पोस्ट्स

जनहित न्युज महाराष्ट्र..9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

उल्हासनगर मध्ये इमारत दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्याना वाहिली श्रध्दांजली

इमेज
उल्हासनगर मध्ये इमारत दुर्घटनेमध्ये मृत्यू झालेल्याना   वाहिली श्रध्दांजली   उल्हासनगर कॅम्प नंबर ५ मध्ये  इमारतीचा स्लॕब कोसळून  या   दुर्घटनेत चार निष्पाप जिवांचा बळी गेला होता  त्या मृतात्म्यांना   भावपूर्ण श्रध्दांजलीचा कार्यक्रम हा सोमवार दि. २६ सप्टेंबर २०२२ रोजी  काँग्रेसचे शहर जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार, यांनी  आयोजन केला होता. या प्रसंगी लोकनेते पप्पू कालानी,  उद्योगपती महेश प्रकाश आहुजा, माजी नगरसेवक किशोर वनवारी, काँग्रेस चे शहर जिल्हा उपाध्यक्ष महादेव शेलार, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष सविता जाधव , महासचिव ताराचंद्र तायडे, राधाचरण करोतिया, काँग्रेस सेवादलच्या फातिमा खान, निलम पांडे, दिनेश  लहरानी , महेश्वरी शेट्टी, इंद्रायणी नेतकर, कमल सोनवणे, अशोक गोपलानी, मुन्ना श्रीवास्तव , अनिल यादव, गणेश मोरे, बाबू आढाव, आबा साहेब साठे, लालचंद तिवारी,  राष्ट्रवादीचे  कमलेश निकम, शिवाजी रगडे, जलीलभाई खान, यांच्यासह अनेक कार्यकर्ते यांनी इमारत दुर्घटनेत मरण पावलेल्या मृतात्म्यांना भावपूर्ण  श्रध्दांजली वाहिली , या वेळी  इ

मोनालीसा आणि निखिलची जमली जोडी ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

इमेज
मोनालीसा आणि निखिलची जमली जोडी  ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित प्रेम म्हणजे नाजूक, अलवार अनुभूती. अर्थात प्रेम करणे सोपे पण निभावणे अतिशय कठीण. त्यातही पहिल्या प्रेमाची तर बातच न्यारी... प्रेमाची अनाहूत जाणीव झालेल्या प्रेमवीरांची कथा उलगडून दाखवणाऱ्या ‘तू फक्त हो म्हण’ या चित्रपटातून मोनालीसा बागल आणि निखिल वैरागर ही जोडी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. एन एच स्टुडिओची प्रस्तुती असलेल्या या चित्रपटाचा दिमाखदार पोस्टर अनावरण सोहळा नुकताच संपन्न झाला. याप्रसंगी बोलताना मोनालीसा आणि निखिल म्हणाले कि, एक उत्तम चित्रपट करायला मिळाल्याचा आम्हांला आनंद आहे. यातील कथा व गाणी प्रत्येकाच्या हृदयाला नक्कीच स्पर्श करतील. या चित्रपटाचे दिग्दर्शक डॉ.गणेशकुमार पाटील आणि भास्कर डाबेराव म्हणाले की, ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपटाच्या माध्यमातून प्रत्येकाने आपल्या आयुष्यात अनुभवलेली प्रेमकथा आम्ही प्रेक्षकांच्या प्रेक्षकांच्या भेटीला आणली आहे. आमच्या या चित्रपटाला प्रेक्षक नक्कीच दाद देतील. येत्या १४ ऑक्टोबरला ‘तू फक्त हो म्हण’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

वैभव आणि पूजा पुन्हा एकत्र

इमेज
*वैभव आणि पूजा पुन्हा एकत्र* कलाकारांच्या काही जोडया खूप हीट होतात. मोठ्या पडद्यावर झळकलेल्या अशा काही जोडया आहेत ज्यांनी प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं आहे. वैभव तत्ववादी आणि पूजा सावंत जोडी ही त्यापैकीच एक. प्रेक्षकांची मने जिंकलेली ही जोडी परत एकत्र कधी येणार? याबद्दल त्यांच्या चाहत्यांमध्ये कायमच उत्सुकता असतेच. वैभव आणि पूजा या जोडीच्या चाहत्यांसाठी एक खुशखबर आहे.   ‘हॅण्डसम’ वैभव तत्ववादी आणि ‘ब्युटीफुल’ पूजा सावंतची लव्हेबल केमिस्ट्री परत एकदा जुळणार आहे. पण ही जोडी कशासाठी एकत्र येतेय? हे अजूनही गुलदस्त्यात आहे. प्रेक्षकांकडून मिळणाऱ्या प्रेमामुळे या दोघांनी पुन्हा एकत्र काम करणार असल्याचे संकेत दिले आहेत. चित्रपट, अल्बम, जाहिरात यापैकी कोणत्या माध्यमातून ही जोडी एकत्र येणार याची खूप उत्सुकता शिगेला पोहचली  असली तरी बऱ्याच कालावधीनंतर ही जोडी एकत्र येणार असल्याने चाहत्यांना नक्कीच आनंद होणार आहे. लवकरच हे दोघे त्यांच्या या आगामी प्रोजेक्टची घोषणा करणार आहेत. प्रतिनिधी गणेश तळेकर जनहित न्युज महाराष्ट्र मुंबई  बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी

संतोष आणि पूर्वाचे ‘३६ गुण’ जुळणार

इमेज
*संतोष आणि पूर्वाचे ‘३६ गुण’ जुळणार* लग्न जुळवताना ‘३६ गुण’ पाहिले जातात. दोनजणांमध्ये वाद किंवा भांडण असेल तेव्हा दोघांमध्ये ‘३६’ चा आकडा आहे असं म्हटलं जातं. तर अशा या ‘३६’ आकडयाने अभिनेता संतोष जुवेकर आणि अभिनेत्री पूर्वा पवार यांना एकत्र आणण्याची किमया साधली आहे. समित कक्कड दिग्दर्शित आगामी ‘३६ गुण’ या चित्रपटात संतोष जुवेकर व पूर्वा पवार हे दोघे कलाकार मध्यवर्ती भूमिकेत दिसणार आहेत. तरुण पिढीच्या दृष्टीकोनातून भारतीय लग्नसंस्थेवर भाष्य करणारा हा मनोरंजक चित्रपट आहे. मुंबई आणि लंडनमधील तब्बल ९० नयनरम्य लोकेशन्सवर हा चित्रपट चित्रीत झालेला असल्याने आतापर्यंत न पाहिलेले लंडन आणि वेगळा विषय ही प्रेक्षकांसाठी ‘स्पेशल ट्रीट’ ठरणार आहे. येत्या ४ नोव्हेंबरला ‘३६ गुण’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. घरदारं बघून चहा पोह्यांचा रीतसर कार्यक्रम करून, देवा ब्राह्मणांच्या साक्षीने आणि थोरामोठ्यांच्या आशीर्वादाने विवाह झालेले, सुधीर आणि क्रिया त्यांचा मधुचंद्र लंडनला करायचा ठरवतात आणि तिथे पोहचल्यावर मात्र त्यांना एकमेकांमध्ये दिसणाऱ्या गुण-अवगुणांची, आपआपसातील वेगळेपणाची

मारुती सुझुकी चे डीलर महेश प्रकाश आहुजा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सीमा महेश आहुजा यांच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर 1वाहतूक विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच वार्डन कर्मचारी यांना बॅग व पेन वाटप

इमेज
मारुती सुझुकी चे डीलर महेश प्रकाश आहुजा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सीमा महेश आहुजा यांच्या वतीने उल्हासनगर कॅम्प नंबर 1या ठिकाणी वाहतूक विभागाचे वरिष्ठ अधिकारी गायकवाड यांना भेट देवून उल्हासनगर मधील ट्रॅफिक वर नियंत्रण करण्यासाठी आपले कर्तव्य बजावत असलेल्या वाहतूक विभागातील अधिकारी कर्मचारी तसेच वार्डन कर्मचारी यांना एक बॅग व पेन वाटप करण्यात आला यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

उल्हासनगर मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू .

इमेज
उल्हासनगर मध्ये इमारतीचा स्लॅब कोसळून चार जणांचा मृत्यू . उल्हासनगर  कॅम्प नंबर 5, मधील  कपलेश्वर महादेव मंदिर जवळ ओटी सेक्शन मध्ये मानस टॉवर सोसायटी चा स्लैब कोसळला असून या दुर्घटनेमध्ये चार जण मृत्युमुखी पडल्याची माहिती समोर आली आहे घटनास्थळी उल्हासनगर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी तसेच अग्निशामक विभागाचे अधिकारी व कर्मचारी आणि पोलीस अधिकारी कर्मचारी पोहोचले व स्लॅबच्या ढिगार्‍याखाली दबलेल्या . सागर ओचानी वय वर्ष 19, रेणू ढोलनदास धनवाणी वय वर्ष 55,  ढोलनदास धनवाणी वय वर्ष 58, प्रिया धनवाणी वय वर्ष 24, यांचा मृत्यू झाल्याची मोठी दुर्घटना घडली आहे, घटनास्थळी अग्निशमन दल, पोलिस अधिकारी व कर्मचारी उल्हासनगर महानगरपालिका अधिकारी व कर्मचारी पोहोचले असून पुढील कार्य सुरू आहे, ब्युरो रिपोर्ट जनहित न्युज महाराष्ट्र उल्हासनगर