पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२० पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

ईशान कॉम्पुटर ट्रेनिंग सेंटर चे वतीने आज दिनांक 26 नोव्हेंबर 2020 रोजी संविधान दिनानिमित्त विद्यार्थ्यांना सविधान ची मुख्य प्रति देऊन सन्मान करण्यात आला तसेच परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लिखित भारताचे संविधान याबाबत महत्त्व पटवून दिले........................................................................... दिनांक 13 नोव्हेंबर 2020 रोजी गरजू मुला-मुलींना शासनाकडून शिष्यवृत्ती म्हणून एक हजार रुपयाचा धनादेश देण्यात आला होता त्या धनादेशाचे वाटप 13 नोव्हेंबर रोजी करण्यात आले होते त्यापैकी शिल्लक राहिलेल्या विद्यार्थ्यांना आज दिनांक 26 नोव्हेंबर रोजी संविधान दिनानिमित्त रूपे 1000 चा चेक वाटप करण्यात आला......................................................................... यावेळी प्रमुख उपस्थिती माननीय राजेंद्र चौधरी साहेब. यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना संविधानाची प्रति आणि धनादेश चेक वाटप करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीकांत बागुल साहेब यांनी केले. या वेळी माननीय निकम साहेब. जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलचे वरिष्ठ प्रतिनिधी माननीय जगन्नाथ जावळे. तसेच विद्यार्थी उपस्थित होते. ......,..........................या कार्यक्रमाचे आयोजन ईशान कम्प्युटर ट्रेनिंग चे शाखा संचालक सौ प्रांजली अरुण मोरे तसेच माननीय अरुण मोरे यांनी केले........................................................................... ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

इमेज

Breaking News पनवेल . लोकांची फसवणुक करणाऱ्या बोगस डॉक्टर वर होणार पोलिस कारवाई. येत्या 1 तारखेला प्रसिध्द होणार पनवेल मधील मोठी बातमी प्रतिनिधी सौरभ पाटील पनवेल

*मा. नगरसेवक–सुभाष साळुंके यांच्या प्रयत्नाने ताडवाडी परिसराला मिळाला शुद्ध पाणीपुरवठा................!* *अ.न.प वॉर्ड क्रमांक ४५ मधील ताडवाडी परिसराला गटारातून bulk कनेक्शन पाण्याचे पाईप गेल्यामुळे दूषित पाणीपुरवठा होता याबाबत संबंधित नागरिकांनी माजी नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या यांच्याकडे तक्रार केली असता सुभाष साळुंके यांनी म.जी.प्रा. च्या अधिकाऱ्यासह स्वतः पाहणी केली, म.जी.प्रा कडून थेट पाण्याची लाईन टाकून न घेतल्याने नागरिकांनी बी कॅबीन रोड लगतच्या मुख्य लाईन वरून कनेक्शन घेतले होते, सदर लाईन गटारातून गेल्याने गेल्याने दूषित पाणी नागरिकांना प्यावे लागत होते यामुळे आजार व रोगराईचे प्रमाण वाढले होते, यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते,**यावर पर्याय म्हणून सुभाष साळुंके यांनी थेट ३ इंची १०० मीटर लांबीची पाईप लाईन मुख्य लाईन वरून म.जी. प्रा कडून टाकून घेतली.**नागरिकांच्या घराजवळ थेट पाईप लाइन टाकल्याने शेकडो नागरिकांना दूषित पाण्या पासून मुक्तता मिळाली असून शुध्द पाणी पुरवठा झाला आहे.**सुभाष साळुंके यांनी नियोजपूर्वक केलेल्या प्रयत्नांमुळे गेले अनेक वर्षाचा तडवाडी परिसरातील नागरिकांचा दूषित पाणी प्रश्न सुटला आहे.* परिसरातील नागरिकांनी *माजी नगरसेवक सुभाष साळुंके* यांचे मनापासून आभार व्यक्त केले आहेत.

