पोस्ट्स

फेब्रुवारी, २०२३ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

स्टार,लेखकाचा कुत्रा,मानलेली गर्लफ्रेंड,बारम,आणि उकळीला मिळाला पारंगत एकांकिका सन्मान

इमेज
स्टार,लेखकाचा कुत्रा,मानलेली गर्लफ्रेंड,बारम,आणि उकळीला मिळाला पारंगत एकांकिका सन्मान . राकेश जाधव (बॉबी), अनिकेत बोले/ प्रफुल्ल आचरेकर, यश पवार/ हृषीकेत मोहिते आणि प्रशांत केणीची पारंगत दिग्दर्शक सन्मानावर मोहोर एकांकिका क्षेत्रात मानाच्या समजल्या जाणाऱ्या अस्तित्व’ आयोजित ‘पारंगत सन्मान-२०३३’  मध्ये "स्टार" (जिराफ थिएटर) लेखकाचा कुत्रा (मिलाप थिएटर, पुणे), मानलेली गर्लफ्रेंड (इंद्रधनू,मुंबई) या एकांकिकेने खुल्या गटात तर मुंबईच्या महर्षी दयानंद महाविद्यालयच्या "बारम", कीर्ती महाविद्यालयाच्या "उकळी"  या एकांकिकांने आंतरमहाविद्यालयीन गटात पारंगत ठरण्याचा मान मिळवला. कलामंथन, ठाणेच्या "फ्लाईंग राणी" या एकांकिकेला खुल्या गटात तर भवन्स महाविद्यालयाच्या "घरोटं" या एकांकिकांना विशेष परीक्षक सन्मानाने गौरविण्यात आले. वर्षभरातल्या एकांकिकांमधील सर्वोत्तमतेची पोचपावती देणारा ‘पारंगत सन्मान-२०२३’ पुरस्कार सोहळा शनिवारी २५ फेब्रुवारी रोजी पु. ल. देशपांडे कला अकादमीत झाला. एकांकिका क्षेत्रातल्या  सर्व नव्या दमाच्

उल्हासनगरमध्ये मेलेल्या जनावरांसाठी शवदाहिनी बनवणार भूमिपूजन संपन्न

इमेज
उल्हासनगरमध्ये मेलेल्या जनावरांसाठी शवदाहिनी बनवणार भूमिपूजन संपन्न उल्हासनगर :  कोणत्याही जाती धर्माचा असो, पण आपण गाय, बकरी, कुत्रा, गाढव, डुक्कर, प्राणी, पक्षी यावर अतोनात श्रद्धा आहे, पण जोपर्यंत ते आहेत जिवंत, आणि आपल्यासाठी उपयुक्त आहेत, ते मेल्यानंतर आपण ते रस्त्यावर किंवा डस्टबिनमध्ये फेकून देतो, त्यानंतर ते मेलेले प्राणी आणून डंपिंग ग्राऊंडमध्ये फेकले जातात. जनावरांच्या कुजल्यानंतर, त्यांचे जाळणे कचऱ्यासोबतच भयंकर दुर्गंधी, धुराचे चक्र सुरू होते, मृत्यूनंतर त्यांच्या मृतदेहावर आदराने अंत्यसंस्कार करावेत, यासाठी प्रशासनाच्या वतीने जनावरांसाठी मृतदेहाची व्यवस्था करावी, उमनपा द्वारे ही मागणी आमचे गांभीर्याने, मुख्य स्वच्छता निरीक्षक विनोद केणे यांनी घेतली स्वच्छता मुकादम आणि स्वच्छता कर्मचाऱ्यांना स्मशानभूमी उभारेपर्यंत खड्डा खणून त्यात मृत जनावरे पुरण्याचे आदेश दिले. त्याच विषयाला पुढे नेत आज लहान-मोठ्यां जनावरा साठी 2 शवागार संकरित मशिन, इलेक्ट्रिक आणि गॅस मशीन 15 वा वित्त आयोग एनसीएपी फंड राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रमांतर्गत उल्हासनगर 3 शांतीनगर एसटीप

