बहुजन संग्रामच्या नेत्यारंजनाताई कांबळे यांचे निधन

बहुजन संग्रामच्या नेत्या
रंजनाताई कांबळे यांचे निधन
मुंबई: 'बहुजन संग्राम' या संघटनेच्या महिला आघाडीच्या राज्य प्रमुख रंजनाताई कांबळे (६२) यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्यानंतर आज रविवारी ( २४ सप्टेंबर) सकाळी ६ वाजता दुःखद निधन झाले. त्यांना डोंबिवली येथील एका खासगी रुग्णालयात शनिवारी दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
रंजनाताई कांबळे या भारतीय बौद्ध महासभेच्या कांदिवली ( पूर्व) क्रांती नगर शाखेच्या कोषाध्यक्ष होत्या. स्थानिक धम्मक्रांती महिला उत्कर्ष मंडळाच्या त्या अध्यक्षही होत्या.त्यांनी २०११ मध्ये भारिप- बहुजन महासंघाच्या उमेदवार म्हणून मुंबई महानगर पालिकेची निवडणूक लढवली होती.

त्या मूळच्या जालना जिल्ह्यातील केंधळी (ता. मंठा) येथील होत्या. मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढ्याच्या काळात दलित मुक्ती सेनेच्या विलेपार्ले येथील सम्राट अशोक नगर शाखेत त्या सक्रिय कार्यकर्त्या होत्या. 

त्यांच्यापाठी दोन मुले, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार