पोस्ट्स

जनहित न्युज महाराष्ट्र 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

महानगर पालिका वसाहती मध्ये राहतं असलेल्या सफाई कामगार यांना मिळणार मालकी हक्काचं घर..उ म पा आयुक्त यांनी दीले आश्वासन

इमेज
महानगर पालिका वसाहती मध्ये राहतं असलेल्या सफाई कामगार यांना मिळणार हक्काचं घर..उ म पा आयुक्त यांनी दीले आश्वासन   उल्हासनगर प्रतिनिधी. दिनांक १७/०८/२०२२ रोजी उल्हासनगर महानगरपालिकेतील सफाई कर्मचारी यांच्या हक्काच्या घराबाबत प्रलंबित असलेले प्रकरण घेऊन हरि चंदर आल्हाट यांनी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे यांना निवेदन देण्यात आले होते   त्या निवेदनाची दखल घेऊन कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे कोकण विभागीय अध्यक्ष नितीन साळवे कोकण विभागीय सचिव आनंद भाऊ गांगुर्डे व हरि चंदर आल्हाट तसेच त्यांचे सहकारी यांनी उल्हासनगर महानगर पालिका आयुक्त अजीज शेख यांना उल्हासनगर महानगर पालिका वसाहती मध्ये राहतं असलेल्या सफाई कर्मचारी यांना हक्काची घरे देण्यात यावी असे लेखी पत्र देवून विनंती केली असता तत्काळ आयुक्त साहेब यांनी उप आयुक्त व संबधित अधिकारी यांना आदेश दिलें की लवकरात लवकर सफाई  कामगारांच्या मालकी हक्काच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी आदेश देण्यात आले.

प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी जिजाऊ संघटनेचा उपोषणाला प्रारंभ, निलेश सांबरे प्रकल्पग्रस्तांच्या सोबत बसले उपोषणाला

इमेज
प्रकल्पग्रस्तांच्या न्यायहक्कासाठी जिजाऊ संघटनेचा उपोषणाला प्रारंभ, निलेश सांबरे प्रकल्पग्रस्तांच्या सोबत बसले उपोषणाला पालघर : जिल्ह्यातील प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या न्यायहक्कासाठी तसेच शासनाने नमूद केलेल्या नागरी सुविधांपासून वंचित राहिलेल्या घटकांसाठी प्रशासनाच्या विरोधात जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे, त्यांचे सहकारी व प्रकल्पग्रस्त नागरिक यांनी आज मंगळवार दिनांक 28 फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालय पालघर या ठिकाणी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला असून उपोषणाच्या आजच्या पहिल्याच दिवशी हजारो प्रकल्पग्रस्त तसेच अनेक सामाजिक संघटना कार्यकर्ते व पालघर जिल्ह्यातील अनेक नागरिकांनी जाहिर पाठिंबा देत उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.निलेश सांबरे व सहकाऱ्यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करून उपोषणाचा पहिल्या दिवसाचा प्रारंभ झाला. पालघर जिल्हा म्हणजे सागरी,नागरी आणि डोंगरी या तिन्हींचा संगम या डोंगराळ भागात प्रामुख्याने आदिवासी वस्ती जास्त असल्याने आदिवासींचा जिल्हा म्हणून महाराष्ट्रात ओळख आहे. आदिवासींचा जिल्हा असल्यामुळे आदिवासी उपाययोजनेमधून आजपर्यंत अनेक प्रकल्प या जिल्ह्

स्टार,लेखकाचा कुत्रा,मानलेली गर्लफ्रेंड,बारम,आणि उकळीला मिळाला पारंगत एकांकिका सन्मान

इमेज
स्टार,लेखकाचा कुत्रा,मानलेली गर्लफ्रेंड,बारम,आणि उकळीला मिळाला पारंगत एकांकिका सन्मान . राकेश जाधव (बॉबी), अनिकेत बोले/ प्रफुल्ल आचरेकर, यश पवार/ हृषीकेत मोहिते आणि प्रशांत केणीची पारंगत दिग्दर्शक सन्मानावर मोहोर एकांकिका क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या अस्तित्व’ आयोजित ‘पारंगत सन्मान-२०३३’  मध्ये "स्टार" (जिराफ थिएटर) लेखकाचा कुत्रा (मिलाप थिएटर, पुणे), मानलेली गर्लफ्रेंड (इंद्रधनू,मुंबई) या एकांकिकेने खुल्या गटात तर मुंबईच्या महर्षी दयानंद महाविद्यालयच्या "बारम", कीर्ती महाविद्यालयाच्या "उकळी"  या एकांकिकांने आंतरमहाविद्यालयीन गटात पारंगत ठरण्याचा मान मिळवला. कलामंथन, ठाणेच्या "फ्लाईंग राणी" या एकांकिकेला खुल्या गटात तर भवन्स महाविद्यालयाच्या "घरोटं" या एकांकिकांना विशेष परीक्षक सन्मानाने गौरविण्यात आले. वर्षभरातल्या एकांकिकांमधील सर्वोत्तमतेची पोचपावती देणारा ‘पारंगत सन्मान-२०२३’ पुरस्कार सोहळा शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमीत झाला. एकांकिका क्षेत्रातल्या  सर्व नव्या दमाच्

गंगोत्री वेल्फेअर फाउंडेशन चे वतीने जनहित न्यूज महाराष्ट्रचा सन्मानपत्र देऊन सत्कार

इमेज
गंगोत्री  वेल्फेअर फाउंडेशन  चे वतीने जनहित न्यूज महाराष्ट्रचा सन्मानपत्र देऊन सत्कार उल्हासनगर: गंगोत्री वेल्फेअर फाउंडेशन चे वतीने जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल चा भारत राजवानी गंगोत्री व सोनिया धामी मॅडम यांच्या हस्ते सन्मान पत्र देवून सत्कार करण्यात आला या वेळी. अनेक मान्यवर उपस्थित होते. जनहित न्युज महाराष्ट्र चैनल चे संपादक हरी आल्हाट यांनी उल्हासनगर शहरात व महाराष्ट्र मधील तळागाळातील समाजसेवक कार्यकर्ते तसेच सेवाभावी संस्था यांच्या जनहितार्थ कार्याला प्रसारित करण्याकरिता चांगल्या प्रकारे पुढाकार घेतला आहे असे शशिकांत दायमा यांनी उपस्थित मान्यवर यांना  सांगितले,

मारुती सुझुकी चे डीलर उद्योगपती महेश आहुजा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

इमेज
 मारुती सुझुकी चे डीलर व उद्योगपती महेश आहुजा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा  उल्हासनगर: मारुती सुझुकी चे डीलर व उद्योगपती महेश आहुजा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महेश अहुजा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व आशीर्वाद देण्याकरिता. उल्हासनगर व आसपासच्या शहतील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार महेश प्रकाश आहुजा व सीमा महेश आहुजा यांनी यक्त केले

तुझी गं स्माईल...' म्हणत आलं सुमधूर प्री-वेडींग साँग

इमेज
' तुझी गं स्माईल...' म्हणत आलं सुमधूर प्री-वेडींग साँग काळानुरूप सर्व गोष्टी बदलत जातात तसे लग्नसोहळे आणि त्या निमित्ताने होणाऱ्या इतर समारंभांमध्येही मागील काही वर्षांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचं पहायला मिळत आहे. पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती आणि रुढी-परंपरांच्या पाऊलखुणा जपणाऱ्या लग्नसोहळ्यांचं स्वरूप आज खूपच भव्य-दिव्य बनलं आहे. प्री-वेडींग शूटचा ट्रेंड सध्या जोरात आहे. त्यामुळे वधू-वरामध्ये प्री-वेडींग शूटचं प्रमाण वाढलं आहे. लग्नापूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढण्यापासून सुरू झालेला हा ट्रेंड आज प्री-वेडींग साँगपर्यंत पोहोचला आहे. आजच्या सिंगल्सच्या काळात रिलीज करण्यात आलेलं 'तुझी गं स्माईल...' हे नवं कोरं सुमधूर गीत सिंगल नसून एक प्री-वेडींग साँग आहे.  फायरफ्लायची प्रस्तुती असलेलं 'तुझी गं स्माईल...' हे गाणं  अलिबागमधील नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलं आहे. या निमित्तानं संगीतप्रेमींना नेत्रसुखद लोकेशन्ससोबतच समुधूर गीत-संगीताचा आनंद लुटण्याची संधी मिळाली आहे. श्वेता बसनाक पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या गाण्याची निर्मि

रिलायन्स स्मार्ट बाझार ने 'फुलराणी’ साठी केलं मर्चंटायझिंग

इमेज
रिलायन्स स्मार्ट बाझार ने 'फुलराणी’ साठी केलं मर्चंटायझिंग प्रतिनिधी गणेश तळेकर मुंबई हिरवे हिरवे गार गालिचे...' हे बालकवींच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेले अजरामर काव्य गुणगुणत 'फुलराणी' येणार असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. 'फुलराणी'चा फर्स्ट लुक रिव्हील झाला. विनोदी शोच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर 'फुलराणी'च्या रूपात रसिकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सिनेरसिकांवर मोहिनी घालणाऱ्या 'फुलराणी'साठी रिलायन्स स्मार्ट बाझारनेही पुढाकार घेतला आहे. या चित्रपटात प्रियदर्शनीसोबत सुबोध भावे मुख्य भूमिकेत असल्याने दोघांचे खास फोटो असलेले किचेन्स, कॅाफी मग  तसेच झगा मगा मना बघा स्पेशल टी-शर्टस, शॅापिंग बॅग्ज,  कॅप्स, जॅकेट्स 'फुलराणी' साठी रिलायन्स स्मार्ट बाझारने एक्सक्लुझिव्हपणे मर्चंटायझिंग केल्या आहेत. ‘फुलराणी’च्या या एक से एक वस्तू स्मार्ट बाझारच्या आउटलेट्स मधून खरेदी करता येणार आहेत. आजघडीला मराठीतील सर्वात मोठी आण

गाभ" चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा कैलास वाघमारे दिसणार रोमँटिक अंदाजात

इमेज
गाभ" चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा कैलास वाघमारे दिसणार रोमँटिक अंदाजात अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास  वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. सातत्याने नवं काही तरी करू पाहणाऱ्या कैलासने आपल्यातील संवेदनशील कलाकाराला वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून जपलं आहे. त्याच्या आजवरच्या भूमिका पाहिल्या तर ही बाब सहज लक्षात येईल. आगामी ‘गाभ’  या मराठी चित्रपटातील कैलासची भूमिका आणि विषय संवेदशील असला तरी त्याचा रोमँटिक अंदाजही प्रेक्षकांना दिसणार आहे. ही कथा एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका कैलास आपल्या ‘दादू’ या पात्रातून साकारणार आहे. आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून  होणारा बदल आणि त्या बदलाची कथा, अधोरेखित करणारा गावाकडच्या रांगड्या मातीतला ‘गाभ’ हा चित्रपट आहे. टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे या चित्रपटाचे

अनोखा नाट्यानुभव : जन्मवारी

इमेज
अनोखा नाट्यानुभव : जन्मवारी दोन वेगवेगळ्या काळातील दोन स्त्रियांचा अनोखा प्रवास उलगडणारे 'जन्मवारी' हे नाटक आता रंगभूमीवर येत आहे  हर्षदा संजय बोरकर यांनी या नाटकाचे लेखन व दिग्दर्शन केले आहे. अभिनेत्री संपदा जोगळेकर-कुळकर्णी आणि त्यांची कन्या शर्वरी कुळकर्णी-बोरकर यांच्या प्रमुख भूमिका या नाटकात आहेत. त्यांच्यासह शुभांगी भुजबळ, अमृता मोडक व कविता जोशी यांच्याही भूमिका नाटकात आहेत.  'स्वेवन स्टुडिओज'ची निर्माती शांभवी बोरकर आणि सतीश आगाशे यांनी या नाटकाची निर्मिती केली आहे. मंदार देशपांडे यांनी या नाटकाचे संगीत केले आहे. सचिन गावकर यांनी या नाटकाचे नेपथ्य केले असून, अमोघ फडके यांची प्रकाशयोजना या नाटकाला लाभली आहे. नाटकाचे सूत्रधार सुरेश भोसले आहेत. संत नामदेव महाराज, संत कान्होपात्रा यांच्या अभंगरचना; हर्षदा संजय बोरकर यांची गीतरचना; कविता जोशी, मंदार देशपांडे, शर्वरी कुळकर्णी-बोरकर यांचे पार्श्वगायन या नाटकाला लाभले आहे.  या नाटकाचा मुंबईतील शुभारंभाचा प्रयोग ९ फेब्रुवारी रोजी रात्री ८.३० वाजता विलेपार्ले येथ