पोस्ट्स

जनहित न्युज महाराष्ट्र/बातमी जनहित 9960504729 लेबलसह पोस्ट दाखवत आहे

विद्यार्थ्यांमध्ये केवळ उपजीविकेकरिता ज्ञान नव्हे तर समाजसमर्पित ध्यान हवे,अवधान हवे

इमेज
विद्यार्थ्यांमध्ये केवळ उपजीविकेकरिता ज्ञान नव्हे तर समाजसमर्पित ध्यान हवे,अवधान हवे भावी बिसनेस लीडर्स घडवताना आजूबाजूला असणाऱ्या सामाजिक प्रश्नांची जाणीव आणि समाजभान विद्यार्थ्यांमध्ये निर्माण व्हावे या उद्देशाने जयश्री शरदचंद्र कोठारी बिझनेस स्कूल या मुंबईतील मॅनेजमेंट स्कूल ने मंथन या उपक्रमाचे आयोजन केले होते. त्याचा समारोप दि २ मार्च २०२४ रोजी किर्ती महाविद्यालयाच्या सभागृहात झाला. लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीचा भाग असणाऱ्या जे एस के बिसनेस स्कुल ने व्यवस्थापन कौशल्यासोबत सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास हे ध्येय समोर ठेवून हा उपक्रम राबविला होता  या अंतर्गत जनकल्याण समितीच्या मार्फत विविध सेवा वस्त्यांमध्ये चालणाऱ्या ‘माता-बाल आरोग्य सेवा’ या सेवाकार्यास विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष भेटी दिल्या. तिथे काम करणाऱ्या सेवाव्रतींशी तसेच स्थानिक लाभार्थ्यांची संवाद साधला. जनकल्याण समितीच्या माध्यमातून चालणाऱ्या या उपक्रमाचे शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली त्रिमितीय संशोधन आराखड्याच्या साहायाने विश्लेषण केले. यात विद्यार्थ्यांनी शिक्षकांचा मार्गदर्शनाखाली