पोस्ट्स

सप्टेंबर, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंके यांची सोलापूर जिल्हातील माढा, माळशिरस, करमाळा व सांगोला विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली

इमेज
माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंके यांची सोलापूर जिल्हातील माढा, माळशिरस, करमाळा व सांगोला विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली शिवसेना पक्ष मुख्यनेते, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री  एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने, कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या सूचनेनुसार , शिवसेना सचिव संजय मोरे यांनी अंबरनाथचे अभ्यासू व कार्यक्षम माजी नगरसेवक सुभाष नारायण साळुंके यांची सोलापूर जिल्हातील माढा, माळशिरस, करमाळा व सांगोला विधानसभा संपर्कप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बाळासाहेब भवन येथे नियुक्ती पत्र देऊन शुभेच्छा दिल्या. यावेळी शिवसनेचे उपनेते ॲड. अरूण जगताप, शिवसेना प्रवक्ते अरूण सावंत,सहसचिव एकनाथ शेलार, कार्यालयीन पदाधिकारी पांडुरंग पाटील उपस्थित होते.

बहुजन संग्रामच्या अध्यक्षा व व्रूत्तदर्शन मिडीयाच्या चिफ रिपोर्टर अनुराधा चौधरी यांच्या घरी ज्येष्ठा गौरीचे (महालक्ष्मी)विधीवत पुजन

इमेज
बहुजन संग्रामच्या अध्यक्षा व व्रूत्तदर्शन मिडीयाच्या चिफ रिपोर्टर अनुराधा चौधरी यांच्या घरी ज्येष्ठा गौरीचे (महालक्ष्मी)विधीवत पुजन पुणे: बहुजन संग्राम या सामाजिक,विधायक महाराष्ट्र व्यापक,सेवाभावी व मानवतावादी संघटनेच्या राष्टीय अध्यक्षा व व्रूत्तदर्शन मिडीया या राज्यस्तरीय व्रूत्तसंस्थेच्या चिफ रिपोर्टर श्रीमती अनुराधा चौधरी यांच्या पुणे आंबेगाव बु॥ येथील निवासस्थानी गेल्या २५ वर्षांचा वारसा जपत ज्येष्ठा व कनिष्ठा गौरींचे विधीवत पुजन करण्यात आले  दरवर्षीप्रमाणे या वर्षी देखील दि.२१ सप्टेंबर २०२३ गूरूवार रोजी ज्येष्ठा गौरीचे आवाहन करण्यात आले असून शुक्रवारी अनुराधा नक्षत्रावर  गोडधोड नैवैद्य दाखवून अतिशय ऊत्साहपूर्ण वातावरणांत मोठ्याथाटामाटात गौरींचे विधिवत पुजन करण्यात आले .दि.२३ सप्टेंबर शनीवार रोजी मुळ नक्षत्र असल्याने सोनपावलांनी वाजत गाजत माहेरी आलेल्या गौरींचे अतिशय जडअंत:करणाने विसर्जन करण्यात आले. या शुभप्रसंगी बहुजन संग्रामचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,व्रूत्तदर्शन मिडीयाचे संपादक व अनुराधा चौधरी यांच्या कुटूंबाचे गेल्या १५ वर्षापा

बहुजन संग्रामच्या नेत्यारंजनाताई कांबळे यांचे निधन

इमेज
बहुजन संग्रामच्या नेत्या रंजनाताई कांबळे यांचे निधन मुंबई: 'बहुजन संग्राम' या संघटनेच्या महिला आघाडीच्या राज्य प्रमुख रंजनाताई कांबळे (६२) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानंतर आज रविवारी ( २४ सप्टेंबर) सकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. त्यांना डोंबिवली येथील एका खासगी रुग्णालयात शनिवारी दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. रंजनाताई कांबळे या भारतीय बौद्ध महासभेच्या कांदिवली ( पूर्व) क्रांती नगर शाखेच्या कोषाध्यक्ष होत्या. स्थानिक धम्मक्रांती महिला उत्कर्ष मंडळाच्या त्या अध्यक्षही होत्या.त्यांनी २०११ मध्ये भारिप- बहुजन महासंघाच्या उमेदवार म्हणून मुंबई महानगर पालिकेची निवडणूक लढवली होती. त्या मूळच्या जालना जिल्ह्यातील केंधळी (ता. मंठा) येथील होत्या. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याच्या काळात दलित मुक्ती सेनेच्या विलेपार्ले येथील सम्राट अशोक नगर शाखेत त्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या.  त्यांच्यापाठी दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

शांतीदूत विश्वकर्मी डॉ विश्वनाथ कराड यांच्याकडून मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा गौरव.