इमेज

200 किन्नर मित्र ठाणे जिलाधिकारी से गुहार लगायेंगे अपनी पहचान के लिये...उल्हासनगर, अम्बरनाथ कल्याण डोम्बिवली के 200 किन्नर मित्र संघटित होकर ठाणे जिलाधिकारी महोदय से अपील करेंगे कि कागज़ात के अभाव में उनके आधार कार्ड, पेन कार्ड, वोटर कार्ड और राशन कार्ड बन नहीं पाते, ऐसे में उनके बैंक में खाते भी नहीं खुल पाते, किसी भी तरह की सरकारी सुविधाओं से वंचित रहने वाले 200 के करीब किन्नरों द्वारा हस्ताक्षर अभियान करके सरकारी काग़ज़ादों में अपनी पहचान बनाने के लिये गुहार लगाएंगे।23 नवम्बर की शाम उल्हासनगर कैम्प 4 के छत्रपति श्री शिवाजी महाराज नगर, म्हसोबा मंदिर, उल्हासनगर स्टेशन के बाजु में जमा होते हुये किन्नर समुदाय के समाजसेवी विद्यासागर देडे, महक वाघ, सायरा शेख, आफरीन शेख व अन्य किन्नर मित्र जमा होकर पहचान उपक्रम की शुरुआत की गई,किन्नरों व उनके परिवार की शिक्षा व्यवस्था के विषय के साथ साथ उनकी उपजीविका चलाने के लिये उल्हासनगर की समाजसेवीका श्रीमती ज्योति तायडे द्वारा पेपर बेग मेकिंग, काजल मूलचंदानी द्वारा ऑनलाइन व्यापार प्रशिक्षण, लता गंगवानी द्वारा ब्युटीपार्लर मुफ्त कोर्स के बारेमें जानकारी दी गई,सोहम फाउंडेशन द्वारा विशेष भूमिका निभाते हुये किन्नर मित्रों के आधार कार्ड बनाने हेतु एक पहल की जाएगी जिसके तहत उल्हासनगर, अम्बरनाथ कल्याण डोम्बिवली के 200 किन्नर मित्र संघटित होकर ठाणे जिलाधिकारी महोदय से अपील करेंगे कि कागज़ात के अभाव में उनके आधार कार्ड, पेन कार्ड, वोटर कार्ड और राशन कार्ड बन नहीं पाते, ऐसे में उनके बैंक में खाते भी नहीं खुल पाते, किसी भी तरह की सरकारी सुविधाओं वंचित ना रहें इसलिये ठाणे जिलाधिकारी महोदय से पत्रव्यवहार करते हुये सोहम फाउंडेशन प्रयासरत रहेगा, किन्नरों को बचत गट के माध्यम से कर्ज़ व्यवस्था करके रोज़गार निर्मिति के अवसर भी दिये जायेंगे ऐसा वक्तव्य सोहम फाउंडेशन के संस्थापक श्री राजेन्द्र देठे ने किया।उपक्रम का संचालन कु. अनुष्का शर्मा द्वारा सफलतापूर्वक किया गया।

इमेज

देश के 200 साइकलिस्ट में उल्हासनगर के मात्र 2 साइकलिस्ट नामित... अम्बरनाथ, बदलापुर कल्याण के साइकलिस्ट विश्व रिकॉर्ड के लिये दावा करेंगे...भारत की प्रसिद्ध संस्था इंडियन फ्लैग रनर्स एंड राइडर्स द्वारा आयोजित साइकिल स्पर्धा में उल्हासनगर के प्रसिद्ध समाजसेवी प्रदीप कपुर और श्री चंद्रभान, अम्बरनाथ के श्री हीरू और सागर, कल्याण के दीपक जी, बदलापुर के नंदकिशोर और विद्याधर, मुंबई के विनोद और ठाणे शहर के रहिवासी एनएसजी एयरफोर्स कमांडो श्री विष्णु जी द्वारा 22 नवंबर के दिन कुलगाँव बदलापुर से कर्जत तक का 101.51 किलोमीटर का सफर मात्र 4 घंटों में साईकिल पर देश की शान तिरंगा ध्वज लेकर सम्मान पूर्वक ध्वजसंहिता प्रोटोकॉल का पालन करते हुये पुरा किया, जबकी इन सभियों को मात्र 100 किलोमीटर का लक्ष्य पुरा करना था, जिसका विश्व रिकॉर्ड बुक ऑफ इंटरनेशनल में नामित किया जायेगा,एक बार जब विवरणों का सत्यापन किया जाता है तो नाम बुक ऑफ इंटरनेशनल में दर्ज किया जाएगा ऐसी जानकारी साइकलिस्ट श्री प्रदीप कपुर द्वारा प्राप्त हुई।

