पोस्ट्स

डिसेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जनहित न्यूज महाराष्ट्रदिनांक २८ डिसेंबर प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष, पक्षप्रमुख, राज्यमंत्री मा. बच्चूभाऊ कडू साहेब यांच्या विचारांना अनुसरुन तसेच पक्षाचे ठाणे जिल्हा अध्यक्ष मा.स्वप्निलजी पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि पक्षाचे अंबरनाथ तालुका संपर्क प्रमुख मा. शरद सोनावणे साहेब व वरिष्ठांच्या आशीर्वादाने मा. रविभाऊ डोईजड साहेब यांची अंबरनाथ तालुका अध्यक्ष पदी तसेच मा. सुभाष थोरात साहेब यांची अंबरनाथ तालुका उपाध्याक्ष पदी निवड झाल्याबद्दल प्रहार जनशक्ती पक्ष, बदलापूरच्या वतीने त्यांना अभिनंदन वपुढील वाटचालीस खुप खुप शुभेच्छा देण्यात आल्याजनहित न्यूज महाराष्ट्र बदलापूर

इमेज

साप्ताहिक उद्देश विकास चा ७ वा. वर्धापन दिवस साजरा.साप्ताहिक उद्देश विकास चा ७ वां वर्धापन दिनानिमित्त समाज सेवक व संपादक पत्रकार यांना संपादक माननीय सोमविर भगवाने यांच्या वतीने २०२१ चे केलेंडर तसेच समान पत्र देवून सत्कार करण्यात आलाया वेळी टीम ओमी कालानी चे प्रमुख माननीय. ओमी कालाणी. आणि यु टी ए अध्यक्ष माननीय सुमित चक्रवर्ती. रमेश आहुजा. तसेच टी ओ के चे पदाधिकारी आणि कार्यकर्ते. रवि खैरालिया. रवि राज खैरालीया. श्याम भाऊ जांबोलीकर. . दीपक साठे. शरद घुडे. शशिकांत दायमा. महेश अमेसर. सुशील पंजाबी. तसेच अनेक मान्यवर. व पत्रकार उपस्थित होते जनहित न्यूज महाराष्ट्र. उल्हासनगर

इमेज

आनंदाची बातमी ९ महिन्याच्या प्रतिक्षे नंतरमुंबईतील पाहिले नाट्य गृह सुरू दामोदर नाट्य गृह ( परेल ) येथील शुक्रवार 25 डिसेंम्बर (नाताळ सुट्टी ) दुपारी 4 वाजता23 सप्टेंबर ला मुंबई तुफानपाऊस पडला आणि परेल येथील दामोदर हॉल येथे पाणी भरले आणि खूप नुकसान झाले होते तरी ही दामोदर हॉल चे संचालक मंडळ आणि दामोदर हॉल ची पूर्णआजी माजी व्यवस्थपक टीम यांनी ताबडतोब युद्ध पातळीवर काम करून नाट्य गृह छान तयार करून सरकार च्या आदेश ची वाट पाहत बसले होते.आणि 5 नोव्हेंबर रोजी रंग भूमी दिनी आज पासून नाट्य गृह सुरूही बातमी समजली तरी पण सगळे निर्माते शांत,मुबंई सोडून बाहेर ची नाट्य गृह सुरू झाली आहेत. पण आपल्या मुंबई ही महाराष्ट्र ची राजधानी तिकडे नाट्य गृह अजून ही सुरू नाही ह्याचं वाईट वाटलं आणि एक तरी नाट्यगृह माझ्या माय बाप रसिक प्रेषक यांच्या साठी नाटक सुरू झाले पाहिजे.असा ठाम विश्वास घेऊन बुकिंग क्लार्क आणि व्यवस्था पक सचिव हरी पाटणकर हया नात्याने नाट्य गृह सुरू झाले पाहिजे म्हणूनआजी माजी व्यवस्थापक .बाबू राणे,पाटील साहेब. आणि दामोदर नाट्य गृह चे सोशल सर्व्हिस लिंगचे संचालक श्री. आनंद माईणकर - अध्यक्ष श्री. विजय वर्टी - ऊपाध्यक्ष श्री. चंद्रकांत खोपडे - सचिव यांच्या बरोबर चर्चा करून नाट्य गृह आपल्या रसिक प्रेषक यांच्या साठी शुक्रवार 25 डिसेंबर हया दिवसा पासून नाट्य गृह आपल्या रसिक प्रेषक यांच्या साठी सुरू करत आहोत सगळ्यांचे खूप खूप आभारी आहोत.मुबंई मधील पाहिले नाटय गृह सर्व महाराष्ट्र सरकार नि दिलेले नियमावली पाळून आणि माननीय मान्य वरयांच्या उपस्थित तदामोदर नाट्य गृह सुरू

