पोस्ट्स

संवाद दिनदर्शिका–२०२२ चे प्रकाशन लेबलसह पोस्ट दाखवत आहे

मा.सुभाष साळुंके व सौ.सुवर्णा साळुंके यांच्या संवाद दिनदर्शिका–२०२२ चे प्रकाशन शिवसेना नेते एकनाथ शिंदे व खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली

इमेज
मा.सुभाष साळुंके व सौ.सुवर्णा साळुंके यांच्या संवाद दिनदर्शिका–२०२२ चे प्रकाशन शिवसेना नेते एकनाथ शिंदे व  खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  सन–2021मध्ये कोरोना काळात नगरसेवक सुभाष साळुंके व संवाद फाउंडेशन अध्यक्ष सौ सुवर्णा ताई साळुंके  यांनी केलेल्या सामाजिक कार्याचा, तसेच प्रभागातील विकास कामाचा आढावा आणि विविध उपक्रमांची माहिती देणारी नाविन्यपूर्ण अद्यावत असलेली संवाद दिनदर्शिका-2022 याही वर्षी जनसेवेत रुजू करण्यात आली आहे   गेले ८ वर्ष सातत्याने नगरसेवक सुभाष साळुंके हे कॅलेंडर वेळे पूर्वी २००० घरा पर्यंत पोहच करीत आहेत  दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शिवसेना नेते,  नगरविकास, पालक मंत्री एकनाथ शिंदे व  खासदार मा.डॉ.श्रीकांत शिंदे  यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले या वेळी साहेबांनी संवाद दिनदर्शिकेचे व साळुंके यांच्या कामाचे भरभरून कौतुक करून साळुंके यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या नगरसेवक सुभाष साळुंके  आणि सौ.सुवर्णा साळुंके यांनी त्यांचे आभार व्यक्त केले