पोस्ट्स

जुलै, २०२१ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

किन्नरमित्र व महिलांसाठी आयोजित शिबिरात चित्राताई वाघ यांची उपस्थिती...अंबरनाथ शहर भारतीय जनता पार्टी तर्फे 25 जुलै रोजी आयोजित किन्नरमित्र व महिलांच्या आत्मसम्मान व स्वयंपूर्णते साठी रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर मध्ये महाराष्ट्र प्रदेश भाजपा नेत्या चित्राताई वाघ उपस्थित राहिल्या, व त्यानी मार्गदर्शन करुन प्रशस्तिपत्रक देऊन उपस्थित महिला व किन्नर मित्रांचे मनोबल वाढवले,सदर प्रसंगी हळदी कुंकु, ओटीभरण कार्यक्रम, महिलांना तुळशी वृंदावन अर्पण व राशन वाटप करण्यात आले,ह्या प्रसंगी महाराष्ट्राच्या सुपसिद्ध लावणी सम्राट विद्यासागर देडे यानी उपस्थितां समोर सुंदर लावणी प्रस्तुत करुन समा बांधला.

इमेज

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप. मोहोने कोळीवाडा प्रभाग क्रमांक १४ मधीलवसुमारे १५० जेष्ठ नागरिकांना .. शिवसेना मोहाने शाखेचे शिवसैनिक रोहन पांडुरंग कोट . यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत छत्री वाटप करण्यात आले

इमेज

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी नागरिक सरसावले पुढे कल्याण मधील अंबिवली मोहोने बाजारपेठ या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता तसेच दुचाकी वाहन चालवताना दुचाकीचे चाक खड्ड्यात अडकून अपघात होण्याची शक्यता असल्याचे लक्षात घेऊन मोहोने अंबिवली शिवसेने शाखेतील तरुणांनी तसेच नागरिकांनी मोहोने अंबिवली रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला व सर्वांनी रस्त्यावरील खड्डे बुजविले

इमेज

अनुप्रिता मोरे यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्काराने केले सन्मानित राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर यांच्या वतीने दिनांक 23 जुलै 2021 रोजी. ऑनलाइन कार्यक्रमात अनुप्रिता जाईबाई मोरे यांना सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करीत असल्याने बीड येथील अनुप्रिता जाईबाई मोरे यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून दलित कष्टकरी आणि वंचितांचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशासह साहित्यसंमेलन व्याखाने परिषदा आणि समाजोपयोगी काम केल्याची दखल घेत राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर चे संस्थापक अध्यक्ष बालाजी जाधव यांनी हा पुरस्कार दिला आहे .हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव आणि कौतुक यावेळी करण्यात आले

इमेज

जीवन संघर्ष पुस्तकावर विश्वविक्रमाची ऐतिहासिक मोहर सन्मानित कवी लेखक नवनाथ रणखांबे लिखित शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेले "जीवन संघर्ष" पुस्तक, हे त्यांचे पहिलेच पुस्तक असून ते तुफान गाजले आहे. जीवन संघर्ष पुस्तकावरील १७७ परिक्षणांची नोंद ओ एम जी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२१ मध्ये झाली आहे. मराठी साहित्य क्षेत्रात एक अनोखे ऐतिहासिक विश्व रेकॉर्ड निर्माण झाले आहे. डॉ . दिनेश गुप्ता ( सईओ आणि चिफ एडिटर ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड ) यांच्या हस्ते जीवन संघर्षकार नवनाथ रणखांबे यांना ओ एम जी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२१ ने सन्मानित करण्यात आले आहे

इमेज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढ दिवसा निमित्त अंबरनाथ चे नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या वतीने मोफत छत्री वाटपशिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेयांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आलेअंबरनाथ येथील वडवली विभाग,कृष्णनगर,ताडवाडी,राणे चाळ, वॉर्ड क्र.४४ व ४५ परिसरातील ज्येष्ट नागरीक, महिला, घरकाम करणाऱ्या महिला यांना चांगल्या दर्जाच्या ५०० छत्र्याचे मोफत वाटप संवाद व शिवसंवाद जनसंपर्क कार्यालयात करण्यात आलेतत्पूर्वी तळीये दरड दुर्घटना, कोकण व पश्चिम महाराष्ट्र मध्ये झालेल्या अस्मानी संकटामुळे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरीकांना तसेच महाडचे माजी आमदार स्व. माणिकराव जगताप यांना सामुहिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली

इमेज

अस्वस्थतेला वाट मोकळी करून रंगकर्मींनी घेतला आंदोलनाचा पवित्रा शासन दरबारी आपल्या मागण्या सादर करणार. करोना महामारीची झळ आज सर्वांनाच बसली आहे. मनोरंजन क्षेत्र ही याला अपवाद नाही. गेले दीड वर्ष करोनाची लढाई संयमाने लढल्यानंतर आता रंगकर्मींचा धीर सुटत चालला आहे. हाताला काम नसल्याने सर्व रंगकर्मी अस्वस्थ आहेत. आपल्या या अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा सर्व रंगकर्मीनी घेतला असून शासन दरबारी आपल्या मागण्या ते सादर करणार आहेत. या आंदोलनाची दिशा कशी असेल? रंगकर्मीच्या नेमक्या मागण्या काय आहेत? यासाठी नुकत्याच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेते विजय पाटकर, विजय गोखले, दिग्दर्शक विजय राणे, संचित यादव, मेघा घाडगे, शीतल माने, चंद्रशेखर सांडवे, हरी पाटणकर, सुभाष जाधव, प्रमोद मोहिते आदि मान्यवर मंडळी तसेच संघटक व सहसंघटक यांच्या उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली. यावेळी रंगकर्मींच्या मनातील अस्वस्थता व्यक्त झाली. व त्यांच्या मागण्यांचा आढावा घेण्यात आला. रंगकर्मींचे झालेले हाल लक्षात घेऊन आमच्या या मागण्यांची शासनाने अवश्य दखल घ्यावी व आवश्यक ते सर्व सहकार्य करावे असे प्रतिपादन उपस्थित सर्वांनी यावेळी केले. सिनेमा, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकार तंत्रज्ञांसोबतच तमाशा, भजन, कीर्तन, भारुड, गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी, लेझीम, वासुदेव, पोतराज, नंदीबैल, पिंगुळा, भराड इ.लोककला सादर करणाऱ्या तसेच वाद्यवृंद क्षेत्रातील कलाकारांचाही या आंदोलनात समावेश असणार आहे.या पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत.*करोना काळातील मागण्या* १.एकपात्री किंवा दोन-तीन लोकांच्या मदतीने सोसायटीच्या आवारात, मोकळ्या जागेत, पटांगणात सादर होणाऱ्या कलांना तात्काळ परवानगी मिळावी. २. फी न भरल्यामुळे रंगकर्मीच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. तात्काळ संबंधित शिक्षण संस्थांशी बोलून हा प्रश्र्न निकाली काढावा. ३. गेल्या दीड वर्षात काम नसल्याने कमाई झालेली नाही. त्यामुळे घरभाडे आणि इलेक्ट्रीसिटी बिल भरण्यास अडचण होत आहे. आपल्या अखत्यारीत असलेल्या संबंधित आस्थापनांना आपण आदेश देऊन रंगकर्मींना सवलत मिळवून द्यावी ही विनंती. ४. अटी नियमांचे पालन करून आम्हां रंगकर्मींना आमची कला सादर करण्याची परवानगी द्यावी. ५. काही प्रमाणात चित्रीकरण सुरु झाले आहे परंतु लोकल प्रवासाची मुभा नसल्यामुळे मिळणारे उत्पन्न आणि खर्च तसेच वेळेचा ताळमेळ घालणे कठीण झाले आहे, त्यामुळे शुटिंग चालू असलेल्या कलाकार-तंत्रज्ञांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी. ६. महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींसाठी 'रंगकर्मी रोजगार हमी योजना' लागू करावी. ७. कोरोना काळातील परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींना दरमहा रुपये ५,०००/- इतका उदरनिर्वाह भत्ता मिळावा.*कायमस्वरूपी मागण्या*१. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विखुरलेल्या रंगकर्मींची शासन दरबारी नोंद व्हावी. २. कलाकार पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटीं मध्ये शिथिलता आणावी. तसेच मानधनाच्या आकड्यात वाढ करावी. ३. रंगकर्मी हा असंघटित आहे. माथाडी कामगार बोर्डाच्या धर्तीवर 'रंगकर्मी बोर्डा' ची स्थापना करावी. ४. मुंबईत कला सादर करण्यासाठी येणाऱ्या रंगकर्मींना भाडे तत्वावर देण्यासाठी शासनातर्फे बांधण्यात येणाऱ्या निवासी गाळ्यांमध्ये प्राधान्याने व सवलतीच्या दरात सोय करण्यात यावी. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी रंगकर्मींना विश्रांतीगृहांमध्ये राहण्याची सोय असावी. ५. शासनातर्फे रंगकर्मीं साठी राखीव ठेवलेल्या म्हाडा व सिडको च्या घरांसाठीच्या संख्येत ५% वाढ करावी. ६. निराधार, वयोवृद्ध रंगकर्मींची शासकीय आणि खासगी वृद्धाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी. सोबत त्यांची जबाबदारी शासनाने घ्यावी. ७. महाराष्ट्रातील सरकारी तसेच नगरपालिका / जिल्हा परिषद हॉस्पिटल्स मध्ये रंगकर्मींसाठी राखीव बेड असावेत . अशी मागणी रंगकर्मी संघटनांनी केली आहे अशी माहिती हरि पाटणकर यांनी दिली

