुळे सरकारच्या पर्यायाने जनतेच्या पैशाचा अपव्यय होत आहे, अशी तक्रार करतानाच त्या नियुक्त्या त्वरित रद्द कराव्यात,  अशी मागणी बहुजन संग्रामने केली आहे. संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष भीमराव चिलगावकर यांनी त्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते अजित पवार, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, मुख्य सचिव, अतिरिक्त मुख्य सचिव, सार्वज्निक बांधकाम विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग प्रादेशिक विभाग, मुंबईचे मुख्य अभियंता आर. आर. हांडे यांना निवेदने सादर केली आहेत. शाखा अभियंता ओमप्रकाश पवार यांनी 1) विर्झा पव

वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेरवाताई ठाकुर यांचा उल्हासनगर व अंबरनाथ शहरात दौरा

इमेज
वंचित बहुजन आघाडीच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेरवाताई ठाकुर यांचा  उल्हासनगर व अंबरनाथ शहरात दौरा  उल्हासनगर :  वंचित बहुजन आघाडीच्या  महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा रेरवाताई  ठाकुर यांचा  महाराष्ट्रभर दौरा करीत आहेत तसेच रविवार दि. २५ सप्टेंबर २०२२ रोजी दुपारी  ३ वा , उल्हासनगर आणि अंबरनाथ येथे सत्ता संपादन मेळाव्यात  येणार  वंचितच्या प्रदेश अध्यक्षा रेरवाताई ठाकुर  यांचा उल्हासनगरात  स्वागत व सत्कार सोहळा  आणि बाईक  रॕली चे आयोजन सुध्दा करण्यात आले आहे   उल्हासनगर शहरातील सर्व वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी महिला आघाडी आणि तरुण युवा कार्यकर्ते मोठ्या संख्येने अंबरनाथ येथे सत्ता संपादन मेळाव्यात उपस्थित राहावे असे जाहीर आवाहन वंचित चे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष शेषराव वाघमारे व ठाणे जिल्हा नेते सारंग जी थोरात, यांनी केले आहे प्रतिनिधी अशोक शिरसाठ जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महापालिका आयुक्तांना जाब विचारण्यात आला की.

इमेज
*महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने आज महापालिक आयुक्तांना जाब विचारण्यात आला की...* उल्हासनगर शहरात सातत्याने कोसळणाऱ्या इमारती व या दुर्घटनेत जाणारे निष्पाप नागरिकांचे बळी हे कधी थांबणार.. अजून किती बळी गेल्यानंतर सरकार या धोकादायक इमारतींन बाबत निर्णय घेणार आहे. उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी तत्कालीन पालक मंत्र्यांनी कमेटी स्थापन करून आज जवळपास वर्ष हॊत आलाय निर्णय कधी. उल्हासनगर शहरातील धोकादायक इमारतींन बाबत मा.मुख्यमंत्र्यानी विधानसभेत घोषणा करून महिना उलटला तरी अजून आदेश नाही. इमारत पडली की सर्व राजकारणी व प्रशासनाचे अधिकारी येतात हळहळ व्यक्त करतात पण हे थांबणार कधी.. उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित कसरण्याची प्रक्रिया त्वरित सुरु करण्यात यावी.. उल्हासनगर शहरातील अनधिकृत बांधकामे नियमित करण्यासाठी लावल्याजाणारी दंडाची रक्कम ही सन 2016 च्या रेडिरेकणरच्या 50% टक्के आकारण्यात यावी. यासह मनसेच्या वतीने इतर मागण्यावर ही चर्चा करण्यात आली अशी माहिती बंडू देशमुख यांनी दिली

पाणीटंचाईच्या विरोधात उल्हासनगर महानगरपालिकेवर शिवसेनेचा धडक मोर्चा

इमेज
पाणीटंचाईच्या विरोधात उल्हासनगर महानगरपालिकेवर शिवसेनेचा धडक मोर्चा  प्रभाग क्रमांक 15 मध्ये जाणवत असलेल्या पाणीटंचाई, तसेच कमी दाबाने पाणीपुरवठा आणि अनियमितता होत असल्याने, सर्वसामान्य नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत, या सर्व गोष्टींचा जाब विचारण्यासाठी शिवसेना प्रभाग क्रमांक 15 तर्फे उल्हासनगर महानगरपालिकेवर दिनांक 23 सप्टेंबर 2022 रोजी पाणीटंचाईच्या विरोधात धडक मोर्चा काढण्यात आला,. प्रतिनिधी अशोक शिरसाट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

मारुती सुझुकी चे डीलर महेश प्रकाश आहुजा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सीमा महेश आहुजा यांच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर 1वाहतूक विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच वार्डन कर्मचारी यांना बॅग व पेन वाटप

इमेज
मारुती सुझुकी चे डीलर महेश प्रकाश आहुजा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सीमा महेश आहुजा यांच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर 1या ठिकाणी वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी गायकवाड यांना भेट देवून उल्हासनगर मधील ट्रॅफिक वर नियंत्रण करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच वार्डन कर्मचारी यांना एक बॅग व पेन वाटप करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

उल्हासनगर मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू .

इमेज
उल्हासनगर मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू . उल्हासनगर  कॅम्प नंबर 5, मधील  कपलेश्वर महादेव मंदिर जवळ ओटी सेक्शन मध्ये मानस टॉवर सोसायटी चा स्लैब कोसळला असून या दुर्घटनेमध्ये चार जण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळी उल्हासनगर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशामक विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस अधिकारी कर्मचारी पोहोचले व स्लॅबच्या ढिगार्‍याखाली दबलेल्या . सागर ओचानी वय वर्ष 19, रेणू ढोलनदास धनवाणी वय वर्ष 55,  ढोलनदास धनवाणी वय वर्ष 58, प्रिया धनवाणी वय वर्ष 24, यांचा मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे, घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस अधिकारी व कर्मचारी उल्हासनगर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी पोहोचले असून पुढील कार्य सुरू आहे, ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर

मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु,

इमेज
मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु ,  मान्सूनचा माघारीचा प्रवास सुरु, महाराष्ट्रातील 'या' भागांत जोरदार बरसणार नवी दिल्ली :  नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनने आज आपला परतीचा प्रवास सुरु केला आहे.  मान्सून  दि. २० सप्टेंबर राजस्थानचा नैऋत्य भाग आणि कच्छच्या काही भागांतून माघारी परतला आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागराचा वायव्य भाग आणि उत्तर ओडिशा-पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे. यामुळे ओडिशा, छत्तीसगड, महाराष्ट्रातील विदर्भ आणि मध्य प्रदेशातील पूर्व भागात पुढील २-३ दिवसांत जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. सर्वसाधारणपणे मान्सून राजस्थानच्या नैऋत्य भागातून १७ सप्टेंबरपासून परतीचा प्रवास सुरु करतो. पण यंदा तीन दिवस अधिक सक्रिय राहून मान्सूनने माघारीचा प्रवास सुरु केला आहे. तसेच छत्तीसगड आणि महाराष्ट्रातील मराठवाड्यात २२ ते २३ दरम्यान आणि मध्य महाराष्ट्रात २१ ते २२ दरम्यान जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाने म्हटले आहे साडेतीन महिन्यांचा मुक्काम ठोकून सर्व देशाला भरपूर पाऊस देऊन मान्सून अखेर परतीच्या प

मुलांची खरेदी करणाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल

इमेज
ठाणे आणि पालघर  जिल्ह्यातून मुलांची विक्री होत असल्याच्या बातम्या समोर आल्या आहेत. तेही अवघ्या ५०० रुपयांत. या दोन जिल्ह्यांतून विकल्या गेलेल्या 4 मुलांपैकी 3 मुलांची सुटका करण्यात आली आहे. या प्रकरणी मुलांची खरेदी करणाऱ्यांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, मुलाचा शोध सुरू आहे. पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार, इतर जिल्ह्यातील लोक ठाणे, पालघरमध्ये येऊन आदिवासी संकुलात राहणाऱ्या गरीब कुटुंबांना टार्गेट करतात. कुटुंबातील सदस्यांना सांगितले जाते की ते त्यांच्या मुलाची किंवा मुलीची विशेष काळजी घेतील आणि इतकेच नाही तर ते त्यांच्या मुलांच्या बदल्यात आईला पैसे देखील देतील. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही रक्कम अत्यल्प आहे. काहींना 500 तर काहींना 1000 रुपये दिले जातात. एकदा सोबत घेतल्यावर त्या मुलांना घरातील बरीच कामे करायला लावतात. खरेदीदारही मुलांना शारीरिक व मानसिक छळ करतात. गेल्या तीन दिवसांत 4 मुलांची विक्री झाल्याची माहिती पोलीस आणि कार्यकर्ती संस्थेने दिली असून, यापैकी पोलीस आणि संस्थेने मिळून 3 मुलांचा शोध घेऊन त्यांना त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात दि

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या नवनिर्वाचित प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्ष यांची राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठक

इमेज
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाच्या नवनिर्वाचित प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्ष यांची राज्यस्तरीय कार्यकारिणी बैठक  टिळक भवन, दादर मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अनुसूचित जाती विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा.सिद्धार्थ जी हत्तीअंबीरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली.*   *या बैठकीला समस्त महाराष्ट्र राज्यातून आलेल्या सर्व प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष व शहर जिल्हाध्यक्ष यांच्याशी पक्ष संघटन व राज्यात आगामी होऊ घातलेल्या निवडणूका तसेच देशाचे नेते मा.राहुल जी गांधी यांच्या महाराष्ट्रातुन जाणाऱ्या भारतजोडो पदयात्रा संदर्भात संवाद साधला.  या प्रसंगी समस्त  पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी अब्बा साहेब साठे जनहित न्युज महाराष्ट्र  बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा संपादक हरी चंदर आल्हाट 

राज्यातील १७५ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपाचा दावा खोटा !: नाना पटोले

इमेज
राज्यातील १७५ ग्रामपंचायतीमध्ये काँग्रेसचा विजय; भाजपाचा दावा खोटा !: नाना पटोले महाराष्ट्र कमकुवत करुन गुजरातच्या विकासाला हातभार लावू नका देवेंद्र फडणवीस, तुम्ही महाराष्ट्राचे नेते आहात का गुजरातचे ? मुंबई, दि. २० सप्टेंबर राज्यात झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या निकालाबाबत भारतीय जनता पक्ष खोटी माहिती देऊन विजयाचा दावा करत आहे तो चुकीचा आहे. काँग्रेस पक्षासह महाविकास आघाडीच्या घटक पक्षांना या निवडणुकीत घवघवीत मिळाले असून काँग्रेस पक्षाला १७५ ग्रामपंचायतींमध्ये घवघवीत विजय मिळाला आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी स्पष्ट केले आहे. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना पटोले म्हणाले की, ग्रामपंचायत निवडणुक निकालावर भाजपाचा आयटी सेल चुकीची माहिती देत आहे आणि त्यावर भाजपा मोठ्या विजयाचा दावा करत आहे तो धादांत खोटा आहे. सर्वात जास्त जागा जिंकल्याचा दावा करून भाजपा स्वतःच स्वतःची पाठ थोपटवून घेत आहे. आम्ही सर्व जिल्ह्यातून माहिती घेतली असताना काँग्रेस पक्षाला घवघवित यश मिळालेले स्पष्ट दिसत आहे. काँग्रेस पक्षावर लोकां

अंबरनाथ: नगरसेवक सुभाष साळुंके यांनी मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ यांच्या कडे केली मागणी

इमेज
नगरसेवक सुभाष साळुंके यांनी मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ यांच्या कडे केली मागणी अंबरनाथ शहरात अमृत अभियाना अंतर्गत जून्या व वाढीव क्षेत्रात अद्यावत भुयारी गटार योजना टप्पा -3 योजना राबविणे करिता शासनाकडे प्रस्ताव पाठविण्याची नगरसेवक सुभाष साळुंके यांनी मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ यांच्या कडे केली मागणी अंबरनाथ शहरात अनेक ठिकाणी जुन्या भुयारी गटार योजना कुचकामी ठरली आहे, चेंबर्स नव्याने बांधणे, भुयारी लाईन टाकने, वाढीव क्षेत्रात भुयारी गटार योजना राबविणे इ. बाबत लोकप्रतिनिधी व नागरिक यांच्या कडून मागणी होत आहे, याकरिता संपूर्ण शहराचा आवश्यक ठिकाणी भुयारी गटार योजनेचा सविस्तर प्रकल्प अहवाल (प्रस्ताव आराखडा DPR) तयार करण्यात यावा, सदर प्रस्ताव अमृत अभियाना अंतर्गत शासनाकडे निधी मागणी करिता पाठविण्यात यावा,अशी मागणी निवेदनाद्वारे नगरसेवक सुभाष साळुंके यांनी मुख्याधिकारी डॉ.प्रशांत रसाळ यांच्याकडे आमदार डॉ.बालाजी किणीकर यांच्या उपस्थितीत केली.संबंधित भागाचा सर्व्हे करताना लोकप्रतिनिधींना,नागरीकांना सूचित करावे,असे सुभाष साळुंके यांनी सूचना केली. यावेळी उ