पोस्ट्स

जुलै, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे साहेब यांच्या वाढदिवस

इमेज
केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे साहेब यांच्या वाढदिवस कल्याण: महाराष्ट्र राज्य काष्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघातर्फे आयोजित कार्यक्रमात जागृती मंडळाचे पदाधिकारी यांचे सहकार्य लाभले. केंद्रीय अध्यक्ष परमेश्वर माटे साहेब  यांच्या वाढदिवसा निमित्त दिनांक 21/07/2023 रोजी सकाळी 10 ते 5 या वेळेत डॉ .बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल हॉल म्हसोबा चौक कल्याण पुर्व या ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर,व मधुमेह व उच्च रक्तदाब तपासणी शिबीर व त्या वरील औषधे मोफत ठेवण्यात आले होते तसेच रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास प्रमाणपत्र व आकर्षक भेट वस्तु देण्यात आल्या.  नागरिकांनी देखील आरोग्य शिबिराचा लाभ घेऊन प्रचंड प्रतिसात दिला. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी आयोजक : आनंदभाऊ गांगुर्डे,  नितीन नामदेव साळवे' साहेब,अनिल जांभुळकर साहेब,सर्वेश्वर काणेकर साहेब,हिवराज टेंभुर्णे रणधिर फुलझेले ,सुदिप जना, किरण दुधवडे सागर भोईर, महेश भोईर तसेच प्लाज़्मा रक्त पेढीचे डॉ.सिद्धेश सर, रवी निमसे सर, निधी बावस्कर मॅडम, वेधवी ओरस्कर मॅडम, कल्पना खरटे मॅडम, उमेश जाधव, संदीप नवले भाग्यश्री वाडेकर तसेच समर्थ सक्

मनविसेची विकास मंदिर शाळेला धडक..! सुट्टी जाहीर असतांना देखील सुरू होती शाळा.

इमेज
* मनविसेची विकास मंदिर शाळेला धडक..! सुट्टी जाहीर असतांना देखील सुरू होती शाळा. ..!*         उल्हासनगर: दिनांक २६ जुलै २०२३ रोजी शिक्षण विभाग, जिल्हा परिषद, ठाणे* यांच्या कडून अतिवृष्टीची इशारा लक्षात घेऊन ठाणे जिल्ह्यातील सर्व शाळांना *दिनांक २७ जुलै २०२३ रोजी सुट्टी जाहीर केली होती. परंतु आज दिनांक २७ जुलै २०२३* रोजी काही पालकांच्या *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या* कार्यालयात तक्रारी आल्या की सुट्टी जाहीर असताना देखील *विकास मंदिर प्राथमिक व माध्यमिक शाळा, विठ्ठलवाडी पोलिस स्टेशनच्या समोर* हि शाळा चालू आहे. काही क्षणातच *महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे शहर अध्यक्ष  वैभव माधव कुलकर्णी, शहर संघटक अशोक गरड, शहर सचिव स्वप्नील त्रिभुवन आणि अजय बागुल* ह्यांनी शाळेवर धडक दिली. सुट्टी जाहीर असताना सुद्धा शाळा चालू आहे ह्या बद्दल *मुख्याध्यापक व शिक्षण अधिकारी साहेब ह्यांच्याशी दूरध्वनी वर चर्चा करण्यात आली. लागलीच शिक्षण अधिकारी साहेबांनी शाळा बंद करून सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश मुख्यध्यापक यांना दिले. अशी माहिती  शहर अध्यक्ष महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी से

मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा इशारा

मुंबई महानगरपालिका प्रशासनाचा इशारामुंबई महानगरपालिकेने सांडपाणी वहन आणि नाल्यातील गाळ उपसण्याचे काम कंत्राटदारांना दिले असून संबंधित ठिकाणी काम करणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना सुरक्षेची उपकरणे उपलब्ध करण्यात आली आहेत का याची पाहणी करण्याची जबाबदारी विभाग अधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. सफाई कार्मचाऱ्यांना सुरक्षेच्या उपकरणांपासून वंचित ठेवल्याचे निदर्शनास आल्यास संबंधित कंत्राटदारांबरोबरच अधिकाऱ्यांनाही जबाबदार धरण्यात येईल, असा इशारा मुंबई महानगरपालिका प्रशासनाने दिला आहे.

