शांतीदूत विश्वकर्मी डॉ विश्वनाथ कराड यांच्याकडून मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा गौरव.
*शांतीदूत विश्वकर्मी डॉ विश्वनाथ कराड यांच्याकडून मा.खा.डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा गौरव.*
पुणे ( विशेष प्रतिनिधी)
भारतीय संस्कृती आणि अध्यात्माचा वारसा जपण्यात योगदान असणारे, महाराष्ट्राभूषण व्यक्तिमत्व, तत्वज्ञानी, विश्वकर्मी शांतीदूत,पाच विद्यापीठाचे संस्थापक,एम आय टीचे संस्थापक डॉ प्रा विश्वनाथ दा कराड यांनी कोथरुड शैक्षणिक संकुलात लातूर चे लोकप्रिय, संसद रत्न,कार्यसम्राट माजी खासदार,प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांचा स्मृती चिन्ह आणि मानाची शाल देऊन यथोचित गौरव केला.
डॉ विश्वनाथ कराड यांनी माजी खासदार डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी २०१४ ते २०१९ या काळात केलेल्या कामाचे कौतुक करुन उच्च शिक्षित खासदार म्हणून अनेक केंद्र सरकार च्या विकास कामाच्या योजना आणि विशेष म्हणजे लातूर ला आणि नांदेड ला NEET परीक्षा केंद्र आणि पासपोर्ट सेवा केंद्र आणि रेल्वे बोगी कारखाना आणि सुपर स्पेशिलिटी हॉस्पिटल असे अनेक लोकउपयोगी काम केल्याबद्दल समाधान व्यक्त करुन पुढील काळासाठी डॉ सुनील गायकवाड यांना शुभेच्छा देऊन अत्यंत आनंदानी विद्यापीठ कॅम्पस मधे गौरव करुन शुभेच्छा दिल्या.
शिक्षक दिनाच्या निमित्य डॉ सुनील बळीराम गायकवाड यांनी लिहलेला राजभाषा किसे कहते है? आणि जनसेवक जमिनीशी नाळ असलेला नेता हे दोन ग्रंथ विश्वधर्मी शांतिदूत डॉ विश्वनाथ कराड यांना देऊन त्यांचे आशीर्वाद डॉ सुनील गायकवाड यांनी घेतले.
या प्रसंगी विद्यापीठ चे रजिस्टार आणि अनेक अधिकारी उपस्थित होते.विशेष उपस्थित पांच पांडव यांची मातोश्री कुंती यांच्या परिवाराचे वंशज राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचे राष्ट्रीय संपर्कप्रमुख डॉ ब्रिजेश कुंतल, चोखामेळा साहित्य संमेलन प्रमुख संयोजक सचिन पाटील,भाजपा चे विस्तारक सिद्धेश्वर माने,आदी मान्यवर उपस्थित होते.शांतीदूत विश्वकर्मी डाॅ.विश्वनाथ कराड यांच्याकडून मा.खासदार डाॅ.सुनिल गायकवाड यांचा गौरव झाल्याबद्दल बहूजन संग्रामचे प्रदेशाध्यक्ष व व्रूत्तदर्शन मिडीयाचे संपादक भीमराव चिलगावकर यांनी त्यांचे त्रिवार अभिनंदन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा
धन्यवाद