पोस्ट्स

वैशिष्ट्यीकृत पोस्ट

उल्हासनगर कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची होणार होती जम्बो भरती उल्हासनगर शहरात कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये, या पार्श्वभूमीवर उल्हासनगर महापालिकेने डॉक्टर सह अन्य पदांची तात्पुरत्या स्वरुपात जम्बो भरती सुरू केली आहे. यात .डॉक्टरांची . तसेच परिचारिका .वॉर्डबॉय यांच्यासह अन्य पदे .भरण्यात येणार होती. कोरोना रुग्णांची संख्या. वाढत असल्याने डॉक्टर,नर्स, वॉर्डबॉय यांच्यासह अन्य कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी पडत आहे. आरोग्य सेवेवर ताण पडू नये म्हणून उल्हासनगर महापालिकेचे आयुक्त डॉ.राजा दयानिधी यानी डॉक्टर सह अनेकवपदे तात्पुरत्या स्वरूपात भरती करण्याचा निर्णय घेतला होता, तश्या जाहिराती सुद्धा करण्यात आल्या होत्या, मुलाखती १६ एप्रिल रोजी पर्यंत झाल्या,असूनआज पर्यंत कोविड रुग्णालयासाठी डॉक्टरांसह ३५३ पदांची भरती होणार होती त्याचे काय झाले, हा प्रश्न मुलाखती देणाऱ्या उमेदवारां मध्ये चर्चे चा विषय ठरत आहे, तर उल्हासनगर शहरात रुग्ण वाढत असताना इतकी मंद प्रक्रिया का ? आणि या भरती ला विलंब का होत आहे हा प्रश्न निर्माण झाला आहे.

इमेज

उल्हास नदीच्या पाण्याचा लालसर रंग; कर्जतच्या चिल्हार नदीकाठावरील बेसुमार डोंगर कटिंग आणि मातीचा भराव कारणीभूत?

इमेज
उल्हास नदीच्या पाण्याचा लालसर रंग; कर्जतच्या चिल्हार नदीकाठावरील बेसुमार डोंगर कटिंग आणि मातीचा भराव कारणीभूत ?   उल्हास नदी बचाव कृती समिती आणि पर्यावरणप्रेमींची प्रत्यक्ष पाहणी   अभिनंदन लोधा प्रकल्पाच्या परिसरात मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड व उत्खनन उघड   वैज्ञानिक तपासणीची आणि संयुक्त पंचनाम्याची मागणी बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून अचानक उल्हास नदीचे पाणी लालसर व गढूळ झाले होते उल्हास नदीच्या गढुळ पाण्याची बातमी सुद्धा प्रसारित झाली होती उल्हास नदीच्या पाण्याचा नेमका स्रोत शोधण्यासाठी उल्हास नदीच्या वरच्या प्रवाहापासून विविध भागांत प्रत्यक्ष पाहणी करण्यात आली. या पाहणीदरम्यान कर्जतजवळील पिंपळोळी परिसरातील चिल्हार नदीकाठावर सुरू असलेले अभिनंदन लोधा कंपनीचे १८० एकर क्षेत्रातील प्लॉटिंग प्रकल्प आणि मोठ्या प्रमाणातील डोंगर कटिंग हा अत्यंत गंभीर प्रकार समोर आला आहे. या संपूर्ण प्रकरणाची वैज्ञानिक तपासणी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी उल्हास नदी बचाव कृती समितीने केली आहे. डोंगर कटिंग व भुस्खलनाचा धोका पिंपळोळी परिसरा...

