पोस्ट्स

बातमी जनहित / जनहित न्युज महाराष्ट्र 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

भावपूर्ण आदरांजली

इमेज
                     भावपूर्ण आदरांजली                    भावपूर्ण आदरांजली वाशिंद :  दिवंगत सिंधुबाई शिवराम भडांगे वय 75 वर्षे मुक्काम वासिंद पूर्व यांचे बुधवार दिनांक 3 मे 2023 रोजी  दुःखद निधन झाले सिंधुबाई शिवराम भडांगे ह्या  जनहित न्यूज महाराष्ट्र व साप्ताहिक बातमी जनहित च्या प्रतिनिधी, निवेदिका  सौ आशा नवनाथ रणखांबे यांच्या मातोश्री होत्या जनहित न्यूज महाराष्ट्र व साप्ताहिक बातमी जनहित परिवार टीम तर्फे दिवंगत सिंधुबाई शिवराम भडांगे यांना भावपूर्ण आदरांजली

यशोधरा बुद्ध विहार हनुमान नगर या ठिकाणी वृक्ष लागवड

इमेज
यशोधरा बुद्ध विहार हनुमान नगर या ठिकाणी वृक्ष लागवड उल्हासनगर : हौसाई फाउंडेशन, जनहित स्वयंसेवी संस्था, तसेच दिव्यांग आधार सेवा संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने यशोधरा बुद्ध विहार हनुमान नगर या ठिकाणी बौद्ध पौर्णिमा निमित्त वृक्ष लागवडीचा कार्यक्रम करण्यात आला यावेळी जनहित स्वयंसेवी संस्थेच्या अध्यक्षा ज्योती पवार, हौसाई फाउंडेशनचे आबासाहेब साठे, दिव्यांग आधार सेवा संस्थेचे प्रवक्ते बी आर पाटील, जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे संपादक हरी आल्हाट, पत्रकार बाबू आढाव, सुनील शेंडगे, तसेच भिखु महा मोगलायन, भंते वप्पू, बुद्धदीप, गुनरत्न , मेतानंद , प्रज्ञानंद, सामनेर, सदानंद , शासनज्योती, प्रामुख्याने उपस्थित होते, या प्रसंगी जनहित स्वयंसेवी संस्थेच्या महाराष्ट्र अध्यक्षा व साप्ताहिक बातमी जनहित च्या उपसंपादिका ज्योती पवार यांच्या हस्ते प्रथम वृक्ष लागवड करून वृक्ष लागवडीच्या कार्यक्रमाला सुरुवात केली बातमी आणि जाहिराती प्रसिद्ध करण्यासाठी संपर्क साधा 9960504729

पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध, सभागृहात घोषणाबाजी

इमेज
पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध, सभागृहात घोषणाबाजी      मुंबई: शरद पवार हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) अध्यक्षपदावरुन निवृत्त होण्याचा निर्णय घेतला आहे. संघटनेबाबत पुढे काय करायचं याबाबत मी एक समिती स्थापन करणार असून यात सदस्य निर्णय घेतील, असं शरद पवार यांनी सांगितलं. शरद पवारांचं आत्मचरित्र 'लोक माझे सांगाती' च्या सुधारीत आवृत्तीचे आज प्रकाशन झाले. त्यावेळी ते बोलत होते. परंतु ते निवृत्त कधी होणार याबाबत त्यांनी सांगितलं नाही.  "मी कुठेही असलो तरी सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी उपलब्ध राहिन हे आश्वस्त करतो. जनतेचे प्रेम आणि विश्वास हाच माझा श्वास आहे," असं शरद पवार निवृत्तीची घोषणा करताना म्हणाले.  पवारांच्या निवृत्तीच्या निर्णयाला कार्यकर्त्यांचा विरोध, सभागृहात घोषणाबाजी दरम्यान, शरद पवार यांच्या निवृत्तीच्या घोषणेनंतर वाय बी सेंटरमध्ये उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शरद पवार यांनी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, शरद पवार,

पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफ - सफाई व्यवस्थित करावी- मनसेचे अँड. प्रदिप गोडसे यांची मागणी

इमेज
पावसाळ्यापूर्वी नाल्यांची साफ - सफाई व्यवस्थित करावी - मनसेचे अँड. प्रदिप गोडसे यांची मागणी उल्हासनगर :  सध्या पावसाळ्याचे वातावरण निर्माण झाले आहे. पाऊस कधीही पडू शकतो. त्याअनुषंगाने उल्हासनगर महापालिका क्षेत्रात पॅनल क्र -१३ मध्ये गेल्या पावसाळ्यात काही भाग पाण्यात गेला होता.त्याचे मुख्य कारण म्हणजे नाले सफाई व्यवस्थित झाली नाही.       गेल्या दोन वर्षांचा अनुभव घेता पॅनल क्र -१३ मध्ये काही नाले आहे जे पावसाळ्यापूर्वी त्यांची व्यवस्थित सफाई करणे गरजेचे आहे. याचा विचार करून मनसेचे अँड.प्रदिप गोडसे यांच्यावतीने उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त साहेब, अतिरिक्त आयुक्त, सहाय्यक सार्वजनिक आरोग्य अधिकारी, मुख्य स्वछता निरीक्ष यांना प्रभाग क्र -१३ मधील विशेषतः प्रथम स्थानी लालचक्की भागातील श्री.कृष्ण कॉलनी, शिव मार्ग मागील नाला, ज्योती कॉलनी येथील नाला, पांच पांडव येथील नाला, हनुमान नगर येथील नाला, गुलमोहर समोरील नाला, डॉ. शेगावकर समोरील नाला पहिल्या टप्प्यात साफ करून घेण्यास यावे याकरिता निवेदन देऊन अधिकारी सोबत चर्चा करण्यात आली.           कारण यापरिसरातील नाले वेळेवर व व्यवस्थित सा