इमेज

उल्हासनगर राकांपा की मदद से कब्रस्तान में हाईमास्ट एलईडी लाइट की व्यवस्था...उल्हासनगर मुस्लिम कब्रिस्तान ट्रस्ट और महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज संगठन की अपील के अनुसार उल्हासनगर शहाड स्थित दफनभूमि में बिजली के साधनों की कमी के कारण मुस्लिम भाइयों को रात में दफनाने के दौरान मोबाइल टॉर्च का उपयोग करना पड़ता है, एनसीपी के उल्हासनगर शहर जिला उपाध्यक्ष श्री जोगेन्द्र सिंह डी खुसर सोनू पंजाबी को जब पता चला तो उन्होंने राकांपा महाराष्ट्र राज्य सचिव उमनपा नगरसेवक भरत राजवानी गंगोत्री के प्रयासो से राकांपा उल्हासनगर शहर जिलाध्यक्ष हरकिरण कौर सोनिया धामी के मार्गदर्शन में कब्रस्तान में हाईमास्ट एलईडी लाइट लगवाई गई और उक्त अवसर पर मुस्लिम भाइयों ने आभार व्यक्त किया।श्री अब्दुल गफ्फार शेख, अध्यक्ष, उल्हासनगर मुस्लिम कब्रिस्तान ट्रस्ट और महाराष्ट्र पुरोगामी मुस्लिम समाज, डॉ. शाहबुदीन शेख, श्री साबिर भाई आदि सदस्यों ने धन्यवाद किया।

इमेज

प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार प्रभारी राणी अगरवाल व उल्हासनगर शहर जिल्हा अध्यक्ष रोहित साळवे यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार ने वाढवलेल्या इंधन दरवाढ तसेच महागाई च्या विरोधात उल्हासनगर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी चे वतीने नेताजी चौक ते श्रीराम पेट्रोल पंप सायकल यात्रा काढून भा ज प सरकारने वाढवलेल्या महागाई चा निषेध व्यक्त केला यावेळी शहर अध्यक्ष रोहित साळवे . साऊथ ब्लॉक अध्यक्ष किशोर धडके. सफाई कामगार प्रदेश अध्यक्ष राधाचरण कारोतिया . महादेव शेलार, विशाल सोनवणे, दीपक सोनोने ,डॉ आझाद शेख , NSUI अध्यक्ष रोहित ओव्हाळ, अनिल सिन्हा , मनोहर मनुजा ,चिराग फक्के. तसेच अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते या वेळी आंदोलन करीत असलेल्या आंदोलकांना विठ्ठलवाडी पोलीसानी ताब्यात घेतले व काही वेळात पुन्हा सोडून देण्यात आले या वेळी शंकर आहुजा, मनोज मिसळ, आशेराम टाक , वज्जिरुद्दिन, रवी बजाज,राजेश मल्होत्रा, दीपक सोनोने, महेश मीरानी, बाळू पगारे, अमित डेरावली, किशोर उदासी, पवन मीरानी, आशिष कदम, निलेश केदार, संतोष मिंडे , विलास डुबे , राजू वानखेडे, सुशांत कांबळे, निलेश सोरटे, आकाश बिरारे, संदीप बिरारे , सुरेश काजळे, अनिल यादव, अमित चौहान, भगवान तायडे, गणेश मोरे सोबत अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