28 सप्टेंबर 2026 सोमवार अंक साप्ताहिक बातमी

इमेज
28 सप्टेंबर 2026  सोमवार अंक साप्ताहिक बातमी

उल्हासनगरमध्ये "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन*

इमेज
* उल्हासनगरमध्ये "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता अभियानांतर्गत विशेष शिबिराचे आयोजन*  उल्हासनगर: महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागांतर्गत, मा. जिल्हाधिकारी कार्यालय ठाणे व तहसिलदार कार्यालय उल्हासनगर यांच्या संयुक्त विद्यमाने "राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता" या अभियानांतर्गत “भटके-विमुक्त हक्क व प्रमाणपत्र अभियान” (सन २०२६-२०२७) आयोजित करण्यात आले आहे.  * ठिकाण* : गोपाळ समाज मंदिर, शास्त्रीनगर, विठ्ठलवाडी, उल्हासनगर-३  * *दिनांक:* २९ सप्टेंबर २०२६ (मंगळवार)  * *वेळ:* सकाळी ११.०० ते सायंकाल ३.०० वाजेपर्यंत    *शिबिरात वाटप व सेवा मिळणारे दाखले व योजना*  या शिबिरात नागरिकांसाठी विविध महत्त्वाच्या कागदत्रांची आणि योजनांची सोय करण्यात आली असून, त्याखालीलप्रमाणे लाभ मिळणार आहे:   * उत्पन्न / अधिवास / रहिवास दाखले  * जातीचा / नॉनक्रिमिलेअर दाखला  * निवडणूक ओळखपत्र  * आधार कार्ड नोंदणी / दुरुस्ती  * संजय गांधी निराधार अनुदान योजना  * आयुष्मान भारत कार्ड  * श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना  * शिधापत्रिका (रेशन...

​डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यालयास भीमराव निकम-चिलगावकर यांची सस्नेह सदिच्छा भेट

इमेज
​डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंडच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यालयास भीमराव निकम-चिलगावकर यांची सस्नेह सदिच्छा भेट ​पुणे (प्रतिनिधी) : सामाजिक, विधायक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक आणि आरोग्यविषयक क्षेत्रात अग्रेसर असलेल्या ‘डॉ. अनिलकुमार गायकवाड सामाजिक सेवाकुंड’ या मानवतावादी संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यालयास (वारजे, पुणे) ‘बहुजन संग्राम’ संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष तथा ‘वृत्तदर्शन मिडिया’चे संपादक भीमराव निकम-चिलगावकर यांनी नुकतीच सस्नेह भेट दिली. ​यावेळी त्यांच्या समवेत बहुजन संग्राम संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश संघटक तथा वृत्तदर्शन मिडियाचे प्रतिनिधी मुरलीधर काळे आणि महिला आघाडीच्या महाराष्ट्र राज्य संघटन सचिव, भीमराव निकम यांच्या स्वीय सहाय्यक (पी.ए.) तथा वृत्तदर्शन मिडियाच्या प्रतिनिधी सोनल श्रीसुंदर उपस्थित होते. ​मान्यवरांनी सेवाकुंडाच्या पश्चिम महाराष्ट्र कार्यालयास प्रत्यक्ष भेट देऊन संघटनेचे उपाध्यक्ष नंदकिशोर शहाडे यांची सदिच्छा भेट घेतली आणि त्यांच्या पुढील सामाजिक वाटचालीस भरभरून शुभेच्छा दिल्या. ​या प्रसंगी सेवाकुंडाच...

कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदकभारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार

इमेज
कॅडेट धैर्य नाईकची ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’मध्ये नोंद; राष्ट्रीय कराटे स्पर्धेत पटकावले सुवर्णपदक भारतीय सैनिकी विद्यालयात धैर्य नाईकचा भव्य सत्कार खडवली (विशेष प्रतिनिधी): भारतीय सैनिकी विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, खडवली येथील कॅडेट धैर्य नाईक याने कराटे क्षेत्रात अद्भूत कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. २६ एप्रिल २०२६ रोजी पार पडलेल्या 'लार्जेस्ट कराटे डिस्प्ले' (Largest Karate Display) या उपक्रमात यशस्वी सहभाग नोंदवत धैर्यने ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड’ (Guinness World Record) मध्ये आपले नाव कोरले आहे. या जागतिक विक्रमानंतरही आपल्या यशाची मालिका कायम राखत धैर्यने जयपूर येथे आयोजित प्रतिष्ठित 'महाराणा प्रताप नॅशनल कराटे चॅम्पियनशिप'मध्ये ५० किलो वजनगटात सुवर्णपदक पटकावले. जागतिक विक्रम आणि राष्ट्रीय स्तरावरील सुवर्णपदक अशा दुहेरी यशामुळे त्याच्या जिद्दीचे व क्रीडाकौशल्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. निवासी सैनिक शाळेतील शिस्तबद्ध वातावरण, नियमित सराव आणि कठोर परिश्रमाच्या जोरावर धैर्यने हे यश संपादन केले. त्याच्या या यशात त्याचे प्रशिक्षक, पालक, श...