वाढदिवस साजरा न करता कृषिमंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात! सुट्टीच्या दिवशी मंत्रालय उघडून घेतला विभागाचा आढावा

इमेज
वाढदिवस साजरा न करता कृषिमंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात! सुट्टीच्या दिवशी मंत्रालय उघडून घेतला विभागाचा आढावा मागेल त्याला शेततळे व ड्रीप देण्यासाठी आलेले सर्व अर्ज तात्काळ निकाली काढा - मुंडेंचे विभागाला निर्देश एक रुपयात पीकविमा योजनेत जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे बोगस बियाण्यांच्या रॅकेटवर धडक कारवाया करण्याचे निर्देश मी शेतकऱ्याचा मुलगा, कृषी खाते मिळणे हेच वाढदिवसाचे गिफ्ट! कृषी विभागांतर्गत येणाऱ्या लाभार्थ्यांची संख्या वाढवणार ( मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर )  मुंबई (दि. 15) - राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची नियुक्ती होताच आज पहिल्याच दिवशी मंत्रालयात जाऊन कृषी विभागाची चार तास आढावा बैठक घेतली. धनंजय मुंडे यांचा वाढदिवस व सुट्टीचा दिवस असताना देखील मंत्रालय उघडून त्यांनी शेतकरी हितार्थ निर्णयाला प्राधान्य दिले. कृषी विभागाची मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ड्रीप ( ठिबक सिंचन) , शेड नेट अशी योजना आहे. मात्र त्यामध्ये अर्ज करणाऱ्यांची संख्या लाखांवर असून विभागामार्फत दहा-दहा हजार शेतकऱ्यांची लॉटरी काढली जा

*ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे (जेनमा) यांचे वृद्धापकाळाने निधन*

इमेज
*ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे (जेनमा) यांचे वृद्धापकाळाने निधन* मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर मुंबई: ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य-चित्रपट निर्मात्या सरोज ऊर्फ जेनमा कोठारे (वय ९३) यांचे आज सायंकाळी कांदिवली येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे, नातू प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. कांदिवली येथील स्मशानभूमीत रात्री सरोज कोठारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जेनमा कोठारे यांचे मूळ नाव सरोज. माहेरच्या त्या तळपदे. १९ जून १९३० ही त्यांची जन्मतारीख. जेनमा यांचे वडील माधवराव तळपदे हे बहुश्रुत व्यक्तिमत्त्व. त्यामुळेच जेनमा यांच्यावर लहानपणापासून चांगले संस्कार झाले. प्रायोगिक रंगभूमीच्या ओढीने जेनमा आणि महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांची पहिल्यांदा भेट झाली. १९५२ मध्ये त्यांचा विवाह झाला. ‘जेनमा’ हे टोपण नाव त्यांना त्यांच्या मावस बहिणीने दिले होते. जेनमा आणि अंबर कोठारे यांनी कालांतराने ‘आर्टिस्ट कंबाइन’ नावाची नाट्यनिर्मिती संस्था स्थापन केली. या

राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर

इमेज
राज्य मंत्रिमंडळाचे फेरबदलासह खातेवाटप जाहीर - -जनसंपर्क कक्ष (मुख्यमंत्री सचिवालय) मुंबई, दि. १४: जुलै २०२३ प्रतिनिधी गणेश तळेकर राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांच्या खातेवाटपाबरोबरच सध्याच्या मंत्र्यांच्या खात्यांमध्ये देखील काही फेरबदल करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज खातेवाटप जाहीर केले आहे. राज्यपाल रमेश बैस यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे* यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, परिवहन, सामाजिक न्याय, पर्यावरण व वातावरणीय बदल, खनिकर्म आणि इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले  विभाग  *उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे* गृह, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. *उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे* वित्त व नियोजन हे खाते राहील.  *इतर २६ मंत्र्यांची खाती  पुढीलप्रमाणे:* छगन भुजबळ – अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण दिलीपराव दत्तात्रय वळसे-पाटील – सहकार राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्ध व्यवसाय विकास सु

'दिनिशा फिल्म्स' निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला

इमेज
संपूर्ण महाराष्ट्रात लागणार 'आणीबाणी’ कॉमेडी मराठी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर आणीबाणी’ हा चार अक्षरी शब्द ऐकला की, तो काळ प्रत्यक्ष अनुभवलेल्यांच्या काळया आठवणी जागृत होतात. त्यामुळे  पुन्हा ‘आणीबाणी’ नको अशी भावना असलेल्या जनतेला आता मात्र मनोरंजनाच्या आणीबाणीला सामोरं जावं लागणार आहे. येत्या २८जुलैला  मनोरंजनाची ही  ‘आणीबाणी’ लागू होणार आहे.  तत्पूर्वी  मनोरंजनाची  ही ‘आणीबाणी’  नेमकी  काय असणार आहे? याची झलक नुकतीच एका शानदार कार्यक्रमात दाखविण्यात आली.   'दिनिशा फिल्म्स' निर्मित ‘आणीबाणी’ हा मराठी चित्रपट २८ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.  छोट्या  पडद्यावर काम केल्यानंतर आता मराठी रुपेरी पडदद्यावर ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय रंजकपणे मांडण्याचं धाडस दिग्दर्शक दिनेश जगताप यांनी लेखक अरविंद जगताप यांच्या सोबतीने  दाखवलं  आहे.  या  चित्रपटाच्या दिमाखदार ट्रेलरचे अनावरण कलाकार व तंत्रज्ञ यांच्या उपस्थितीत नुकतेच संपन्न झाले.  याप्रसंगी बोलताना दिग्दर्शक दिनेश जगताप म्हणाले की पदार्पणात दिग्ग्ज कलाकारांसह एका वेगळ्या विषयाचा

*तेजस्विनीचा 'अफलातून' डॅशिंग अंदाज

इमेज
*तेजस्विनीचा 'अफलातून' डॅशिंग अंदाज * मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचा बेधडक डॅशिंग अंदाज लवकरच पहायला  मिळणार आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून  प्रेक्षकांचे मनोरंजन  केल्यानंतर तेजस्विनी पोलिसी गणवेश चढवत आगामी ‘अफलातून’ या मराठी चित्रपटात आलिया सावंत या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज,आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी निर्मित ‘अफलातून’ हा चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'अ डिफेक्टीव्ह कॅामेडी' असं म्हणत लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तेजस्विनी सांगते की, 'माझं यातलं व्यक्तिमत्व गोवन आहे. शांत, संयमी पण वेळप्रसंगी आपला खाक्या दाखवत चोख कामगिरी बजावणारी पोलीस अधिकारी आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला करायला मिळाल्याचा आनंद आहे.  विशेष म्हणजे गोव्याची भाषा, त्याचा लहेजा हे सगळं करण्यात एक वेगळीच मजा आली.  प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा ‘अफलातू

मराठी मधली पहिली फॅशन इन्फ्लूएन्सर म्हणून सोशल मिडीयावर तिने स्वतःचा ठसा उमटविला

इमेज
*मराठी मधली पहिली फॅशन इन्फ्लूएन्सर म्हणून सोशल मिडीयावर तिने स्वतःचा ठसा उमटविला*  ( मुंबई : बातमीदार राम कोंडीलकर ) सुरुवातीला माझ्याकडे 'लाइट आणि माइकसाठी सुध्दा बजेट नव्हतं', आज माझी स्वतःची कंपनी, टीम आहे आणि स्वतःचा स्टुडीओ सुध्दा बांधला आहे *- अभिनेत्री आणि प्रसिद्ध यूट्यूबर उर्मिला निंबाळकर* माझ्या छोट्या घराच्या हॅालमध्ये मोबाइलवर मी यूट्यूबसाठी व्हीडीओ करायला सुरवात केली. लाइट आणि माइकसाठी सुध्दा बजेट नव्हतं त्यामुळे खिडकीच्या समोर बसून सकाळी लवकर मी शूट करायचे म्हणजे आवाज स्पष्ट येईल. आज माझ्या यूट्यूब सबस्क्राबरर्सचा टप्पा साडे नऊ लाखापर्यंत पोहचला आहे, माझी स्वतःची कंपनी आहे, टीम आहे आणि मी स्वतःचा स्टुडीओ सुध्दा बांधला - असं अभिनेत्री आणि यूट्यूबर उर्मिला निंबाळकर अभिमानाने सांगते. मराठी मधली पहिली फॅशन इन्फ्लूएन्सर म्हणून सोशल मिडीयावर तिने स्वतःचा ठसा उमटविला आहे. अनेक प्रसिध्द आंतरराष्ट्रीय मेक-अप ब्रॅंडसोबत काम करणारी ती पहिली मराठी अभिनेत्री आहे.  उर्मिला जवळपास दहा वर्षे चित्रपट आणि टेलिव्हीजन माध्यमातून काम करत होती. तिने अनेक मराठी चित्रपट, माल

आणीबाणीत सापडले उपेंद्र लिमये आणि विना जामकर

इमेज
आणीबाणीत  सापडले उपेंद्र लिमये आणि विना जामकर...! ( मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर ) सशक्त भूमिका करणाऱ्या कलाकारांमध्ये उपेंद्र लिमये आणि वीणा जामकर ही नाव आवर्जून घेतली जातात. हे दोन चतुरस्त्र कलाकार आता 'दिनिशा फिल्म्स' निर्मित ‘आणीबाणी’  या मराठी चित्रपटातून जोडीच्या रूपाने ग्रामीण अंदाजात दिसणार आहेत. लेखक अरविंद जगताप यांच्या साथीने मराठी रुपेरी पडद्यावर दिग्दर्शकीय पदार्पण करणारे दिनेश जगताप यांनी या ‘आणीबाणी’ साठी पुढाकार घेतला आहे. २८ जुलै ला ‘आणीबाणी’ चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.   ‘आणीबाणी’ सारखा संवेदनशील विषय चित्रपटातून रंजकपणे मांडण्यात आला आहे. या चित्रपटातील नायकाच्या, अभिमन्यूच्या भूमिकेत उपेंद्र लिमये तर त्याच्या पत्नीच्या म्हणजेच विमलच्या भूमिकेत वीणा जामकर आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने एकत्र काम करण्याचा आनंद व्यक्त करीत, आमच्या मैत्रीमुळे आमच्यातली केमिस्ट्री पडद्यावरही चांगलीच खुलली असल्याचं या दोघांनी सांगितले.  केवळ मनोरंजन एवढा एकच निकष सध्या मराठी चित्रपटांना लागू नाही. अनेक सामाजिक विषयही आज उत्तम प्रकारे हाताळले जात

मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या,बी आर एस, पक्षांची पत्रकार परिषद पार पडली

इमेज
मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या,बी आर एस, पक्षांची पत्रकार परिषद पार पडली मुंबई : मराठी पत्रकार भवन, आझाद मैदान येथे दिनांक  ६ जुलै २०२३रोजी  मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांच्या,बी आर एस, पक्षांची पत्रकार परिषद पार पडली पक्षांचे नेते मानिक कदम, समन्वय समिती महाराष्ट्र राज्य,व खासदार हरिभाऊ राठोड,नेते,बी आर एस पक्ष अशोकराव आल्हाट संस्थापक ,राष्ट्रीय अध्यक्ष जनहित लोकशाही पार्टी संतोष दादा चौधरी, लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष,बी आर एस,पक्ष बाळासाहेब सानप,शुक्ला अन्य मान्यवर नेत्यांच्या, उपस्थितीत ही पत्रकार परिषद पार पडली पत्रकार परिषदेत, महाराष्ट्रातील अनेक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली आगामी काळात,होत असलेल्या सर्व निवडणुकीत,  बी आर एस,पक्षाच्या वतीने, सर्व स्थानिक स्वराज्य संस्था विधानसभा लोकसभा, निवडणुकीत बी आर एस हा पक्ष ताकतीने उतरणार आहे अशी माहिती या वेळी उपस्थित मान्यवर नेत्यांनी दिली आमचा पक्ष कोणत्याही परिस्थितीत येथील प्रस्थापित राजकीय पक्षांना सोबतीला घेणार नाही तेलंगणा राज्याची निर्मिती झाल्यानंतर अल्पावधीतच त्या राज्याची प्रगती झाली त्याच प्रमाणे महा

https://youtu.be/i2BYjsxIK9Yरोटरी क्लब ऑफ पल्लावा की औरसे अंध और दिव्यांग व्यक्तीयो को अन्नदान और व्हील चेअर की मदतजनहित न्युज महाराष्ट्र 9960504729

https://youtu.be/i2BYjsxIK9Y रोटरी क्लब ऑफ पल्लावा की औरसे अंध और दिव्यांग व्यक्तीयो को अन्नदान और व्हील चेअर की मदत जनहित न्युज महाराष्ट्र 9960504729