पोस्ट्स

जानेवारी, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

जनजागृती ग्राहक मंचाची पनवेल महावितरण कार्यालयावर धडक

इमेज
*जनजागृती ग्राहक मंचाची पनवेल महावितरण कार्यालयावर धडक* पनवेल-मयूर भोसले गेल्या पंधरा दिवसांपासून पनवेल महावितरण कार्यालयातील अधिकारी वीज बिल न भरलेल्या ग्राहकांवर धडक कारवाया करताना दिसत आहेत़.ज्या ज्या वीज धारकांनी वीज बिल भरले नाहीत त्यांची वीज खंडित करून त्यांना वीज बिल भरण्यासाठी भाग पाडले जात आहे. विजेची बिलं भरून महावितरण कार्यालयाला मदत करणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहें. पण जर वीज बिल आकारणी जास्त असेल वा बंद मीटरचे बिल वाढून आले असेल तर त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी कोणी तरी पुढे यायला हवे. पनवेल मधील जन जाग्रुती ग्राहक मंच हे पनवेल मध्ये अतिशय सक्रिय असुन पनवेल मधील जनतेच्या हाकेला सद्देव उभे राहते.बंद मीटर च्या वाढीव बिलाचा असाच एक प्रकार पुढे आला असुन पनवेल मधील एका नामांकित डॉक्टरला गेल्या वर्ष भरा पासून बंद मीटरचे बिल भरावे लागतं आहें. वारंवार तक्रार करून सुध्दा महावितरण कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना जाग आली नव्हती. सदर डॉक्टरांनी जनहित न्यूज महाराष्ट्रचे उप संपादक श्री मयूर भोसले यांच्या कडे संपर्क करताच जनजागृती ग्राहक मंच पनवेल यांकडे या बाबत तक्रार केली

जुन्नर जिल्हा पुणे, दिनांक,24/01/2021 जनहित लोकशाही पार्टी ची महत्त्वाची बैठक आज जुन्नर येथे, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व नेते, यांच्या वतीने संपन्न झाली.

इमेज
जुन्नर जिल्हा पुणे, दिनांक,24/01/2021                                     जनहित लोकशाही पार्टी ची महत्त्वाची बैठक आज जुन्नर येथे, सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते व नेते, यांच्या वतीने संपन्न झाली.                                            मा अशोकराव आल्हाट संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष, यांच्या अध्यक्षतेखाली, तमाम पदाधिकारी यांना पुढील राजकीय रणनीती आखली गेली आहे.    पुढील काळात आम्ही आमच्या सोबत मोठ्या प्रमाणावर दबाव गट निर्माण करणे आवश्यक असते असं काम जोरदार पणे करणार आहोत अशी ग्वाही या वेळी उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी दिली    जनहित लोकशाही पार्टी चे काम या पुढे आम्ही संविधानीक पध्दतीने करून, जनमानसात लोकप्रिय दबावगट निर्माण करणे ही आमची भूमिका आहे, असं उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी यावेळी दिली.    जुन्नर तालुक्यातील विविध प्रकारचे प्रश्र विलंबित आहेत,ते जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी अहोरात्र मेहनत करून सर्व पदाधिकारी या वेळी ग्वाही देण्यात आली.   जनहित लोकशाही पार्टी च्या वतीने, उपेक्षित गोरगरीब जनतेसाठी ए

शिवसेनाप्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त प्रभाग क्रमांक 45 नगर सेवक माननीय सुभाष साळुंके यांच्या जनसंपर्क कार्यालयात. आदरणीय बाळासाहेबांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यानिमित्ताने 84 जेष्ठ नागरिक यांना मोफत कार्ड चे वाटप करण्यात येणार आहे. यावेळी अंबरनाथ विधानसभेचे आमदार डॉ बालाजी किणीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ शिवसैनिक श्रीमती अश्विनी सावंत. रमेश निकम. सुनील देशपांडे. मल्लप्पा मंचेकर. राजकुमार जमखांदीकर. संकेत पारटे. दिनेश आंग्रे. सौ आशा शहा. सुनंदा मांढरे. प्रिया पाटील. रामदास नरे. सचिन मोरे. सौ शिंदे ताई. प्रा. नसीम सर. शिवाजी सुर्वे. श्याम भोईर. कु.मानसी साळुंके. सार्थक साळुंके. भाई पांडे. तसेच अनेक मान्यवर उपस्थित होते.

