गुहेत राहणाऱ्या रशियन बाईनं सांगितली सापांपासून बचावाची सोपी ट्रीक.
गोकर्णचं किर्र जंगल, खतरनाक विषारी सापं, जीव कसा वाचवला? गुहेत राहणाऱ्या रशियन बाईनं सांगितली सापांपासून बचावाची सोपी ट्रीक. उत्तर कन्नड जिल्ह्यातल्या गोकर्णमध्ये रामतीर्थ नावाचा डोंगर आहे, या भागामध्ये किर्र जंगल आहे, हा प्रदेश चारही बाजुनं विशाल आणि उंच झाडानं वेढलेला आहे. घनदाट जंगलामुळे या भागात सहसा कोणाचाही वावर नसतो. दुसरी गोष्ट म्हणजे या जंगलामध्ये माणसांचा फारसा वावर नसल्यामुळे अनेक हिंस्त्र आणि खतरनाक प्राण्यांचं हे जंगल अश्रयस्थान आहे. या जंगलामध्ये तब्बल वीस पेक्षा अधिक खतरनाक विषारी प्रजातीचे साप आढळून येतात. थोडक्यात काय तर या जंगलामध्ये जाण्याची कोणीही हिंमत करत नाही, आणि गेलाच तर जिंवत परत येईल याची खात्री कोणीही देऊ शकत नाही. हा रामतीर्थ नावाचा जो डोंगर आहे, तीथे काही गुफा आहेत. त्यातील एका गुफेमध्ये एक रशियन महिला गेल्या अनेक दिवसांपासून तिच्या दोन मुलींसोबत राहात असल्याचा धक्कादायक प्रकार नुकताच समोर आला आहे. या भागांमध्ये वारंवार भूस्खलनाच्या घटना घडतात, असंच एक दिवस भूस्खलन झालं, मातीच्या ढिगाऱ्याखाली कोणी दबलं तर नाही ना? याच...