जातेगावात आईला काव्यफुलांनी अभिवादन नेटावटे परिवाराचा अनोखा उपक्रम
सामाजिक उपक्रम घेऊन आईला अनोखी आदरांजली वाहिली आहे. आईचं दुःख सावरून नेटावटे परिवाराने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला आहे व प्रबोधन केले आहे. म्हणून इतर परिवाराने देखील नेटावटे परिवाराचा आदर्श घ्यावा, असे तहसीलदार राजश्री अहिरराव यांनी बोलतांना सांगितले. नेटावटे परिवाराच्या वतीने जातेगाव येथील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. वाचन संस्कृती वाढावी म्हणून प्रबोधनात्मक आणि महामानवांच्या पुस्तकाचे वितरण करण्यात आले. आईचे स्वप्न प्रत्यक्षात उतरवण्यासाठी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ३८ नागरिकांना सन्मान चिन्ह, सन्मान पत्र, शाल आणि पुष्पगुच्छ देऊन माता रमाई प्रतिष्ठानचे अध्यक्ष नाना हरी नेटावटे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. तर या अनोख्या उपक्रमाचे नेटावटे परिवाराचे सर्वत्र कौतुक होत आहे. प्रतिनिधी आशा रणखांबे. जनहित न्यूज महाराष्ट्र नाशिक _________________________________