पोस्ट्स

जनहित न्युज महाराष्ट्र 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

ठाणे जिल्ह्याची जलजीवन वाहिनी पुन्हा एकदा जलपर्णी च्या विळख्यात...नयथरपाडा कांबागाव मोटरपंप हाऊस जवळ जलपर्णीदर्शन.

इमेज
उल्हास नदी, ठाणे जिल्ह्याची जलजीवन वाहिनी पुन्हा एकदा जलपर्णी च्या विळख्यात... नयथरपाडा कांबागाव मोटरपंप हाऊस जवळ जलपर्णीदर्शन.. कल्याण : कल्याण तालुक्यातील ग्रामीण भागासह मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर,  कल्याण डोंबिवली महानगर पालिका आदी शहरी भागातील नागरिकांची तहान भागविणारी उल्हास नदी पुन्हा एकदा जलपर्णी च्या विळख्यात सापडत असून ही जलपर्णी म्हणजे वाढत्या प्रदूषणाची लक्षणे मानली जात आहे. त्यामुळे लोकांना आता दूषित पाण्याला व त्यापासून होणाऱ्या आजारांना सामोरे जावे लागणार असे दिसते.  कल्याण तालुक्यात उल्हास, बारवी, काळू आणि भातसा या चार बारमाही वाहणाऱ्या नद्या आहेत. यातील उल्हास नदीच्या पाण्यावर कल्याण तालुक्यातील शेकडो ग्रामपंचायती व विविध महानगर पालिका अंवलबून आहेत मागील काही वर्षांपूर्वी उल्हास नदीच्या पाण्यात मोठ्या प्रमाणात जलपर्णी उगवली होती. नदीचे पात्र आहे की हिरवागार गालिचा  हे समजत नव्हतं. या जलपर्णी मुळे अनेक जलचर प्राणी ऑक्सीजन अभावी मरत होते या मागील शोध घेतला असता या जलपर्णी दूषित पाण्यामुळे निर्माण होत असल्याचे निदर्शनास आले होते. बदलापूर, कर्जत, अंबरनाथ,

कोकण विभाग शिक्षक मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे यांचे पारडे जड

इमेज
कोकण विभाग शिक्षक मतदार संघात ज्ञानेश्वर म्हात्रे   यांचे पारडे जड कोकण विभाग शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाल्यानंतर अनेक संघटना व पक्षाकडून उमेदवारांची चाचपणी सुरू झालेली आहे. महाविकास आघाडी , युतीकडे व अन्य पक्षाकडे अनेक संघटनांनी उमेदवारीसाठी प्रयत्न सुरू केलेले आहेत. मात्र या सर्वांमध्ये ज्ञानेश्वर म्हात्रे सर यांचे पारडे जड असून आगामी शिक्षक मतदार संघाच्या निवडणुकीत निवडून येण्यासाठी. तेच दावेदार असल्याची माहिती समोर येत आहे.        महाविकास आघाडी व युतीमुळे शिवसेना, शिंदे गट व भाजपा यांच्यासमोर उमेदवार घोषित करताना पेच निर्माण झालेला आहे, सर्वच पक्षांनी ज्ञानेश्वर म्हात्रे यांची मागणी केली असून प्रत्येक पक्ष त्यांना आपल्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न सुरू करत आहे. आज पर्यंत ज्या ज्या पक्षांनी व संघटनेने उमेदवार जाहीर केले आहे, त्यात ज्ञानेश्वर म्हात्रे निवडून येणारा व जिंकणारा  उमेदवार सर्वांना दिसत आहे.   सर्व शिक्षक- शिक्षकेतर  कर्मचाऱ्यांसाठी सतत  निस्वार्थपणे झटणारा, त्यांना न्याय मिळवून देणारा कार्यकर्ता म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात आहे.त्यांच्या कामाची चर्च