पोस्ट्स

बातमी जनहित लेबलसह पोस्ट दाखवत आहे

प्रियकराचा प्लॅन तगडा, पण जळीत मृतदेहामुळेच सत्य उघड; किरणही होती कटात सहभागी, पोलिसही झाले अचंबित

इमेज
प्रियकराचा प्लॅन तगडा, पण जळीत मृतदेहामुळेच सत्य उघड; किरणही होती कटात सहभागी, पोलिसही झाले अचंबित.                        सोलापूर : पाटखळ (ता. मंगळवेढा) येथील निशांत सावतचे (वय २०) घराशेजारील चुलत वहिनी किरण सावतसोबत (वय २३) प्रेमसंबंध जुळले. बारावीपर्यंत शिकलेला निशांत कराड येथील एका ज्वेलरी शॉपमध्ये कामाला होता.           २० दिवसांपूवी तो किरणला कायमचेच घेऊन जायचे म्हणून गावी आला होता. त्या दोघांनी 'सापही मेला पाहिजे आणि काठीही तुटली नाही पाहिजे' असा तगडा प्लॅन आखला होता. निशांतने पंढरपूर हद्दीतून एक अनोळखी मनोरुग्ण महिलेला हेरून गावीही आणले होते. किरणच्या आई-वडिलांनी तिचा विवाह धुमधडाक्यात लावला होता. किरणला छोटी मुलगी आहे. पती तिच्यावर जिवापाड प्रेम करायचा, पण निशांतने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि ती त्याच्या प्रेमात पडली. काही महिन्यांनंतर त्यांनी पळून जाऊन एकत्र राहण्याचा डाव आखला. त्यासाठी निशांतने मनोरुग्ण महिलेला आणून गळा आवळला आणि तिचा मृतदेह घराजवळील कडब्याच्या गंजी...

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

इमेज
फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले  पनवेल शहरातील तक्का परिसरात शनिवारी (दि.२८) सकाळी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले असून, त्यासोबत सापडलेल्या एका इंग्रजीतील भावनिक चिठ्ठीने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे.   आपल्या बाळाला सांभाळण्यास असमर्थ असल्याचे या चिठ्ठीतून पालकांनी म्हटले आहे. नेमके काय घडले? शनिवारी सकाळी तक्का परिसरातील नागरिकांना एका बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता, त्यांना बास्केटमध्ये एक नवजात बाळ दिसले. नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ पनवेल शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. चिठ्ठीतील भावनिक मजकूर समोर बास्केटमध्ये बाळासोबत एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी सापडली, ज्यामुळे या घटनेला एक भावनिक वळण मिळाले ...

भटके विमुक्तांचा अंबरनाथ नगर परिषदेवर मोर्चा

https://youtu.be/gbaEXJm1o40?si=kA3pkVT3a750KbO3 जनहित न्यूज महाराष्ट्र  9960504729

पुण्यात कुर्ला बस अपघाताची पुनरावृत्ती: अनेक गाड्यांना बस ने चिरडलं सीसीटीव्ही समोर

पुण्यात कुर्ला बस अपघाताची पुनरावृ्त्ती; अनेक गाड्यांना चिरडलं, सीसीटीव्ही समोर पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाल्याने भीषण अपघात झाला. मुंबईतील कुर्ला अपघातासारखीच ही घटना आहे. दुचाकी आणि अन्य वाहनांना धडक दिल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी घटनास्थळी तपास सुरू केला आहे. पुण्यातील पीएमपीएमएल बसचा भीषण अपघात झाला. चांदणी चौकातून पुणे शहराच्या दिशेने येत असताना पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाले. त्यामुळे मोठा अपघात घडला. या बसने ५ ते ६ दुचाकी, एक रिक्षा आणि काही अन्य वाहनांना धडक दिली. या अपघातात ४ जण जखमी झाले. त्यापैकी एकाची प्रकृती गंभीर आहे. या दुर्घटनेनंतर मुंबईतील कुर्ला अपघाताची पुनरावृत्ती झाल्याचे म्हटले जात आहे. मुंबईतील कुर्ला पश्चिम येथील एस. जी. बर्वे मार्गावर सोमवारी ९ ऑक्टोबर २०२४ रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास बेस्ट बसने अनेक गाड्यांना धडक दिली होती. या घटनेत ७ जणांचा मृत्यू झाला. तर ३० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. यानंतर आता पुण्यातील चांदणी चौकात पीएमपीएमएल बसचे ब्रेक फेल झाले आहेत. या बसने ५ ते ६ दुचाकी ए...