इमेज
*शांतीदूत विश्वकर्मी डॉ विश्वनाथ कराड यांच्याकडून मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा गौरव.* पुणे ( विशेष प्रतिनिधी) भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा वारसा जपण्यात योगदान असणारे, महाराष्ट्राभूषण व्यक्तिमत्व, तत्वज्ञानी, विश्वकर्मी शांतीदूत,पाच विद्यापीठाचे संस्थापक,एम आय टीचे संस्थापक डॉ प्रा विश्वनाथ दा कराड यांनी कोथरुड शैक्षणिक संकुलात लातूर चे लोकप्रिय, संसद रत्न,कार्यसम्राट माजी खासदार,प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा स्मृती चिन्ह आणि मानाची शाल देऊन यथोचित गौरव केला. डॉ विश्वनाथ कराड यांनी माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी २०१४ ते २०१९ या काळात केलेल्या कामाचे कौतुक करुन उच्च शिक्षित खासदार म्हणून अनेक केंद्र सरकार च्या विकास कामाच्या योजना आणि विशेष म्हणजे लातूर ला आणि नांदेड ला NEET परीक्षा केंद्र आणि पासपोर्ट सेवा केंद्र आणि रेल्वे बोगी कारखाना आणि सुपर स्पेशिलिटी हॉस्पिटल असे अनेक लोकउपयोगी काम केल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पुढील काळासाठी डॉ सुनील गायकवाड यांना शुभेच्छा देऊन अत्यंत आनंदानी विद्यापीठ कॅम्पस मधे गौरव करुन शुभेच्छा दिल्या. शिक्षक दिनाच्

स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत "स्वच्छता ही सेवा मोहिम

इमेज
स्वच्छ भारत अभियान (नागरी) अंतर्गत "स्वच्छता ही सेवा मोहिम उल्हासनगर महानगरपलिका तर्फे आयुक्त  अजीज शेख, अतिरिक्त आयुक्त जमीर लेंगरेकर, यांच्या संकल्पनेतून व उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, तसेच मनीष हिवरे, एकनाथ पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश विसर्जन घाट बोट क्लब हिराघाट उल्हासनगर 03  येथे येणारे गणेश भक्त यांच्या गणेश मूर्ती सोबत येणाऱ्या निर्माल्य तसेच सदर घाट वर निर्माण होणाऱ्या कचरा  इत्यादी जसे की ओला निर्माल्य हार फुल पासून खत निर्मिती तसेच सुका निर्माल्य प्लास्टिक, कापडी, इत्यादी पुनःवापर करणे साठी वर्गीकरण करून शहरातील नागरिकांना  उपायुक्त डॉ. सुभाष जाधव, यांचे बातमी द्वारे कचरा मुक्त मोहीम बाबत जनजागृती जागृती करण्यात आली  तसेच सदर मोहिमेत सहभागी  स्वयं सेवी संस्था वृक्ष फाऊंडेशन तर्फे श्रीमती ज्योती तायडे, यांच्या टीम द्वारे पथनाट्य द्वारे जनजागृती करण्यात आली व सदर मोहिमेत बी एम. करोतिया, सखी सामाजिक संस्था तर्फे सिमरन लाजवनी,समाज सेवक परमानंद गिरेजा,समाज सेवक राजू तेलकर, एस.एच.एम महाविद्यालय, व वेदांता महाविद्यालय चे NSS वि

रिया गायकवाड अमेरिकेच्या विद्यापीठात सिनेट निवडणुकीत प्रचंड मतानी विजयी

इमेज
*रिया गायकवाड अमेरिकेच्या विद्यापीठात सिनेट निवडणुकीत प्रचंड मतानी विजयी* लातूर चे माजी खासदार प्रोफ़ेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांची पुतणी रिया विजयकुमार गायकवाड ही अमेरिकेच्या न्यूयॉर्क  येथील बफेलो यूनिवर्सिटी मध्ये बॅचलर ऑफ बायोमेडिकल च्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत आहे. विद्यापीठाच्या सिनेट निवडणुकीत रिया विजयकुमार गायकवाड ही प्रचंड मतानी विजयी झाली आहे. बारा सदस्या साठी निवडनुक झाली होती.  या बारा मधे भारतीय दोन विद्यार्थी आहेत. त्यात रिया गायकवाड ही निवडून आली आहे. तिच्या निवडीबद्दल तिचे कौतुक होत आहे. लातूर च्या वाले इंग्लिश मिडीयम मध्ये प्राथमिक आणि हायस्कूल चे शिक्षण घेतली असून,वर्गामध्ये नेहमी पहिली येणारी विद्यार्थीनी ... ती कॉलेज ला शिकत असताना रोटरीच्या माध्यमातून सोशल वर्क केली आहे.  .                        ( रिया गायकवाड ) काहीतरी वेगळे शिक्षण घेतले पाहिजे म्हणून भविष्यात ज्या शिक्षणाची गरज भासणार आहे असे बायोमेडिकल शिक्षण निवडले आणि जगातली सर्वात चांगली बफेलो यूनिवर्सिटी मधे तिने आपल्या बुद्धिच्या जिवावर प्रवेश मिळवला. आणि लातूर ची मुलगी सात सम

मंगळागौर कार्यक्रम साजरा

https://youtu.be/dai_UoWQc9I?si=dHY7UH2zj8Ii2LZw उल्हासनगर समृद्धी सामाजिक संस्था व लालगड शाखा यांच्या वतीने मंगळागौर कार्यक्रम साजरा सूत्रसंचालिका/अभिनेत्री राजश्री काळे निवेदिका ज्योत्स्ना केदारे प्रतिनिधी हर्षद पठाडे एडिटर हरी आल्हाट कॅमेरा आदित्य आल्हाट  *गणेश उत्सवानिमित्त*   *जनहित न्यूज महाराष्ट्र आपल्या घरी*  गणेशोत्सव 2023 निमित्त घरगुती गणेशोत्सवाचे देखावे जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलवर दाखविण्यात येतील आपल्या घरगुती गणेशोत्सव देखाव्याचे फोटो व्हिडिओ आम्हाला पाठवा किंवा जनहित न्यूज महाराष्ट्र टीमला संपर्क साधा 9960504729 बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्या करिता संपर्क साधा 9960504729