इमेज

*विकास प्रबोधिनी* या रजिस्टर्ड संस्थेच्या विद्यमाने थोर विचारवंत व कृतीशील साहित्यिक आदरणीय शिवा इंगोले सर यांच्या सन्माननीय अध्यक्षतेखाली ७ व्या आंबेडकरी साहित्यसंमेलनाचे भव्य आयोजन करण्यात येत आहे. त्या प्रित्यर्थ आज दिनांक - ०६.१२.२०२० रोजी उल्हासनगर येथे आयोजित बैठकीमध्ये महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून डॉ बाबा साहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले तसेच प्रस्तावित साहित्य सम्मेलनाचे सन्माननीय अध्यक्ष आदरणीय शिवा इंगोले सर यांच्या अभिनंदनाचा कार्यक्रम पार पडला. या निमित्त राम साबळे, शिवा इंगोले, श्रीकृष्ण टोबरे एस एस ससाने, रोहित साळवे आदी सम्मेलन समितीच्या पदाधिकाऱ्यासह अनेक मान्यवर सदस्य उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकृष्ण टोबरे, अध्यक्ष विकास प्रबोधिनी यांनी केले. प्रस्तावित ७व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष शिवा इंगोले यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारित होऊन, उपस्थितांनी शिवा इंगोले यांना शुभेच्छा दिल्या.ह्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन संजय वाघमारे यांनी केले व आभार प्रदर्शन अनिल भालेराव यांनी केले.

इमेज

*मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सिनेकलाकारांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश...**कलाकारांचे प्रश्न शासनामार्फत सोडवण्याची प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांची ग्वाही...* दिनांक ३ डिसेंबर २०२० जनहित न्यूज महाराष्ट्र संपादक हरी आल्हाट. ........................................................................मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक सिने-नाट्य कलाकार, लेखक, दिग्दर्शक, निर्माते आणि तंत्रज्ञांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. अजित पवार यांनी सर्व कलाकारांचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वागत केले आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी ज्येष्ठ निर्माते-दिग्दर्शक संजय भोसले, वेशभुषा व केशभुषाकार श्रीमती हिना मोमीन, नृत्य दिग्दर्शिका श्रीमती अॅग्नीस हेमिल्टन, दिग्दर्शक-निर्माते-अभिनेते गजानन चव्हाण, लेखक-कवी चंद्रकांत साळसकर, लेखक- दिग्दर्शक-अभिनेते सुबोध पवार, ज्येष्ठ निर्माते भास्कर ताकवले, अभिनेता तुषार साळी, अभिनेत्री श्रीमती स्नेहल निंबाळकर, ज्येष्ठ अभिनेते मधुकर सोलकर, निर्माती- दिग्दर्शक श्रीमती पूजा श्रीवास्तव, ज्येष्ठ अभिनेते-दिग्दर्शक-निर्माते पितांबर काळे, ज्येष्ठ अभिनेते नरेंद्र दांडेकर, ज्येष्ठ अभिनेता- दिग्दर्शक हृद्यनाथ राणे, ज्येष्ठ नाट्य व्यवस्थापन. संघ प्रमुख हरी पाटणकर, चित्रकार निलेश मोहिते, अभिनेता विजय कंक, निर्माते- दिग्दर्शक सुधीर पेडणेकर, नृत्य-दिग्दर्शक किरण लोटे, जेम्स कुवेल, जयंत कोपरकर, विनय साळसकर, निसार खान, नासीर कुरेशी अशा अनेकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. मराठी चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार आणि तंत्रज्ञांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या चित्रपट-साहित्य-कला-सांस्कृतिक विभागात प्रवेश केला. त्यांचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनीही पक्षात स्वागत केले. कला-सांस्कृतिक विभागामार्फत पुढील काही दिवसात सर्व सदस्यांचे प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्याचा आमचा मानस आहे. कलाकारांचे प्रश्न जाणून घेऊन त्यावर शासनामार्फत तोडगा काढण्याचे काम आम्ही नक्की करु अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, चित्रपट-साहित्य-कला-सांस्कृतिक विभागाचे मुंबई अध्यक्ष मनोज व्यवहारे उपस्थित होते.