गंगोत्री वेल्फेअर फाउंडेशन चे वतीने जनहित न्यूज महाराष्ट्रचा सन्मानपत्र देऊन सत्कार

इमेज
गंगोत्री  वेल्फेअर फाउंडेशन  चे वतीने जनहित न्यूज महाराष्ट्रचा सन्मानपत्र देऊन सत्कार उल्हासनगर: गंगोत्री वेल्फेअर फाउंडेशन चे वतीने जनहित न्यूज महाराष्ट्र चैनल चा भारत राजवानी गंगोत्री व सोनिया धामी मॅडम यांच्या हस्ते सन्मान पत्र देवून सत्कार करण्यात आला या वेळी. अनेक मान्यवर उपस्थित होते. जनहित न्युज महाराष्ट्र चैनल चे संपादक हरी आल्हाट यांनी उल्हासनगर शहरात व महाराष्ट्र मधील तळागाळातील समाजसेवक कार्यकर्ते तसेच सेवाभावी संस्था यांच्या जनहितार्थ कार्याला प्रसारित करण्याकरिता चांगल्या प्रकारे पुढाकार घेतला आहे असे शशिकांत दायमा यांनी उपस्थित मान्यवर यांना  सांगितले,

चिंचवड कसबा मतदान

इमेज
चिंचवड कसबा मतदान चिंचवडमध्ये ६ वाजेपर्यंत ५०.४७% मतदान, तर कसब्यात 5 वाजेपर्यंत 45.25 टक्के मतदान चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत ६ वाजेपर्यंत एकूण ५०.४७% मतदान मतदानाची अंतिम आकडेवारी एकूण मतदान:- ५,६८,९५४ झालेले मतदान:- २,८७,१४५ मतदान केंद्र:- ५१० सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या एकूण मतदानाची टक्केवारी- ५०.४७% प्रतिनिधी सुनील वाल्हेकर जनहित न्युज महाराष्ट्र पुणे 

मारुती सुझुकी चे डीलर उद्योगपती महेश आहुजा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा

इमेज
 मारुती सुझुकी चे डीलर व उद्योगपती महेश आहुजा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा  उल्हासनगर: मारुती सुझुकी चे डीलर व उद्योगपती महेश आहुजा यांचा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी महेश अहुजा यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा व आशीर्वाद देण्याकरिता. उल्हासनगर व आसपासच्या शहतील अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थित असलेल्या मान्यवरांचे आभार महेश प्रकाश आहुजा व सीमा महेश आहुजा यांनी यक्त केले

तुझी गं स्माईल...' म्हणत आलं सुमधूर प्री-वेडींग साँग

इमेज
' तुझी गं स्माईल...' म्हणत आलं सुमधूर प्री-वेडींग साँग काळानुरूप सर्व गोष्टी बदलत जातात तसे लग्नसोहळे आणि त्या निमित्ताने होणाऱ्या इतर समारंभांमध्येही मागील काही वर्षांमध्ये आमूलाग्र बदल झाल्याचं पहायला मिळत आहे. पूर्वापार चालत आलेल्या चालीरीती आणि रुढी-परंपरांच्या पाऊलखुणा जपणाऱ्या लग्नसोहळ्यांचं स्वरूप आज खूपच भव्य-दिव्य बनलं आहे. प्री-वेडींग शूटचा ट्रेंड सध्या जोरात आहे. त्यामुळे वधू-वरामध्ये प्री-वेडींग शूटचं प्रमाण वाढलं आहे. लग्नापूर्वी वेगवेगळ्या प्रकारचे फोटो काढण्यापासून सुरू झालेला हा ट्रेंड आज प्री-वेडींग साँगपर्यंत पोहोचला आहे. आजच्या सिंगल्सच्या काळात रिलीज करण्यात आलेलं 'तुझी गं स्माईल...' हे नवं कोरं सुमधूर गीत सिंगल नसून एक प्री-वेडींग साँग आहे.  फायरफ्लायची प्रस्तुती असलेलं 'तुझी गं स्माईल...' हे गाणं  अलिबागमधील नयनरम्य लोकेशन्सवर चित्रीत करण्यात आलं आहे. या निमित्तानं संगीतप्रेमींना नेत्रसुखद लोकेशन्ससोबतच समुधूर गीत-संगीताचा आनंद लुटण्याची संधी मिळाली आहे. श्वेता बसनाक पाटील यांनी दिग्दर्शित केलेल्या या गाण्याची निर्मि