उल्हासनगरात भाजप-शिवसेनेत जुंपली;

इमेज
* उल्हासनगरात भाजप-शिवसेनेत जुंपली;* मेट्रोच्या श्रेयावरून सुरू झालेला वाद चिघळला • आमदार कुमार आयलानींवरील वक्तव्यावरून भाजप आक्रमक • कमलेश निकमांनी खेद व्यक्त करेपर्यंत असहकाराचा भाजपचा इशारा  *उल्हासनगर (प्रतिनिधी):*  मेट्रो प्रकल्पाच्या श्रेयवादातून उल्हासनगरमधील भाजप आणि शिवसेना (शिंदे गट) या महायुतीच्या घटक पक्षांमध्ये सुरू झालेली धुसफूस आता उघड असहकाराच्या भूमिकेपर्यंत पोहोचली आहे. भाजपचे स्थानिक आमदार कुमार आयलानी यांच्याविरोधात शिवसेना नेते तथा महापौर अश्विनी निकम यांचे पती कमलेश निकम यांनी कथित आक्षेपार्ह भाषा वापरल्याचा आरोप करत भाजपने आक्रमक भूमिका घेतली आहे . कमलेश निकम यांनी या वक्तव्याबद्दल सार्वजनिकरीत्या खेद व्यक्त करेपर्यंत त्यांच्या कोणत्याही कामाला भाजपची साथ मिळणार नाही, असा थेट इशारा भाजपचे ज्येष्ठ नेते प्रदीप रामचंदानी यांनी दिला आहे, आमदार कुमार आयलानी , भाजप जिल्हाध्यक्ष राजेश वधारिया , उपमहापौर अमर लुंड यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी व नगरसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. "भाजपचे सर्व ३७ नगरसेवक आमदार आयलानी यांच्या पाठीशी ठामपण...

एका रात्रीत गायब झाले संपूर्ण गाव ? न सुटलेले रहस्य ?

*एका रात्रीत गायब झालेले संपूर्ण गाव: 'कुलधरा'चे न सुटलेले रहस्य*  इतिहासामध्ये अनेक अशी रहस्ये दडलेली आहेत, ज्यांची उत्तरे आधुनिक विज्ञान आणि तंत्रज्ञानालाही आजपर्यंत शोधता आलेली नाहीत. असंच एक अंगावर काटा आणणारं आणि विचार करायला लावणारं रहस्य राजस्थानच्या वाळवंटात दडलं आहे. एकाच रात्रीत तब्बल १५०० लोक राहते घरदार सोडून अचानक गायब होतात आणि जाताना त्या जागेला एक असा शाप देतात की, त्यानंतर पुढील २०० वर्षे तिथे पाखर  देखील फिरत नाही! हे काल्पनिक चित्रपट किंवा कादंबरीचे कथानक नसून, राजस्थानमधील कुलधरा'या गावाचे जळजळीत सत्य आहे. राजस्थानमधील ऐतिहासिक जैसलमेर शहरापासून साधारण १८ किलोमीटर अंतरावर असलेले 'कुलधरा' हे गाव १३ व्या शतकात पालीवाल ब्राह्मणांनी वसवले होते. हे ब्राह्मण अत्यंत बुद्धिमान, कष्टाळू आणि जलव्यवस्थापनात पटाईत होते. वाळवंटी भागातही त्यांनी शेती फुलवली होती. उत्कृष्ट वास्तुकलेची साक्ष देणारी दुमजली पक्की घरे, विहिरी आणि मंदिरांनी हे गाव नटलेले होते. कुलधरा आणि आसपासची अशी ८४ गावे पालीवाल ब्राह्मणांच्या समृद्धीने ओसंडून वाहत होती. साधारण १८२५ च्या सुमारास ...