इमेज

जनहित न्यूज महाराष्ट्र. *नामांकित ब्रँडच्या बनावटी जीन्स आणि टीशर्ट बनवणाऱ्या फॅक्टरी वर कॉपीराईट अधिकारी व मुंबई क्राईम ब्रँच चा छापा* कॉपीराईट अधिकारी रामजीत गुप्ता यांना सूत्रांकडून गुप्त बातमी मिळाली होती की मुंबई मालाड पूर्व पठाणवाडी या ठिकाणी नॅशनल व मल्टिनॅशनल कँपनीच्या बनावटी जीन्स व टीशर्ट बनविले जातात. इन्वेस्टिंगेशन टीमने ताबडतोब ही खबर मुंबई क्राईम ब्रँच ला दिली. त्यानंतर रामजीत गुप्ता व त्यांच्या टिमने मिळून मालाड मधील ४ जागांवर दिनांक १ डिसेंबर २०२० रोजी छापा टाकला. या छाप्यात लिवाईस,सिके,अरमानी,. ली कूपर .सारख्या अनेक नामांकित कंपन्यांचे जीन्स व टीशर्ट भारी प्रमाणात प्राप्त झाले.. जवळपास तीस लाखापेक्षा जास्त रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनि जप्त केला आहे. पोलिसांनी आरोपींना चौकशीसाठी ताब्यात घेतले असून .पोलिसांच्या सांगण्यानुसार चौकशीअंती अजून काही नकली कारभारी त्यांच्या कैदेत असतील. या कारवाई मध्ये कॉपीराईट अधिकारी रामजीत गुप्ता,. रवी वासवांनी , संतोष नालेकर ,जफर शेख या सर्व टीम च्या अथक प्रयत्नांने ही कार्यवाही ला यश आले.

इमेज

ठाणे जिल्ह्यातील तालुका.मुरबाड...................... येथील अनुदानित आश्रम शाळेची स्वयंपाकिन. या पदावर काम करीत असलेल्या एका आदिवासी विधवा २ लहान मुलांचे आई चा न्याय मिळविण्या साठी लढ्ढा. अनुदानित आश्रम शाळा चे संचालक व मुख्याध्यापक यांनी प्रकल्प अधिकारी यांना ठरविले दोषी. तर प्रकल्प अधिकारी यांनी जबाबदारी न घेता या महिलेचे काही बरे वाईट झाल्यास अनुदानित शाळा चे मुख्याध्यापक राहतील जबाबदार असे दिले मुख्याध्यापक यांना लेखी आदेश ठाणे जिल्ह्यातील .तालुका मुरबाड तळवली या ठिकाणी असलेल्या अनुदानित आश्रम शाळे ची विधवा महिला कर्मचारी श्रीमती. रेखा नंदकुमार निरगुडा हिला दिनांक ७ जानेवारी २०१७ रोजी अनुकंपावर पती च्या जागेवर अनुदानित आश्रम शाळेमध्ये स्वयंपाकिन या पदावर नेमणूक करण्यात आली या नेमणूक पत्रकावर कोणत्याही ठिकाणी कर्मचारी नियुक्ती पत्रावर गट श्रेणी . अ. ब. क. ड. चा उलेख लिखित केला नाही. असे नियुक्ती पत्र देवून तिला कामावर रुजू करण्यात आले. या पूर्वी श्रीमती रेखा नंदकुमार निरगुडा हीचे पती नंदकुमार आलो निरगुडा यांची नियुक्ती दिनांक २३ जून २००८ रोजी शिक्षक या पदावर नेमणूक करण्यात आली होती. त्यांच्या ही नियुक्ती पत्रकावर गट. श्रेणी अ. ब. क. ड. असा लिखित उलेख केलेला नाही दिनांक ७ सप्टेंबर २०१६ रोजी त्यांचा अपघाती मृत्यू झाला असून अनुदानित आश्रम शाळा चे संचालक मंडळ आणि मुख्याध्यापक यांनी अनुदानित आश्रम शाळेमध्ये काम करीत असलेले मयत कर्मचारी. नंदकुमार आलो निरगुडा यांचे वारस पत्नी. रेखा नंदकुमार निरगुडा हिला कोणतीही रक्कम देण्यात आली नाही. या साठी तिने सतत अनुदानित आश्रम शाळा चे संचालक आणि मुख्याध्यापक यांच्या कडे पतीच्या निधनानंतर मिळणाऱ्या रक्कम तसेच गेली ३ वर्षापासून तिने काम केलेल्या वेतनाची साठी रीतसर पत्र व्यवहार केले . परंतु नेहमीच तिला उडवा उडवीची उतरे देण्यात येत होती असी माहिती रेखा नंदकुमार निरगुडा यांनी दिली... सतत पतीच्या मिळणाऱ्या रक्कम ची व ती काम करीत असलेल्या ३ वर्षाच्या वेतनाची मागणी करीत असलेल्या रेखा नंदकुमार निरगुडा हिला अनुदानित आश्रम शाळे मधून कामावरून काढण्यात आले. तिने कारण विचारले असता. माहिती देण्यात आली की. नंदकुमार आलो निरगुडा हे ब श्रेणी चे कर्मचारी आहेत आणि या कारणास्तव रेखा नंदकुमार हिला कामावरून कमी करण्यात आले... माहिती मिळताच. रेखा नंदकुमार हिने अपर आयुक्त ठाणे यांच्या कडे चौकशी करून माहिती मिळवली व नंदकुमार हे क. श्रेणीचे कर्मचारी असल्याचे पत्र आणले परंतु पुन्हा तिला दुसरे पत्रक देण्यात आले त्या मध्ये प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर जिल्हा ठाणे यांनी पत्रा द्वारे माहिती दिली . नंदकुमार निरगुडा यांच्या पत्नीला अनुकंपा तत्त्वावर दिलेली नियुक्ती अनुदनैय असा उलेख करण्यात आलेले पत्र देण्यात आले . सध्या एक आदिवासी विधवा असलेली २ मुलांची आई रेखा नंदकुमार निरगुडा हिने .२७ जानेवारी २०२० रोजी माहिती अर्ज दाखल करून मला न्याय मिळाला नाही तर मी अमरण उपोषण करीन असा इशारा दिला परंतु प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प शहापूर चे सहायक प्रकल्प अधिकारी यांनी. कोणतीही जबाबदारी न घेता . शासकीय आश्रम शाळा चे मुख्याध्यापक यांना लेखी कळविले आहे की. आपण केलेल्या दिरंगाई मुळे श्रीमती निरगुडा यांच्या बाबत काही बरे वाईट झाल्यास त्यांची सर्वस्वी जबाबदारी आपली राहील याची नोंद घ्यावी. असे लेखी पत्र दिले. असतानाही मुख्याध्यापक व संचालक श्रीमती रेखा निरगुडा यांना न्याय देण्यासाठी पुढाकार घेत नसल्याचे दिसून येत आहे. तर एकीकडे प्रकल्प अधिकारी आपली जबाबदारी घेण्यास नकार देत आहेत...... आता एका विधवा आदिवासी महिलेने न्याय मिळविण्या. संबंधित अधिकारी तसेच शासनाकडे. मागणी केली आहे.................................................................. ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज

इमेज