व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन१४ ठराव मंजूर, शासनाकडे करणार पाठपुरावा
पत्रकारांनी भरगच्च ‘गदिमा’ ठरले अधिवेशन ठरावाच्या मंजुरीचे साक्षिदार ! व्हाईस ऑफ मीडिया राज्य शिखर अधिवेशन १४ ठराव मंजूर, शासनाकडे करणार पाठपुरावा बारामती : दोन दिवसापासून बारामती येथे सुरू असलेल्या व्हाईस ऑफ मीडियाच्या राज्य शिखर अधिवेशना चा समारोप झाला. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यासह १४ ठराव यावेळी मांडण्यात आले. हात उंचावून पत्रकारांनी भरगच्च असलेले "गदिमा सभागृह" या ठरावाच्या मंजुरीचे साक्षिदार ठरले! या प्रसंगी मंचावर राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे सरचिटणीस चंद्रमोहन पुप्पाला, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अनिल म्हस्के, राज्य उपाध्यक्ष अजितदादा कुंकूलोळ यांच्यासह प्रदेश टीम, विभागीय अध्यक्ष, आणि सर्व जिल्हाध्यक्ष उपस्थित होते. व्हाईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी संजय पडोळे यांनी ठराव वाचन या प्रसंगी केले. यात १. पत्रकारांसाठी स्वतंत्र महामंडळाची निर्मिती करून भरीव निधी उपलब्ध करून देण्यात यावा. २. रेडिओ टीव्ही सोशल मिडिया कर्मचाऱ्यांना श्रमिक पत्रकार मान्यता द्यावी. ३. पत्रकार हल्ला विरोधी कायद्याची कठोर अंमलबजावणी क