पोस्ट्स

एप्रिल, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग व समग्र शिक्षा विभागाच्या वतीने कार्यशाळा आयोजित

इमेज
उल्हासनगर महानगरपालिका दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग व समग्र शिक्षा विभागाच्या वतीने कार्यशाळा आयोजित दि.28/04/2023 उल्हासनगर: दिव्यांग कल्याण विभाग, महाराष्ट्र शासन यांनी दिलेल्या निर्देशानुसार दिव्यांग व्यक्तींना Online दिव्यांग प्रमाणपत्र व वैश्विक ओळखपत्र देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्याबाबत निर्देशप्राप्त झाले  त्याअनुषंगाने आज दिनांक 28/04/2023 रेाजी महापालिका महासभागृह येथे दिव्यांग व्यक्तींना वैश्विक ओळखपत्र म्हणजेच UDID देण्याबाबत दिव्यांग कल्याणकारी योजना विभाग व समग्र शिक्षा विभागाच्या वतीने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. या मध्ये उल्हासनगर क्षेत्रातील मनपा शाळा, खाजगी शाळा, अनुदानीत शाळा, विना अनुदानीत शाळांमधील मुख्यध्यापक तसेच दिव्यांग सेवा संस्थांच्या पदधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात आले होते. या मध्ये सुमारे 200 त 250 मुख्यध्यापक व विविध संस्थांचे एन.जी.ओ. उपस्थित होते. श्री. भारत वेखंडे, जिल्हा सम्नवयक, डायट, रहाटोली, तसेच व श्री. नारायण भालेराव यांनी यु.डी.आय.डी. व यु डाईस प्लस बाबत मार्गदार्शन केले आहे. 

पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफ - सफाई व्यवस्थित करावी- मनसेचे अँड. प्रदिप गोडसे यांची मागणी

इमेज
पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफ - सफाई व्यवस्थित करावी - मनसेचे अँड. प्रदिप गोडसे यांची मागणी उल्हासनगर :  सध्या पावसाळ्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस कधीही पडू शकतो. त्याअनुषंगाने उल्हासनगर महापालिका क्षेत्रात पॅनल क्र -१३ मध्ये गेल्या पावसाळ्यात काही भाग पाण्यात गेला होता.त्याचे मुख्य कारण म्हणजे नाले सफाई व्यवस्थित झाली नाही.       गेल्या दोन वर्षांचा अनुभव घेता पॅनल क्र -१३ मध्ये काही नाले आहे जे पावसाळ्यापूर्वी त्यांची व्यवस्थित सफाई करणे गरजेचे आहे. याचा विचार करून मनसेचे अँड.प्रदिप गोडसे यांच्यावतीने उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त साहेब, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, मुख्य स्वछता निरीक्ष यांना प्रभाग क्र -१३ मधील विशेषतः प्रथम स्थानी लालचक्की भागातील श्री.कृष्ण कॉलनी, शिव मार्ग मागील नाला, ज्योती कॉलनी येथील नाला, पांच पांडव येथील नाला, हनुमान नगर येथील नाला, गुलमोहर समोरील नाला, डॉ. शेगावकर समोरील नाला पहिल्या टप्प्यात साफ करून घेण्यास यावे याकरिता निवेदन देऊन अधिकारी सोबत चर्चा करण्यात आली.           कारण यापरिसरातील नाले वेळेवर व व्यवस्थित सा

कुस्तीपटूंच्या भेटीसाठी प्रियांका गांधी जंतरमंतर वर आंदोलना साठी बसलेल्या कुस्तीपटूंसोबत चर्चा

इमेज
प्रियांका गांधी यांचा कुस्ती पटूंना पाठिंबा,आंदोलनाबाबत चर्चा कुस्तीपटूंच्या भेटीसाठी प्रियांका गांधी जंतरमंतर वर आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंसोबत चर्चा दिल्ली :  बृजभूषण यांच्याविरोधात कुस्तीपटूंचं आंदोलन  भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण सिंह यांच्याविरोधात आंदोलनासाठी बसलेल्या कुस्तीपटूंची काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी भेट घेतली. तसेच त्यांच्यासोबत चर्चाही केली. यावेळी महिला कुस्तीपटूंना भावना अनावर झाल्याने प्रियांका यांनी मायेने त्यांच्या डोक्यावरुन हात फिरवत त्यांना धीर दिला. जंतरमंतर वर बसलेल्या कुस्तीपटूंच्या धरणे आंदोलनाचा सातवा दिवस आहे. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष बृजभूषण सिंह यांच्याविरोधात कुस्तीपटू आंदोलनासाठी बसले आहेत. बृजभूषण यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप करण्यात आले आहे. यावेळी प्रियांका यांनी बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

मुंबई : बेस्ट’मध्ये मोबाइलचा मोठा आवाज करून गाणी ऐकल्यास होणारं पोलिसांत तक्रार

इमेज
मुंबई : बेस्ट’मध्ये मोबाइलचा मोठा आवाज करून गाणी ऐकल्यास होणारं पोलिसांत तक्रार मुंबई : बस किंवा रेल्वेमधून प्रवास करताना मोबाइलवर मोठय़ा आवाजात बोलणारे, गाणी ऐकणारे किंवा वेगवेगळे व्हिडिओ पाहणारे, यांचा अन्य प्रवाशांना नेहमीच जाच होतो. आता किमान ‘बेस्ट’ बसमधून प्रवास करणाऱ्या मुंबईकरांची यातून सुटका होणार आहे. ‘बेस्ट’ने मोबाइलवर मोठय़ा आवाजात बोलण्यास, गाणी ऐकण्यास मनाई केली आहे. तसेच याबाबत पोलिसांमध्ये तक्रार करण्याचे आदेश ‘बेस्ट’ प्रशासनाने दिले आहेत. ‘बेस्ट’ उपक्रमाच्या बसमधून दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. काही प्रवासी मोबाइलवरून अन्य व्यक्तीशी मोठय़ा आवाजात संभाषण करीत असतात. काहीजण मोठय़ा आवाजात गाणी ऐकतात. याचा सहप्रवासी तसेच वाहक आणि चालकांनाही त्रास सहन करावा लागतो. वाहकाने प्रवाशाला समजावण्याचा प्रयत्न केला तरी त्याकडे लक्ष दिले जात नाही. बेस्ट उपक्रमाच्या परिवहन विभागाकडे याबाबत मोठय़ा प्रमाणात तक्रारी आल्या. त्यांची दखल घेऊन मोबाइलवर मोठय़ा आवाजात बोलणाऱ्या वा गाणी ऐकणाऱ्या प्रवाशांना अद्दल घडविण्याचा निर्णय घेण्यात आला. २४ एप्रिल रोजीच्या आदेशानुसार मोबाइलचा लाऊड

सकाळी बुध्द सरणं गच्छामिचा आवाज श्रामणेर संघ यांच्या धम्म संदेश यात्रेतून उल्हासनगरात दुम दुमला

इमेज
सकाळी बुध्द सरणं गच्छामिचा आवाज श्रामणेर संघ यांच्या धम्म संदेश यात्रेतून उल्हासनगरात दुम दुमला    उल्हासनगर ( अशोक शिरसाट )    उल्हासनगर - बौध्द महासभा  राष्ट्रीय संरक्षक महाउपासिका.  मिराताई आंबेडकर . ट्रस्टीचे चेअरमन डाॕ हरिष रावलिया . ट्रस्टी राष्ट्रीय अध्यक्ष चंद्रबोधी पाटील . राष्ट्रीय कार्याध्यक्ष डाॕ भिमराव आंबेडकर .  राष्ट्रीय सल्लागार श्रध्देय बाळासाहेब आंबेडकर . यांच्या आदेशनुसार  भारतीय बौध्द महासभा - शाखा  उल्हासनगर तालुका अंतर्गत विभागीय शाखा आणि वंचित बहुजन आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने धम्म संदेश यात्रेचे आयोजन करण्यात आले होते तसेच  श्रामणेर संघ धम्म संदेश यात्रेची सुरुवात -  शाखा  सुभाषनगर . सम्राट अशोक नगर . शास्त्रीनगर . बुध्द नगर साधूबोला रोड . हर्षवर्धन नगर शहाड गावटाण .प्रबुध्द नगर शाखा चोपडा .  संतोष नगर .  महात्मा फुले नगर  शाखा गायकवाड पाडा असे विविध शाखेच्यावतीने श्रामणेर संघ धम्म संदेश यात्रेत मोठ्या उत्साहात स्वागत  करण्यात आले होते  तसेच  या  श्रामणेर संघ धम्म संदेश यात्रेथून  शनिवार दि. २९ एप्रिल २०२३ रोजी  स्थळ - तालुका क्रिडा संकुल कारमेल