इमेज

समर्पण चँरिटेबल ट्रस्टने साजरी केली आदिवासी पाड्यावर आपुलकीची दिवाळी.

इमेज
*समर्पण चँरिटेबल ट्रस्टने साजरी केली आदिवासी पाड्यावर आपुलकीची दिवाळी.* सोमवार दिनांक १६ नोव्हेंबर २०२० रोजी भाऊबीजचे औचित्य साधून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदपर्शाने पावन झालेल्या माऊली गडाच्या पायथ्याशी असलेल्या तानसा अभयारण्यातील घनदाट जंगलाने वेढलेल्या दुर्गम भागातील दुर्लक्षित,उपेक्षित आदिवासी बहुल वस्तीच्या खोर गावातील नागरिकांना दिवाळी फराळाचे साहित्य,महिलांना साडी तसेच लहान मुलांना खाऊ वाटप करून संस्थेच्या वतीने आपुलकीची दिवाळी - २०२० हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. याप्रसंगी तानसा वन्यजीव विभागाचे वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने,खोर - वांद्रे ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच वनिता झुगरे,वांद्रे गावचे सुपुत्र ठाणे ग्रामीण पोलीस विभागात कार्यरत असलेले शिंगे मेजर,खोर गावाचे पोलीस पाटील पांडुरंग दुभेले हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.सदरील कार्यक्रमात वनपरिक्षेत्र अधिकारी संजय चन्ने यांचे मोलाचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले. तानसा वन्यजीव विभागातील वनक्षेत्र पिवळीचे वनपाल व्हि.के.दरेकर वनरक्षक बी.जी.शिंदे,एस.ए.खंडागळे,एस.एच.पेढवी,प्रसाद पाटील,दिपक लटपटे,सुनिल वाटोरे यांनी कार्यक

*प्रबोधन शिक्षण प्रसारक मंडळ* आयोजितभव्य *रोजगार मेळावा* आज दिनांक 8 नोव्हेंबर 2020 रोजी संपन्न झाला. कार्यक्रमाच्या *अध्यक्षा आयु. रेखा जोंधळे जाधव* मॅडम माजी मुख्याध्यापिका नालंदा प्राथ. विद्यालय यांच्या हस्ते फित कापून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. मॅडमनी कार्यक्रमला शुभेच्छा देताना मुलाखतीसाठी आलेल्या सर्व उमेदवारांना मार्गदर्शन केले तसेच आपल्या माजी विद्यार्थ्यांचे भरभरून कौतुक केले. कार्यक्रमात जवळपास 250 लोकांनी सहभाग नोंदवला. सर्व उमेदवारांच्या मुलाखती पार पडल्या आहेत तरी त्यांच्या योग्यतेनुसार लवकरात लवकर त्यांना जॉब देण्याचे आश्वासन आलेल्या कंपनींच्या अधिकारी वर्गाने दिले आहे.आयु. अमोल कांबळे सर आणि अमित सर यांनी आलेल्या उमेदवारांना स्पर्धा परीक्षा, रेल्वे भरती,पोलीस भरती संदर्भात मोलाचे मार्गदर्शन केले.कार्यक्रमाला कर्मवीर दादासाहेब गायकवाड मेमोरियल फाऊंडेशन कार्यकारी सदस्य जितेंद्र दोंदे (सर), संत रोहिदास प्रबोधन मंडळ महाराष्ट्र प्रमुख कार्यवाह ऍड. दिलीप वाळंज सर,परिवर्तन एक लोक चळवळ महिला प्रदेशाध्यक्ष लताताई पडघान,श्रमिका महिला मंडळ अध्यक्ष ऍड. मनीषा झेंडे मॅडम, समाजसेवक सूर्यकांत झेंडे, निवारा बहुद्देशीय संस्था अध्यक्ष सुनील इंगळे सर, उडाण सामाजिक संस्था अध्यक्ष महेंद्र अहिरे सर, वंचित बहुजन आघाडी कल्याण जिल्हा उपाध्यक्ष विजय कांबळे सर, ऍड. प्रवीण बोबडे सर, जितेंद्र बुकाणे सर तसेच वंचित बहुजन महिला आघाडी ठाणे जिल्हा अध्यक्ष मायाताई कांबळे, उपाध्यक्ष रेखाताई कुरवारे, कांबळे सर, सम्यक विद्यार्थी आंदोलन कल्याण अध्यक्ष रुपेश हुंबरे उपस्थित होते.विभागातील समाजसेवक,सामाजिक कार्यकर्ते सूर्यकांत सुर्वे, रवी राडे, ऍड. प्रशांत चंदनशिव, सुरज म्हस्के, प्रशांत पवार उपस्थित होते. तसेच अंबरनाथ येथील समाजसेवक गौतम बचुटे आदी मान्यवर कार्यक्रमाला उपस्थित राहिले तसेच कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी ज्यांनी योगदान आणि श्रमदान दिलेले निशांत कांबळे, रमेश सोनवणे, आतिष जाधव, प्रतीक्षा जाधव, संदीप वाघमारे,संकेत कर्डक, युक्ता उबाळे,राजदीप कांबळे त्या सर्वांचे मनापासून आभार. व्यक्त केले. या वेळी . रेखा उबाळे. संदीप उबाळे. डॉ. भारत जाधव. यशवंत अहिरे. निखिल पाखरे. शीतल कर्डक. प्रशांत उबाळे. प्रवीण जावळे. आकाश चंदनशिव. समेत अनेक मान्यवरांनी सहभाग घेतला. बातमीदार प्रशांत उबाळे उल्हासनगर

इमेज

अंबरनाथ मधील मुस्लिम समाजाकरिता दफनभूमीसाठी नवीन जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी अंबरनाथ मस्जिद ट्रस्टच्या वतीने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे करण्यात आली.

इमेज
अंबरनाथ शहरात सुमारे ८० हजारहून अधिक मुस्लिम समाज बांधव वास्तव्यास आहेत. सद्या अस्तित्वात असलेल्या दफनभूमीची परिस्थिती पाहता मुस्लिम बांधवाना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते.  यामुळे अंबरनाथ मधील मुस्लिम समाजाकरिता दफनभूमीसाठी नवीन जागा उपलब्ध करून देण्यात यावी अशी मागणी रविवारी अंबरनाथ मस्जिद ट्रस्टच्या वतीने आमदार डॉ. बालाजी किणीकर यांच्याकडे करण्यात आली.  मुस्लिम बांधवांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद देत ठाणे जिल्हा पालकमंत्री ना.श्री.एकनाथ शिंदे साहेब व खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या पर्यंत आपली मागणी पोहचवतो असे सांगितले.  याप्रसंगी अंबरनाथ मस्जिद ट्रस्टचे अध्यक्ष श्री.सलीम चौधरी, जनरल सेक्रेटरी श्री.हबीब सौदागर, श्री. रफिक खान, श्री.माजिद नुरी, श्री. अस्लम खान आदी उपस्थित होते.