रिलायन्स स्मार्ट बाझार ने 'फुलराणी’ साठी केलं मर्चंटायझिंग

इमेज
रिलायन्स स्मार्ट बाझार ने 'फुलराणी’ साठी केलं मर्चंटायझिंग प्रतिनिधी गणेश तळेकर मुंबई हिरवे हिरवे गार गालिचे...' हे बालकवींच्या सिद्धहस्त लेखणीतून अवतरलेले अजरामर काव्य गुणगुणत 'फुलराणी' येणार असल्याचं सर्वांनाच ठाऊक आहे. 'फुलराणी'चा फर्स्ट लुक रिव्हील झाला. विनोदी शोच्या माध्यमातून महाराष्ट्राच्या प्रत्येक घरात पोहोचलेली सर्वांची लाडकी अभिनेत्री प्रियदर्शनी इंदलकर 'फुलराणी'च्या रूपात रसिकांच्या भेटीला येणार आहे. तिच्या स्वागताची जोरदार तयारी सुरू झाली आहे. सिनेरसिकांवर मोहिनी घालणाऱ्या 'फुलराणी'साठी रिलायन्स स्मार्ट बाझारनेही पुढाकार घेतला आहे. या चित्रपटात प्रियदर्शनीसोबत सुबोध भावे मुख्य भूमिकेत असल्याने दोघांचे खास फोटो असलेले किचेन्स, कॅाफी मग  तसेच झगा मगा मना बघा स्पेशल टी-शर्टस, शॅापिंग बॅग्ज,  कॅप्स, जॅकेट्स 'फुलराणी' साठी रिलायन्स स्मार्ट बाझारने एक्सक्लुझिव्हपणे मर्चंटायझिंग केल्या आहेत. ‘फुलराणी’च्या या एक से एक वस्तू स्मार्ट बाझारच्या आउटलेट्स मधून खरेदी करता येणार आहेत. आजघडीला मराठीतील सर्वात मोठी आण

कसबा विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त दहा हजार वाहनांची तपासणी

इमेज
कसबा विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त दहा हजार वाहनांची तपासणी पुणे : कसबा विधानसभा मतदार संघात प्रशासनाकडून मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. भरारी पथक, नाका तपासणी पथकाकडून आतापर्यंत दहा हजार ६६८ वाहनांची तपासणी करण्यात आली आहे. निवडणुका शांततेत आणि पारदर्शक पद्धतीने व्हाव्यात याकरिता प्रशासनाने नियोजन केले आहे. आचारसंहितेचे पालन करण्याबाबत आवश्यक खबरदारी घेण्यात येत आहे.प्रशासनाकडून कसब्यात नऊ तपासणी नाके, तसेच नऊ भरारी पथकांची स्थापना करण्यात आली आहे. या पथकांमार्फत संपूर्ण मतदारसंघात वाहनांची कडक तपासणी करण्यात येत आहे. तसेच भरारी पथकाकडून संपूर्ण प्रचार यंत्रणेचे चित्रीकरण करण्यात येत आहे. आतापर्यंत भरारी आणि नाका तपासणीमध्ये दहा लाख ५३ हजार ५०० रुपये जप्त करण्यात आले आहेत, तर १२ हजार २५० किमतीचे २३१ लिटर मद्य हस्तगत करण्यात आले आहे. आचार संहितेचे पालन करण्यासाठी चोख बंदोबस्त ठेवण्यात येत आहे , अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी स्नेहा देवकाते यांनी दिली आहे.

गाभ" चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा कैलास वाघमारे दिसणार रोमँटिक अंदाजात

इमेज
गाभ" चित्रपटाचा पोस्टर अनावरण सोहळा कैलास वाघमारे दिसणार रोमँटिक अंदाजात अभिनय आणि लिखाण या माध्यमातून अभिनेता कैलास  वाघमारे यांनी आजवर वेगवेगळ्या प्रवाहातील गोष्टी आपल्यासमोर मांडल्या आहेत. सातत्याने नवं काही तरी करू पाहणाऱ्या कैलासने आपल्यातील संवेदनशील कलाकाराला वेगवेगळ्या कलाकृतीच्या माध्यमातून जपलं आहे. त्याच्या आजवरच्या भूमिका पाहिल्या तर ही बाब सहज लक्षात येईल. आगामी ‘गाभ’  या मराठी चित्रपटातील कैलासची भूमिका आणि विषय संवेदशील असला तरी त्याचा रोमँटिक अंदाजही प्रेक्षकांना दिसणार आहे. ही कथा एका मानसिकतेचं प्रतिनिधित्व करणारी भूमिका कैलास आपल्या ‘दादू’ या पात्रातून साकारणार आहे. आपल्या माजाला आलेल्या म्हशीसाठी रेडा शोधताना नायकामध्ये माणूस म्हणून  होणारा बदल आणि त्या बदलाची कथा, अधोरेखित करणारा गावाकडच्या रांगड्या मातीतला ‘गाभ’ हा चित्रपट आहे. टाईम लॅप्स प्रोडक्शन आणि एजे मल्टिमीडिया प्रोडक्शनची निर्मिती असलेल्या ‘गाभ’ चित्रपटाची संकल्पना, लेखन आणि दिग्दर्शन अनुप जत्राटकर यांचे आहे. सुमन नारायण गोटुरे आणि मंगेश नारायण गोटुरे या चित्रपटाचे

बारावीच्या हॉल तिकीट मध्ये झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना फटका

इमेज
बारावीच्या हॉल तिकीट मध्ये झालेल्या चुकांमुळे विद्यार्थ्यांना फटका  उल्हासनगर: नुकतीच बारावीची परीक्षा सुरू झालेली आहे. सेंट पॉल महाविद्यालय मध्ये शिकत असलेल्या इयत्ता बारावीच्या काही विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट मध्ये चुका झालेल्या होत्या. त्या संदर्भात विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील मुख्याध्यापकांकडे वारंवार फेऱ्या मारल्या परंतु महाविद्यालय प्रशासनाकडून त्यांना योग्य ते उत्तर भेटत नसल्याने महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना कडे धाव घेतली. आज दिनांक २२ फेब्रुवारी रोजी दुपारी विद्यार्थ्यांसोबत महाविद्यालयाला महाराष्ट्र नवनिर्माण सेना कडून धडक देण्यात आली त्या संदर्भात महाविद्यालय प्रशासना सोबत चर्चा करण्यात आली व त्या सोबत विद्यार्थ्यांच्या हॉल तिकीट मध्ये केलेल्या चुकांमध्ये सुधारणा करून देण्यात आली व झालेल्या चुकांबद्दल महाविद्यालय प्रशासना कडून दिलगिरी व्यक्त करण्यात आली तसेच विद्यार्थ्यांनी महाराष्ट् नवनिर्माण विद्यार्थी सेनेचे आभार व्यक्त केले अशी माहिती वैभव माधव कुलकर्णी शहर अध्यक्ष, मनविसे उल्हासनगर यांनी दिली