उल्हासनगर वडोलगाव येथे आर पी आयचे जनसंपर्क कार्यालयाचे उद् घाटन शहर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव यांच्या हस्ते

इमेज
उल्हासनगर : वडोलगाव येथे आर पी आयचे जनसंपर्क कार्यालयाचे उद् घाटन शहर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव यांच्या हस्ते   उल्हासनगर  (अशोक शिरसाट )  उल्हासनगर - ३ मध्ये जोसेफ हायस्कूल ओ, टी. सेक्शन  वडोलगाव येथे रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया चे जनसंपर्क कार्यालयाचे उद् घाटन रिपब्लिकन पार्टी आॕफ इंडिया चे उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव . यांच्या हस्ते झाले असून रिपब्लिकन पक्षाचे  राष्ट्रीय अध्यक्ष व केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री -  रामदास  जी आठवले यांच्या नेतृत्वाखाली उल्हासनगर शहरात  संघटनाचे काम सुरु आहे   तेथे शाखा व घर तेथे कार्यकर्ता या संकल्पनेतून उल्हासनगर शहरात पक्ष विस्ताराचे प्रतिसाद मिळत आहे  काही लोकांनी ते कार्यालय तोडण्यासाठी जिवाचा आटापीटा केला होता तसेच ज्यांनी सदरची शाखा जनसंपर्क कार्यालय तोडण्यासाठी पुढे येणारे पुढारी यांनी यापुढे आम्ही तुमच्या नादी लागत नाही आणि तुम्ही सुध्दा आमच्या नादी लागू नका असे आर पी आय चे शहर जिल्हा अध्यक्ष भगवान भालेराव यांनी  ढणकावून सांगितले तसेच या उद् घाटन प्रसंगी  आर पी आयचे  ठाणे जिल्हा सचिव गौतम ढोके. सल्लागार अॕड किरण

माननीय सिताराम गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान

इमेज
माननीय सिताराम गायकवाड यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान  डॉ बाबासाहेब आंबेडकरांना जिवंत करणारे जब्बार पटेल यांच्या हस्ते सन्मान मिळणे हाच खरा सर्वोच्च सन्मान          मुंबई प्रतिनिधी आशा रणखांबे सिताराम गायकवाड यांचे प्रतिपादन  आपल्या स्वतःच्या राहत्या झोपडी मध्ये बाबासाहेबांचे एका फलकावर नाव लिहून आदिवासी मुला मुलींसाठी शैक्षणिक कामाची सुरुवात अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेमार्फत केली आज या संस्थेच्या तीन माध्यमिक दोन प्राथमिक व एक जुनियर कॉलेज या शैक्षणिक प्रकल्पांद्वारे बहुजनांच्या विकासासाठी गेली 40 वर्ष काम करीत आहेत या संस्थेचे संस्थापक व संस्थाप्रमुख माननीय सिताराम गायकवाड यांचा अध्यक्ष ऑल इंडिया एससी ,एसटी कर्मचारी ओ.एन.जी.सी. चे महाप्रबंधक माननीय श्री जागेश सोमकुवर मुंबई यांच्या विद्यमाने आयोजित भीम जयंती निमित् श्री .सिताराम गायकवाड यांना जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बाबासाहेबांच्या विधायक विचारांचा वसा घेऊन श्री. सोमकुवर, श्री. वानखेडे, श्री. निकाळजे , श्री.कटारे, श्र रघुनाथ कारगावकर व त्यांचे अनेक सह

रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बल ,अंबरनाथ नगर परिषद यांची संयुक्त बैठक

इमेज
रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बल ,अंबरनाथ नगर परिषद यांची संयुक्त बैठक     अंबरनाथ :  २५/०४/२०२३ रोजी रेल्वे स्टेशन परिसर फेरीवाला मुक्त करणे,पादचारी पूल कचरा मुक्त करणे तसेच तिकीटआरक्षण केंद्र कडे अतिक्रमित रस्ता मोकळा करून स्वच्छ्ता करणे,अरुंद व धोकादायक वाटा पत्रे लावून बंद करणे, इत्यादी बाबत रेल्वे अधिकारी, रेल्वे सुरक्षा बल ,अंबरनाथ नगर परिषद यांची संयुक्त बैठक, सुभाष साळुंके (सदस्य: DRUCC ,मध्य रेल्वे)  यांनी पाहणी केली.यामध्ये प्रवाश्यांना होणारा अडथळा दूर करण्यात आला असून स्वच्छ्ता करण्यात आली. सकाळी 4 व सायं.6 ते 10 वा.या वेळेत संयुक्त मोहीम राबविण्याची सूचना .सुभाष साळुंके यांनी संबधित विभागास दिल्या. यावेळी अंबरनाथ रेल्वे प्रबंधक .मिनासहेब, उपमुख्य अधिकरी तथा आरोग्य अधिकारी .संदिप कांबळे, आर पी एफ चे निबंधक . बामणे, अंबरनाथ व्यापारी संघाचे सचिव युसुफ भाई शेख, स्वच्छ्ता निरिक्षक .सुहास सावंत, रुपसिंह धल मोठ्या संख्येने कर्मचारी  इ. उपस्थित होते. यावेळी नागरिकांनी थोडफार मोकळा श्वास घेल्याचे समाधान व्यक्त केले.

भारतात बहुतेक चित्रपट हे शुक्रवारीच का प्रदर्शित होतात? जाणून घ्या यामागचे इंट्रेस्टिंग कारण

इमेज
भारतात बहुतेक चित्रपट हे शुक्रवारीच का प्रदर्शित होतात? जाणून घ्या यामागचे इंट्रेस्टिंग कारण तुम्ही पाहिलं असेल, बहुतांश बॉलिवूड चित्रपटांची कमाई ही शनिवार, रविवार खूप जास्त असते. कारण यावेळी चित्रपट पाहण्यासाठी येणारा प्रेक्षकवर्गही जास्त असतो.भारतात चित्रपटांचा एक चाहता वर्ग मोठा आहे. यामुळे दरवर्षी वेगवेगळ्या विषयांवर आधारित जवळपास हजारो चित्रपट हे बॉक्स ऑफिसवर रिलीज होतात. यातील काही चित्रपट हे तुफान चालतात. ज्यांना प्रेक्षकही डोक्यावर घेतो. तर काही चित्रपट चांगलेच आपटतात. यामुळे बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित होणारे नवीन चित्रपट पाहण्यासाठी दर आठवड्याला शुक्रवारची वाट पाहणारे अनेक जण आहेत. आपल्या देशात अनेक चित्रपट हे तयार होतात यामुळे दर आठवड्याला बॉक्स ऑफिसवर वेगवेगळे चित्रपट पाहायला मिळतात. यामागचे कारण म्हणजे भारतात अनेक भाषा आहेत आणि त्या-त्या भाषांमध्ये वेगवेगळे विषय हे चित्रपटाच्या माध्यमातून हाताळले जातात. हेच भारतीय चित्रपटसृष्टीत वैविध्य आहेअनेक देशांमध्ये जिथे फक्त एकाच भाषेत चित्रपट बनवले जातात. मात्र भारत या बाबतीत खूप पुढे आहे. आपल्याकडे भाषांची विविधता आहे त्याम

पंतप्रधान यांच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत "हर घर नल, हर घर जल" याचे भुमिपूजन

इमेज
पंतप्रधान यांच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत "हर घर नल, हर घर जल" याचे भुमिपूजन रायगड जिल्ह्यातील उरण तालुका येथील जासई डुंबावाडी येथे पंतप्रधानांच्या जलजीवन मिशन योजने अंतर्गत "हर घर नल, हर घर जल" याचे भुमिपूजन उरण विधानसभेचे आमदार महेश सेठ बालदी, गटविकास अधिकारी समीर प्रकाश वाठस्कर, भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे, बळीराम घरत,ग्रामपंचायत सदस्य व स्थानिक पदाधिकारी आदी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. जासई, डुंबावाडी येथे असलेली वस्ती ही लभान बंजारा समाजाची आहे अन येथील लोकवस्तीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी "तांडा विकास योजना" लागू करावी अशी मागणी भटके विमुक्त सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुंदर डांगे यांनी केली, तसेच आज आपण स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करतो, देश सुजलाम सुफलाम झाला असला तरीही भटके विमुक्त समाजाच्या समस्या आजही सुटलेल्या नाहीत अशी खंत व्यक्त केली, जासई डुंबावाडी येथील नागरीकांना मुलभुत सुविधा पुरवण्यासाठी स्थानिक प्रशासनाने पुढाकार घेऊन स्वच्छ भारत अभियाना अंतर्गत शौचालय बांधून द्या