जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप
जागतिक दिव्यांग दिवस उल्हासनगरमध्ये उत्साहात साजरा; दिव्यांग बांधवांना पालिकेकडून ओळखपत्र वाटप उल्हासनगर: जागतिक दिव्यांग दिनाचे औचित्य साधून उल्हासनगर शहरात ३ डिसेंबर २०२५ रोजी 'दिव्यांग आधार सेवा संस्थे'च्या वतीने हा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी उल्हासनगर महानगरपालिकेच्या सहकार्याने अनेक दिव्यांग लाभार्थ्यांना पालिका ओळखपत्रांचे वाटप करण्यात आले, ज्यामुळे त्यांना महापालिकेच्या परिवहन सेवेतील बसेसमधून मोफत प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध होणार आहे. दिव्यांग आधार सेवा संस्थेने गेली दीड वर्ष केलेल्या प्रयत्नांना यश मिळाले असून, या ओळखपत्र वाटपामुळे शहरातील नोंदणीकृत दिव्यांग बांधवांना महापालिका परिवहन विभागाच्या बसेसमध्ये मोफत प्रवास करता येणार आहे. आपली मागणी पूर्ण केल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष सचिन सावंत यांनी महापालिकेचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. या कार्यक्रमासाठी उल्हासनगर महापालिका प्रशासक तथा आयुक्त श्रीमती आव्हाळे मॅडम यांच्यासह दिव्यांग कल्याणकारी विभागाचे उपायुक्त साहेब, दिव्यांग कल्याणकारी विभागाचे वरिष्ठ लिपिक, व...