इमेज

संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.सुवर्णा साळुंके यांना दै. अंबरनाथ जनमत चा अंबरनाथ वैभव पुरस्कार-२०२१ ने सन्मानितकरण्यात आले.

इमेज
संवाद महिला सक्षमीकरणासाठी सातत्याने करीत असलेल्या कार्याचा गौरव,अनेक संस्थांनी  घेतली दखल..!   *सन्मान आणि पुरस्कारा मागून पुरस्कार...!* *संवाद फाऊंडेशनच्या अध्यक्षा सौ.सुवर्णा साळुंके* यांना दै. अंबरनाथ जनमत चा  *अंबरनाथ वैभव पुरस्कार-२०२१ ने सन्मानितकरण्यात आले.!* आज रोटरी क्लब हॉल येथे  प्रसिद्ध मराठी सिनेअभिनेत्री  *मा.सौ. विशाखा सुभेदार* यांच्या शुभहस्ते पुरस्कार देण्यात आला. या वेळी अनेक मान्यवर उपस्थित होते...

जनहित न्यूज महाराष्ट्रच्या दणक्याने एम.जी. एम. हॉस्पिटलला आली जाग

इमेज
पनवेल वार्ताहर-मयूर भोसले श्रीमती सुवर्णा सीताराम सकपाळ हा रुग्ण गेली 14 दिवस एम. जी. एम. हॉस्पिटल मध्ये कोरोना च्या नावाखाली महात्मा फुले जीवन आरोग्य योजने अंतर्गत उपचार घेत आहें. उपचार घेत असताना रुग्णाच्या नातेवाईकांना हॉस्पिटल कडून मोठ्या प्रमाणात मानसिक त्रास सहन करावा लागत होता.रुग्णाच्या तब्यती विषयी कोणतीही माहिती रुग्णाच्या नातेवाइकाला दिली जात न्हवती. रोज कोणत्या ना कोणत्या कारणास्तव मेडिकल स्टोअर मधून औषधे आणण्यास भाग पाडत होत.जनहित न्यूज महाराष्ट्रचे उप संपादक मयूर भोसले यांनी एम जी एम प्रशासनाला धारेवर धरून महात्मा फुले जीवन आरोग्य योजने चे वरिष्ठ अधिकारी मा. श्री. सुधाकर शिंदे यांच्या कडे माहिती देताच एम.जी. एम. हॉस्पिटलला जाग आली व रुग्णाच्या नातेवायकांना बोलाऊन घेऊन त्यांना यां योजने अंतर्गत पूर्ण सेवा उपलब्ध करून देऊ असे आश्वासन रुग्णाच्या नातेवाईकांना दिले आहें. त्यामुळे रुग्णांच्या नातेवाईकांना मोठा दिलासा मिळणार   आहें. मा. श्री. सुधाकर शिंदे हे पनवेल महानगर पालिकेचे आयुक्त असताना त्यांनी केलेले कार्य व आपल्या कार्याने पनवेल मधील जनते वर केलेले प्रेम पनव

अंबरनाथ येथील रिक्षाचालक-मालक संघटनेचे शहराध्यक्ष अशिष देशपांडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मोठ्या संख्येने प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश.

इमेज
अंबरनाथ येथील रिक्षाचालक-मालक संघटनेचे शहराध्यक्ष अशिष देशपांडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मोठ्या संख्येने प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश.                     प्रहार जनशक्ती पक्ष अध्यक्ष माननीय बच्चुभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली     जिल्हा अध्यक्ष स्वप्निल पाटील    यांच्या आदेशानुसार अंबरनाथ तालुका अध्यक्ष माननीय रविभाऊ डोईजड. तालुका संपर्क प्रमुख शरद सोनवणे. अंबरनाथ शहराध्यक्ष प्रीतम सिशोदे  . उल्हासनगर शहराध्यक्ष प्रधान पाटील. तसेच बदलापूर शहराध्यक्ष अविनाश सोनवणे. यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 22 जानेवारी 2021 रोजी महाराष्ट्र रिक्षा पंचायत घाडगे नगर साईबाबा रिक्षा चालक मालक संघटना शहराध्यक्ष आशिष देशपांडे यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी यानी सुद्धा प्रहार जनशक्ती पक्षात प्रवेश केला. अशी माहिती प्रहार जनशक्ती पक्ष अंबरनाथ तालुका अध्यक्ष माननीय रविभाऊ डोईजड यांनी दिली.                      ब्युरो रिपोर्ट जनहित न्यूज महाराष्ट्र. अंबरनाथ

जनहित सिने नाटय संघटना महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष पदी मा. हरी चंदर आल्हाट यांची नियुक्ती तर महाराष्ट्र प्रदेश सचिव पदावर मा. श्याम भाऊ जांबोलीकर यांची नियुक्ती

इमेज
 दिनांक २१जाने २०२१रोजी जनहित लोकशाही पार्टी चे संस्थापक अध्यक्ष मा. अशोकराव आल्हाट यांच्या वतीने जनहित न्यूज महाराष्ट्र चैनेल चे संपादक मा. हरी चंदर आल्हाट यांना जनहित लोकशाही पार्टी मध्ये जनहित सिने नाट्य संघटना च्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष या पदावर नियुक्ती पत्र देवून नियुक्त करण्यात आले तसेच महाराष्ट्र तेज न्यूज चॅनल चे संपादक मा. श्याम भाऊ जांबोलीकर यांना महाराष्ट्र प्रदेश सचिव या पदावर नियुक्ती पत्र देवून नियुक्त करण्यात आले . या वेळी नवं नियुक्त महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष हरी चंदर आल्हाट तसेच महाराष्ट्र प्रदेश सचिव मा. श्याम भाऊ जांबोलीकर यांनी महाराष्ट्रातील कलावंत यांना आम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करून त्यांचा उदरनिर्वाह चा प्रश्न सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहू तसेच सध्या सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेक नवीन कलावंत ( हौशी कलावंत ) लहान सहान लघुपट तयार करीत आहेत. अश्या कलावंतांना सुद्धा आम्ही चांगल्या प्रकारे मार्गदर्शन करू. असे जाहीर केले. तसेच जेष्ठ व नवीन कलावंतांनी सुद्धा जनहित सिने नाट्य संघटना मध्ये सहभागी होऊन एकम

कोरोना च्या नावाखाली एम. जी. एम. हॉस्पिटलचा भ्रष्टाचार कधी बंद होणार ?

इमेज
उप संपादक. मयूर भोसले. श्रीमती सुवर्णा सिताराम सपकाळ रा.चेंबूर येथील रुग्ण गेली 13 दिवस कोरोना च्या नावाखाली एम जी एम हॉस्पिटल कामोठे येथे  दिनांक 8/01/2021 पासून covid-19 सस्पेक्ट म्हणून उपचार घेत आहें. या बाबतचे सविस्तर व्रूत्त असे की सदर रुग्णाला महात्मा ज्योतिबा फुले जीवन आरोग्य योजने अंतर्गत लाभ देणे करता रजिस्टर केले गेले.सदर योजनेअंतर्गत रुग्णास निदान उपचार व औषधे मोफत दिली जातात असे तेथील अधिकारी व आरोग्य मित्रांनी सांगितले. परंतु रुग्णास दिनांक 8/01/21 पासून म्हणजे दवाखान्यात दाखल केल्यापासून आज दिनांक 21/1/2021  पर्यंत रोज यां ना त्या कारणास्तव एम जी एम हॉस्पिटल मधील असलेल्या मेडिकल स्टोअर मधून औषध विकत घेण्यासाठी सांगण्यात येत आहे.सदर बाबतीत विचारणा केली असता एम जे पी जे या योजने अंतर्गत हायर अँटिबायोटिक या औषधांचा समावेश नसतो असे तेथील नर्स व डॉक्टरांकडून सांगण्यात आले. रुग्णाची covid-19 ही टेस्ट व आर टी. पी सी आर टेस्ट या दोन्ही निगेटिव्ह आलेल्या आहेत़ व सदर रुग्णास remdicivir 100mg चे सहा इंजेक्शन्स बाहेरून आणण्यास सांगितले. जे की सद्य स्थितीत covid-19 पॉझिटिव

जनहित न्यूज महाराष्ट्र.20/01/2021रोजी. जनहित लोकशाही पार्टी ची बैठक बोलाविली ह्या बैठकीत जनहित लोकशाही पार्टीचे कामकाज या विषयावर चर्चा करण्यात आली या वेळी जुन्नर तालुक्यातील विविध समाज घटकांचे तमाम पदाधिकारी व नेते उपस्थित होते,जनहित लोकशाही पार्टी चे संस्थापक अध्यक्ष मा अशोकराव आल्हाट व विमुक्त भटके समाज नेते, अशोकराव धनगांवकर,व अनेक जनहित लोकशाही पार्टी चे नेते उपस्थित होते.. जनहित न्यूज महाराष्ट्र

इमेज

जनहित लोकशाही पार्टी चे नवंनिव्युक्त कार्यकारिणी ला जोरदार प्रतिसाद जनहित लोकशाही पार्टी आज दिनांक,18/01/2021/रोजी,जुन्नर तालुक्यातील विविध गावांमध्ये जनहित लोकशाही पार्टी चे संस्थापक अध्यक्ष मा .अशोकराव आल्हाट,व जनहित लोकशाही पार्टी चे प्रमुख सल्लागार समिती सदस्य,मा,मधूकरजी उनवने, मा संतोष नाडेकर, महाराष्ट्र राज्य सघटक, बाळासाहेब साळवे,प, महाराष्ट्र संघटक, तसेच,मा,गणेश ताजणे पुणे जिल्हा अध्यक्ष गामिन , तसेच अनेक मान्यवर पदाधिकारी ,व कार्यकर्ते ,यांच्या उपस्थितीत ,अनेक मान्यवर पदाधिकारी यांना , जनहित लोकशाही पार्टी चे पदाधिकारी नियुक्त करण्यात आले. मा,गणेश आल्हाट मु ,पो.पेमदरा ता जुन्नर जिल्हा पुणे, यांची नियुक्ती पुणे जिल्हा मुख्य संघटक पदी नियुक्ती करण्यात आली. मा.उत्तम वायदंडे राहाणार पेमदरा यांची, जुन्नर तालुका उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली या वेळीया दोन्ही पदाधिकारी यांनी ग्राम पंचायत पेमदरा या गावात, पहिल्यांदा अख्खा जनसेवा पॅनल उभा करून इलेक्शन मधे फार जोरदार टक्कर दिली, या गावात पहिल्यांदा ही लढत पाहावयास मिळाली जनहित लोकशाही पार्टी ची पुढील राजकीय वाटचाल आम्ही आमच्या ताकदीने करणार आहोत , अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली. मान्यवर नेते ,यांच्या वतीने , या दोन्ही पदाधिकार्यांनी जोरदार पणे काम करावे, अशी अपेक्षा व्यक्त केली व आलेल्या सर्व मान्यवर नेते यांचा सत्कार करण्यात आला. जनहित लोकशाही पार्टी च्या वतीने, आज अनेक ग्रामपंचायत सदस्य म्हणून निवडून आलेल्या अनेक मान्यवर सदस्यांना हार्दिक अभिनंदन करण्यात आले .या वेळी परिसरातील अनेक मान्यवर उपस्थित होते नवनियुक्त पदाधिकारी व कार्यकर्त्यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. जनहित न्यूज महाराष्ट्र

इमेज

*कोरोना महामारी काळात केलेल्या विविध उपक्रम, रूग्णांना प्रत्यक्ष आधार व सहकार्य,घरकाम करणाऱ्या महिला, रिक्षाचालक, दिव्यांग व्यक्ती,कामगार तसेच प्रभागातील गरजू व्यक्तींना अन्न धान्य वस्तू वाटप,10,000 कापडी मास्क तसेच 3000 sanitizer च बॉटल चे वाटप. इ. कामे निःस्वार्थी पणे केल्या बद्दल* अंबरनाथ मेडिकल असोसिएशन, *AMA,IMA,AGPA* यांच्या वतीने केलेल्या कार्याचा गौरव म्हणून *कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित* करण्यात आले.यावेळी ठाणे जिल्हा रुग्णालयाचे *सिव्हिल सर्जन मा. डॉ.कैलास पवार, उपविभागीय अधिकारी श्री. जगतसिंग गिरासे,ACP श्री.नराळे साहेब, वरिष्ठ पोलिस निरीक्षक श्री. संजय धुमाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी डॉ. धीरज चव्हाण, नोडल ऑफिसर डॉ.नितीन राठोड, अब्दुलभाई शेख, IMA चे president डॉ. गौतम जठाले,AMA च्या प्रेसिडेंट डॉ. उषा महेश्वरी,AGPA चे डॉ. कुरेशी, आयोजक -डॉ.गणेश राठोड* इ. मान्यवर उपस्थित होते.

इमेज

दिनांक 3 जाने. 2021. युथ सर्कल हॉल, मुलुंड येथे वंचित बहुजन महिला आघाडी, मुलुंडच्या वतीने सावित्रीबाई फुले यांचा जयंतीचे आयोजन करण्यात आले सावित्रीबाईच्या कार्यावर अनेक वक्‍त्‍यांनी आपले मनोगत व्यक्त केले. सावित्रीने तत्कालिन परिस्थीतीत स्त्री शिक्षणाची गरज ओळखून स्त्री शिक्षणाचा पाया घातला. परंतू आज शिक्षित झालेली स्त्री मात्र अंधश्रद्धेच्या गर्तेतच जगत आहे. लिंगसमभाव रुजविण्या्ची आज खरी गरज असून त्याचे संस्कार घरातूनच आजच्या् मातांनी द्यायला पाहिजेत, असे परखड मत अशोक वानखडे यांनी महिला व अंधश्रद्धा या विषयावर बोलतांना व्यक्त केले. महा. अंनिस तर्फे सादर करण्यात आलेल्या कार्यक्रमात राजेन्‍द्र कोळी यांनी अंगात देवी येण्याचा प्रसंग रंगतदार करून हशा पिकविला. सदर कार्यक्रमाचे प्रस्तातविक संदेश बालगुडे यांनी केले आणि प्रबोधनाची प्रेरणादायी गीते गावून निर्मला माने यांनी उपस्थितांचा उत्सााह वाढविला. अर्चना मिसळे, मुलुंड तालुका अध्यक्ष वंचित बहुजन महिला आघाडी, प्रगती जाधव, रजनी कर्ड़क आदी कार्यकर्त्यांच्याअथक प्रयत्नातून आयोजित करण्यात आलेल्या सावित्री जयंती कार्यक्रमात वंचित बहुजन महिला आघाडीच्या मुंबई प्रदेश अध्यक्ष सीमा ताई तांबे, मुंबई महासचिव शूभलक्ष्मीताई सावंत, मुंबई उपाध्यक्ष निशीगंधा कदम, आय टी प्रमूख मुंबई स्नेहल सोहनी, ईशान्य जिल्हा अध्यक्ष सुनीता ताई गायकवाड, सचिव स्नेहाताई, सचिव वनिता कांबळे, मुलुंड तालुका अध्यक्ष राहुल भाऊ जाधव, रमेश भाऊ, विपूलभाऊ, दिनेशभाऊ, सचिन चंद्रमोरे तसेच वार्ड अध्यक्ष अनिल भाऊ शिंदे यांच्या सह वंचित बहुजन महिला आघाडीचे अनेक पदाधिकारी हे मोठ्या संख्येने उपस्थित होते.

इमेज