पोस्ट्स

जानेवारी, २०२४ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

भाव माझ्या मनातला

इमेज
भाव माझ्या मनातला !         म्यूझिक मंत्रच्या मंचावर ख्यातनाम सिने दिग्दर्शक श्री राजदत्त यांचा 92 वा वाढदिवस सोहळा संपन्न झाला आणि डॉ. स्मिता डोंगरे यांच्या सुश्राव्य सूत्रसंचालनात जेष्ठ दिग्गज राजदत्त यांनी उलघडला त्यांचा जीवनप्रवास...        मराठी चित्रपट सृष्टीतील ख्यातनाम दिग्दर्शक  राजदत्त  यांच्या ९२ व्या वाढदिवसाचे औचित्य साधून म्यूझिक मंत्रने गप्पा गोष्टी आणि राजदत्त यांच्या चित्रपटातील गाणी सादर करून व त्यांचा चित्रपट सृष्टीतील प्रवासाचा आढावा घेत, एका आगळया वेगळया पद्धतीने त्यांचा जन्मदिवस राजदत्त यांच्या नातेवाईक व मित्र परिवारा सोबत साजरा केला.         या कार्यक्रमात म्यूझिक मंत्रच्या संचालिका डॉ. स्मिता डोंगरे यांनी राजदत्त यांची मुलाखत घेताना  राजदत्त यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग प्रेक्षकांना सांगीतले. एवढ्या थोर व्यक्तिची साथ आणि आशिर्वाद म्यूझिक मंत्र या आमच्या संस्थेला लाभला, आम्ही धन्य झालो, अशी प्रतिक्रिया म्यूझिक मंत्रचे संचालक डॉ. स्मिता डोंगरे आणि रमेश पूजारी यांनी व्यक्त केली. पारंपरिक पद्धतीने औक्षण करून वाढदिवस साजरा करण्यात आला, या