इमेज

कल्याण केडीएमसीच्या हद्दीतील अतिक्रमणावर कारवाई कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त विजय सूर्यवंशी यांच्या आदेशानुसार उपायुक्त अनंत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण ड. प्रभागामधील पुणे लिंक रोड. चक्की नाका. 100 फुटी रोड. तसेच विठ्ठलवाडी समशान भूमी रस्त्यावरील अतिक्रमणे हटविण्यात आले तसेच रस्त्याच्या आसपास च्या परिसरातील रस्ते सफाई करून स्वच्छता करण्यात आली. ड प्रभागातील केडीएमसीच्या हद्दीत असलेल्या या रस्त्यांवर अतिक्रमणे करण्यात आली होती या अतिक्रमणावरती कारवाई करण्यात यावी अश्या तक्रारी येत होत्या आज दिनांक 7 जुलै 2021 रोजी प्रभाग क्षेत्र अधिकारी सुधीर मोकल तसेच त्यांच्या कर्मचारी पथकाने ही कारवाई केली अशी माहिती प्रभाग अधिकारी सुधीर मोकल यांनी दिली

इमेज

धोकादायक झालेल्या पुलाला बांबुच्या काठयांचा आधार...अंबरनाथ तालुक्यातील चिरड शेलारपाडा गावचा पुल झाला धोकादायक...धोकादायक पूल देत आहे जीवघेण्या अपघातांना निमंत्रण...अंबरनाथ तालुक्यातील मलंगगडाच्या पायथ्याशी असलेल्या चिरड गावचा पूल सध्या धोकादायक झाला आहे. पुलाच्या कडा या नदीत पडत असून सध्या ग्रामस्थांनी या धोकादायक पुलाला बांबुच्या काठ्यांचा आधार दिलेला आहे. त्यामुळे या पुलाच्या दुरुस्तीकडे प्रशासकीय यंत्रणा कधी लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. अंबरनाथ तालुक्यातील पोसरी ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेला चिरड गावचा पूल हा धोकादायक झाला आहे. गेल्या अनेक वर्षांपासून नव्या पुलाची मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत. मात्र ग्रामस्थांच्या मागणीकडे राजकीय मंडळी देखील दुर्लक्ष करत आहेत. चिरड गावचा पूल हा वाहतुकीसाठी अत्यंत महत्वाचा आहे. या पूल थेट मलंगगड भागाला राज्य महामार्गाला जोडत आहे. चिरड गावच्या पुलावरून थेट खोणी तळोजा या मार्गाला जोडला जाणारा पूल सध्या धोकादायक झाल्याने त्याला बांबुच्या काठ्यांचा आधार दिला जात आहे. मात्र या आपुलाला संरक्षक कठडे नसल्याने आणि पुलाचे स्लॅब झाली कोसळत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. त्यामुळे सध्या या पुलावरून होणारी वाहतूक धोकादायक ठरत आहे. त्यामुळे प्रशासन कधी अश्या धोकादायकल पुलांकडे लक्ष देणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. माजी कामगार मंत्री शाबीर भाई शेख यांच्या कालखंडात या पुलाचे काम करण्यात आले होते. मात्र आता हा पूल धोकादायक झाला असून अपघातांना निमंत्रण देत आहे. त्यामुळे प्रशासकीय यंत्रणा याकडे कधी लक्ष देणार असा प्रश्न निर्माण झाला आहे.

इमेज

सिंधी हेरिटेज फाउंडेशन संस्थापक, आंतरराष्ट्रीय अध्यक्ष मुकेश बजाज, विश्व हिंदू परिषद के उपाध्यक्ष, सिंधी हेरिटेज फाउंडेशन के संस्थापक, राष्ट्रीय अध्यक्ष नारायण बाबलानी के नेतृत्व में तारीख 04/ जुलै /2021को सिंधी हेरिटेज फाउंडेशन उल्हासनगर मे महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना शिबिर सूचना कार्ड वितरण के संबंध में उल्हासनगर मे शिबीर का आयोजन किया. 250 से अधिक लोगों को महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना माहिती कार्ड के बारे में जाणकारी दी गयीइस अवसर पर संस्था के पदाधिकारियों ने इस आयोजन में भाग लिया

