भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा
भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव साजरा गावचा आणि गाव कुसा बाहेरच्या गावाचा, देशाचा आणि देशातल्या बहिष्कृत देशाचा विकास हा भारतीय संविधानाने झाला आहे - नवनाथ रणखांबे यांचे प्रतिपादन भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवा निमीत्ताने संविधान व सामाजिक परिवर्तनाच्या कवी संमेलनाचे अध्यक्ष नवनाथ आनंदा रणखांबे यांनी अध्यक्षिय भाषणात बोलताना, "भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्ताने गावचा आणि गाव कुसा बाहेरच्या गावाचा, देशाचा आणि देशातल्या बहिष्कृत देशाचा विकास हा भारतीय संविधानाने झाला आहे. कोणताही भेदभाव न करता संविधानाने सर्व सामान्य माणूस देशाच्या सर्वोच्च पदावर विराज मान झाला आहे. ही किमया भारतीय संविधानाची आहे. आज संविधानाच्या अमृत महोत्सवादिनानिमित्ताने व्याख्यानमाला, कवी संमेलन, विविध क्षेत्रात कार्य करणाऱ्या मान्यवरांचा कौतुक सोहळा, संविधान उद्देशिका घराघरात अशा छान उपक्रमा बरोबर संविधानाची जनजागृती प्रसार आणि प्राचार , शाम बैसाने अध्यक्ष पांचपीर ट्रस्ट (मोहाडी) यांनी ...