पोस्ट्स

संपादक 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

*ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे (जेनमा) यांचे वृद्धापकाळाने निधन*

इमेज
*ज्येष्ठ रंगकर्मी सरोज कोठारे (जेनमा) यांचे वृद्धापकाळाने निधन* मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर मुंबई: ज्येष्ठ रंगकर्मी, नाट्य-चित्रपट निर्मात्या सरोज ऊर्फ जेनमा कोठारे (वय ९३) यांचे आज सायंकाळी कांदिवली येथील त्यांच्या निवासस्थानी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे मुलगा प्रसिद्ध अभिनेते, निर्माते, दिग्दर्शक महेश कोठारे, नातू प्रसिद्ध निर्माता, दिग्दर्शक, अभिनेता आदिनाथ कोठारे असा परिवार आहे. कांदिवली येथील स्मशानभूमीत रात्री सरोज कोठारे यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. जेनमा कोठारे यांचे मूळ नाव सरोज. माहेरच्या त्या तळपदे. १९ जून १९३० ही त्यांची जन्मतारीख. जेनमा यांचे वडील माधवराव तळपदे हे बहुश्रुत व्यक्तिमत्त्व. त्यामुळेच जेनमा यांच्यावर लहानपणापासून चांगले संस्कार झाले. प्रायोगिक रंगभूमीच्या ओढीने जेनमा आणि महेश कोठारे यांचे वडील अंबर कोठारे यांची पहिल्यांदा भेट झाली. १९५२ मध्ये त्यांचा विवाह झाला. ‘जेनमा’ हे टोपण नाव त्यांना त्यांच्या मावस बहिणीने दिले होते. जेनमा आणि अंबर कोठारे यांनी कालांतराने ‘आर्टिस्ट कंबाइन’ नावाची नाट्यनिर्मिती संस्था स्थापन केली. या

*तेजस्विनीचा 'अफलातून' डॅशिंग अंदाज

इमेज
*तेजस्विनीचा 'अफलातून' डॅशिंग अंदाज * मुंबई प्रतिनिधी गणेश तळेकर मराठी सिनेसृष्टीतील ग्लॅमरस अभिनेत्री तेजस्विनी लोणारी हिचा बेधडक डॅशिंग अंदाज लवकरच पहायला  मिळणार आहे. वेगवेगळ्या भूमिकांमधून  प्रेक्षकांचे मनोरंजन  केल्यानंतर तेजस्विनी पोलिसी गणवेश चढवत आगामी ‘अफलातून’ या मराठी चित्रपटात आलिया सावंत या डॅशिंग पोलिस अधिकाऱ्याच्या भूमिकेत दिसणार आहे. साहा अँड सन्स स्टुडिओज,आयडियाज द एंटरटेन्मेन्ट कंपनी निर्मित ‘अफलातून’ हा चित्रपट येत्या २१ जुलैला प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'अ डिफेक्टीव्ह कॅामेडी' असं म्हणत लेखक, दिग्दर्शक परितोष पेंटर यांनी हा धमाल विनोदी चित्रपट प्रेक्षकांसाठी आणला आहे. आपल्या भूमिकेबद्दल बोलताना तेजस्विनी सांगते की, 'माझं यातलं व्यक्तिमत्व गोवन आहे. शांत, संयमी पण वेळप्रसंगी आपला खाक्या दाखवत चोख कामगिरी बजावणारी पोलीस अधिकारी आहे. माझ्या आजवरच्या भूमिकांपेक्षा वेगळी भूमिका मला करायला मिळाल्याचा आनंद आहे.  विशेष म्हणजे गोव्याची भाषा, त्याचा लहेजा हे सगळं करण्यात एक वेगळीच मजा आली.  प्रेक्षकांचे निखळ मनोरंजन करणारा ‘अफलातू

भाजप चे भारत बठीजा यांचा वाढदिवस उल्हासनगर मध्ये साजरा

इमेज
भाजप चे भारत बठीजा यांचा वाढदिवस उल्हासनगर मध्ये साजरा   उल्हासनगर: भारत प्रदेश प्रमुख आयटी सेल भाजपा अल्पसंख्याक मोर्चा महाराष्ट्र, जिल्हा सचिव भाजपा उल्हासनगर चे भारत बठीजा यांचा वाढदिवस उल्हासनगर मध्ये  साजरा करण्यात आला या वेळी भाजपचे उल्हासनगर पदाधिकारी हरेश बोधा, श्रीमती सिंधू शर्मा, कौशलेंद्र कुमार झा, मनीष तलरेजा, चरण थोरात, गिरीश अगीचा, राजेश गणेजा, राष्ट्रीय स्वयंसेवक संपर्क योगेश म्हात्रे, विश्व हिंदू परिषद अंबरनाथ जिल्हा सह-संयोजक अमित यशवंत भोईर  राष्ट्रीय स्वयंसेवक, भाजप, विश्व हिंदू परिषदेचे पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते  उपस्थित होते

ॲड किरण जाधव यांना वाढ दिवसा निमित्त दिल्या शुभेच्छा

इमेज
ॲड किरण जाधव यांना वाढ दिवसा निमित्त दिल्या शुभेच्छा उल्हासनगर -  ५  . येथे  अॕड किरण जाधव . यांच्या कार्यालय मध्ये जनहित न्युज महाराष्ट्र व साप्ताहिक बातमी जनहित चे संपादक - हरी आल्हाट , उल्हास सेवक चे मुख्य संपादक -  राजेश फक्के .  बहुजन शक्तिशाली चे उपसंपादक - अशोक एफ शिरसाट , पत्रकार - हर्षद पठाडे , प्रदीप आल्हाट, रोहित जाधव , अक्षय सपकाळे,  यांनी वाढदिवसा निमित्त अॕड किरण जाधव   यांचा  सत्कार केला व वाढ दिवसा निमित्त शुभेच्छा दिल्या

सुनिल साळुंके याची शिवसेना उपविभाग प्रमुखपदी

इमेज
सुनिल साळुंके याची  शिवसेना उपविभाग प्रमुखपदी   उल्हासनगर (अशोक शिरसाट ) सुनिल साळुंके हे शिवसेना मध्ये एकनिष्ठावान  शिव सेना  शाखा प्रमुख म्हणून काम करीत  आहेत तसेच  त्यांनी भारतीय मराठा संघाचा प्रचार करीत असून भारतीय मराठा संघ मध्ये  अध्यक्षपदावर ते काम करीत आहेत तसेच इतर जयंती  व अनेक छोटे  मोठे उपक्रम  राबविले आहेत  तसेच  शिवसेना शाखा प्रमुख या पदावर त्यांनी १०  ते १२  वर्षापासून  काम करीत आहे साळुंके यांनी विविध पदावर कामे केली आहे त्यांच्या कार्याची दखल घेत   शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे .यांच्या आदेश नूसार उल्हासनगर - ४ .  मध्ये  शिव सेना  कल्याण  जिल्हा प्रमुख  चंद्रकांत बोडारे. यांच्या जनसंपर्क शिव सेना शाखा येथे   उपविभाग प्रमुखपदी सुनिल  साळुंके यांची नियुक्ती करण्यात आली असून शिवसेना जिल्हा प्रमुख चंद्रकांत बोडारे . यांच्या हस्ते सुनिल साळुंके यांना उपविभाग प्रमुख पदाचे नियुक्तीपत्र देण्यात आले होते तसेच शिवसेना  उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेश नुसार आणि चंद्रकांत बोडारे यांच्या  प्रमुख मार्गदर्शनाखाली     माझ्यावर  विश्वास दाखवून पदभर मला दिले म्हणून मी पक्