इमेज

नदीपात्रात केमिकल प्रदुषण मुळे हज़ारों मासे मृतअंबरनाथ ग्रामीण क्षेत्रात मलंगगड व तावली च्या डोंगरातून वाहणारी मुकी गवर नदी जी पुढे जाऊन कासाडी नदीचे रूप घेते, ह्या नद्या ब्राम्हण करवले व आसपास चे ग्रामस्थ, शेतकरी व जीवश्रुष्टि साठी जीवनदायी आहेत, 10 गावासाठी ह्या नदीचे पाणी उपयोगात घेतले जाते,परंतु तिथे असलेल्या कम्पनी मुळे उगमस्थानी रसायन केमिकल सोडले जात असल्याने प्रदूषण झाल्यामुळे हज़ारो मासे व अन्य जलचर मृत झालेले दिसत आहेत, कृपया संबंधित अधिकारी यांनी दखल घ्यावी अशी मागणी नदी मित्र विकास पाटील व ग्रामस्थ करीत आहेत

इमेज

राज्य सरकार के पास पैसे नहीं है, सरकार खुद उधार लेकर पगारें चला रही, इस बयान पर पत्रकार परिषद लेकर शिवसेना ने नाराज़गी जताई...उल्हासनगर के धोखादायक बिल्डिंगो के मामले में महाविकास आघाड़ी सरकार के गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड के बयान, की राज्य सरकार के पास पैसे नहीं है, सरकार खुद उधार लेकर पगारें चला रही, इस बयान पर पत्रकार परिषद लेकर शिवसेना ने नाराज़गी जताई,आघाड़ी सरकार ने अभी तक उल्हासनगर शहर के विकास कार्यो के लिए करोड़ो रुपयों का अनुदान दिया है,उल्हासनगर शहर के ज्वलंत मुद्दे धोखादायक बिल्डिंग के मुद्दे पर पालकमंत्री, सांसद शिंदे के द्वारा हर संभव मदद करेंगे ऐसी ग्वाही शिवसेना शहर प्रमुख चौधरी जी ने दी, बिल्डिंग हादसे में मृतक के परिवार वालो जल्द महाराष्ट्र शासन द्वारा घोषित पांच लाख की मदद उमनपा महापौर लीलाबाई आशान के हाथों दिया जाएगा, शिवसेना  नगरसेवक धनंजय बोडारे जी ने आश्वस्त किया.

इमेज

निर्वासित क्षेत्र या शहर के लिए अलग कानून बनाने की आवश्यकता है : गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड उल्हासनगर की धोकादायक इमारतों के विषय मे विस्तृत चर्चा करने हेतु महाराष्ट्र राज्य के गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड जी और पूर्व सांसद आनंद परांजपे 2 जुलाई 2021 को दोपहर उल्हासनगर कैम्प 3 मे धोकादायक इमारतवासियों की समस्या सुनने आये,बैठक के आयोजक उल्हासनगर ट्रेड असोसिएशन और धोकादायक इमारतों के रहिवासियो द्वारा पुनर्वसन, पुनर्निर्माण, एफएसआई 4, ज़मीन मालिकाना हक, रेग्युलराइज़ेशन में 2006 का रेडी रेकनर रेट लगे, भिवंडी आमंत्रा में 500 मकान मिले है परंतु दूर है, ट्रांज़िट कैम्प उल्हासनगर में बनाये जाए, निवेदन किया गया,उक्त अवसर पर मंत्री महोदय ने कहा कि, निर्वासितों के क्षेत्र या शहरों के लिये अलग क़ानून बनाने की सोच रखने की आवश्यकता है।उमनपा आयुक्त द्वारा शहरवासियों और लोकप्रतिनिधियों को भी मिलने का समय न देकर, समस्या सुनी नही जाने की शिकायत की गई, और मनमाने ढंग से 1300 इमारतों को स्ट्रक्चरल ऑडिट का नोटिस निकालने की तथा इमारतें ढहाने की कोशिशों का विरोध इमारतवासीयों द्वारा दर्ज कराये जानेपर मंत्री महोदय ने कहा कि उमनपा आयुक्त को कानून के दायरे में रहकर एमआरटीपी एक्ट के तहत इमारतो की डिमोलिशन कारवाई करनी होगी,15 दिनमें पालकमंत्री, जिलाधिकारी व आयुक्त से दोबारा बैठक करके समस्या का हल निकालने का आश्वासन दिया।इमारतों के पुनर्वसन, पुनर्निर्माण के लिये 100 करोड़ रुपये निधी उपलब्ध करवाने की बात कही गयी सरकार का प्रतिनिधित्व करने मैं आया हु, आपकी बात नगरविकास मंत्रालय तक पोहोंचाउँगा और जल्द ही कोई ना कोई स्थायी समाधान निकालने की कोशिश होगी, ऐसा आश्वासन जितेंद्र आव्हाड द्वारा दिया गया।

इमेज

जीवनावश्यक वस्तूंच्या दरवाढी विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन केंद्र सरकारने पेट्रोल-डिझेल, गॅस, भाजीपाला, डाळी आदी जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ केल्यामुळे प्रचंड महागाई भडकल्याचा आरोप करून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने शिवाजी महाराज चौकात धरणे आंदोलन केले . दिनांक २ जून रोजी उल्हासनगर येथील शिवाजी महाराज चौकात राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भरत गंगोत्री, नगरसेविका सुनीता बगाडे, शहराध्यक्ष सोनिया धामी, महिला अध्यक्ष रेखा हिरा, यांच्या नेतृत्वखाली आंदोलन करण्यात आले केंद्र सरकारने प्रचंड महागाई केली आहे, यामुळे सर्वसामान्य व गरीब नागरिकांचे बजेट कोलमडून पडले आहे असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक भरत गंगोत्री यांनी यावेळी केला . प्रतिनिधी कृष्णा महाले जनहित न्यूज महाराष्ट्र उल्हासनगर

इमेज

इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन इन्वेस्टीगेशन अधिकारी यांनी छापा टाकून लाखो रुपयांचे बनावटी लोगो केले जप्त इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शनचे मुख्य इन्वेस्टीगेशन अधिकारी रामजीत गुप्ता आणि त्यांच्या टीमने दादर येथील इन्फिनिटी या गोडाउन मध्ये ई ओ डब्ल्यू यांच्या मदतीने छापा टाकून लाखो रुपयाचा डुप्लिकेट ऑक्सेंबर्ग आणि मल्टिनॅशनल ब्रांड चे बनावट लोगो केले जप्त इंडियन कॉपीराईट प्रोटेक्शन चे मुख्य इन्वेस्टीगेशन ऑफिसर रामजीत गुप्ता. रवि वासवानी. नदीम सुषमा ननावरे तसेच सियाराम कंपनीचे जीएम सुरेंद्रकुमार पाटील यांना माहिती मिळाली की दादर ईस्ट स्टेशन परिसरात इन्फिनिटी नावाच्या गोडाउन मध्ये ऑक्सेंबर्ग आणि मल्टिनॅशनल ब्रँड चे लोगो विक्री होत आहे या माहितीच्या आधारावर मुंबई ई ओ डब्ल्यू डी सी पि २ यांच्या मार्गदर्शनाने व पोलिस अधिकारी यांच्यासोबत रामजीत गुप्ता आणि त्यांच्या टीमने छापा टाकून लाखो रुपयांचा माल जप्त केला या छाप्यामध्ये दाबीर शेख या इसमा विरुद्ध भोईवाडा पोलीस स्टेशन मुंबई येथे रवि वासवानी यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला अधिक तपास सुरू आहे अशी माहिती रामजीत गुप्ता यांनी दिली

इमेज

कल्याण जिल्हा सोशल मीडिया प्रमुख या पदावर एस एस न्यूज चेनल चे संपादक संदीप नारायण साळवे यांची नियुक्ती. उल्हासनगर मधील भारतीय लहुजी सेना चे संस्थापक अध्यक्ष सेना प्रमुख व्ही जी रेड्डी यांच्या आदेशाने तसेच राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब बागुल यांच्या मार्गदर्शनानुसार एस एस न्यूज चॅनलचे संपादक संदीप नारायण साळवे यांची कल्याण जिल्हा सोशल मीडिया प्रमुख या पदावर निव्युक्ती करण्यात आली असून राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य महाराष्ट्र प्रवक्ते ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख अतुल मधुकर राव शिंदे यांच्या नेतृत्वखाली चांगल्या प्रकारे काम करण्याची संधी साळवे यांना या पदावर निव्युक्त करून देण्यात आली आहे तसेच रमेश विश्वनाथ शेंडगे यांची कल्याण उप जिल्हा प्रमुख या पदावर नीव्युक्ती करण्यात आली या वेळी भारतीय लहुजी सेना चे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी उपस्थित राहून नवं नीव्युक्त संदीप साळवे तसेच रमेश शेंडगे यांना पुढील वाटचाली साठी शुभेच्छा दिल्या.

इमेज