हायटेक हेरगिरी करणारे जहाज मालदीवच्या समुद्रात

चिनचे 4500 टन वजनाचे हायटेक हेरगिरी करणारे जहाज पुन्हा एकदा मालदीवच्या समुद्रात आले आहे. दोन महिन्यांनंतर या द्विपसमूह राष्ट्राच्या विविध बंदरांवर जाऊन एका आठवडय़ानंतर हे जहाज पुन्हा मालदीवमध्ये आले आहे.   जियांग यांग होंग 03 हे जहाज गुरुवारी सकाळी थिलाफुशी औद्योगिक द्विपच्या बंदरावर उभे होते. हिंदुस्थान आणि अमेरिकेने या जहाजाच्या हेरगिरी केल्यावरून चिंता व्यक्त केली आहे. परंतु मालदीव सरकारने या चिनी हेरगिरी जहाजाच्या पुन्हा येण्याचा अद्याप खुलासा केला नाही. नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रपती मुइझ्झू यांच्या पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. त्यामुळे मालदीव आणि चीन या दोन देशांमधील संबंध आणखी दृढ झाले आहेत.

चीन हेरगिरी जहाजसंबंधी मालदीवकडून स्पष्टीकरण देण्यात आले. जहाज आता विशेष आर्थिक क्षेत्र (ईईझेड) ला पार केल्यानंतर परत आले आहे. जियांग यांग होंग 03 जानेवारीपासून मालदीव क्षेत्रात किंवा त्यांच्या जवळपास सक्रिय आहे. जहाज याआधी 23 फेब्रुवारीला मालेच्या पश्चिम भागात जवळपास 7.5 किमी दूर थिलाफुशी बंदरावर थांबले होते. एक महिना लोटल्यानंतर हे जहाज 22 फेब्रुवारीला मालदीवच्या समुद्रात पोहोचले. त्यानंतर सहा दिवसांनंतर हे जहाज ईईझेड सीमेवर गेले, असे मालदीव सरकारने स्पष्ट केले आहे. हे जहाज कोणतीही हेरगिरी करणार नाही, असेही मालदीव सरकारने स्पष्ट केले आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार