पोस्ट्स

किन्नरमित्र व महिलांसाठी आयोजित शिबिरात चित्राताई वाघ यांची उपस्थिती...अंबरनाथ शहर भारतीय जनता पार्टी तर्फे 25 जुलै रोजी आयोजित किन्नरमित्र व महिलांच्या आत्मसम्मान व स्वयंपूर्णते साठी रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर मध्ये महाराष्ट्र प्रदेश भाजपा नेत्या चित्राताई वाघ उपस्थित राहिल्या, व त्यानी मार्गदर्शन करुन प्रशस्तिपत्रक देऊन उपस्थित महिला व किन्नर मित्रांचे मनोबल वाढवले,सदर प्रसंगी हळदी कुंकु, ओटीभरण कार्यक्रम, महिलांना तुळशी वृंदावन अर्पण व राशन वाटप करण्यात आले,ह्या प्रसंगी महाराष्ट्राच्या सुपसिद्ध लावणी सम्राट विद्यासागर देडे यानी उपस्थितां समोर सुंदर लावणी प्रस्तुत करुन समा बांधला.

इमेज

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप. मोहोने कोळीवाडा प्रभाग क्रमांक १४ मधीलवसुमारे १५० जेष्ठ नागरिकांना .. शिवसेना मोहाने शाखेचे शिवसैनिक रोहन पांडुरंग कोट . यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत छत्री वाटप करण्यात आले

इमेज

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी नागरिक सरसावले पुढे कल्याण मधील अंबिवली मोहोने बाजारपेठ या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता तसेच दुचाकी वाहन चालवताना दुचाकीचे चाक खड्ड्यात अडकून अपघात होण्याची शक्यता असल्याचे लक्षात घेऊन मोहोने अंबिवली शिवसेने शाखेतील तरुणांनी तसेच नागरिकांनी मोहोने अंबिवली रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला व सर्वांनी रस्त्यावरील खड्डे बुजविले

इमेज

अनुप्रिता मोरे यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्काराने केले सन्मानित राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर यांच्या वतीने दिनांक 23 जुलै 2021 रोजी. ऑनलाइन कार्यक्रमात अनुप्रिता जाईबाई मोरे यांना सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करीत असल्याने बीड येथील अनुप्रिता जाईबाई मोरे यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून दलित कष्टकरी आणि वंचितांचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशासह साहित्यसंमेलन व्याखाने परिषदा आणि समाजोपयोगी काम केल्याची दखल घेत राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर चे संस्थापक अध्यक्ष बालाजी जाधव यांनी हा पुरस्कार दिला आहे .हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव आणि कौतुक यावेळी करण्यात आले

इमेज

जीवन संघर्ष पुस्तकावर विश्वविक्रमाची ऐतिहासिक मोहर सन्मानित कवी लेखक नवनाथ रणखांबे लिखित शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेले "जीवन संघर्ष" पुस्तक, हे त्यांचे पहिलेच पुस्तक असून ते तुफान गाजले आहे. जीवन संघर्ष पुस्तकावरील १७७ परिक्षणांची नोंद ओ एम जी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२१ मध्ये झाली आहे. मराठी साहित्य क्षेत्रात एक अनोखे ऐतिहासिक विश्व रेकॉर्ड निर्माण झाले आहे. डॉ . दिनेश गुप्ता ( सईओ आणि चिफ एडिटर ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड ) यांच्या हस्ते जीवन संघर्षकार नवनाथ रणखांबे यांना ओ एम जी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२१ ने सन्मानित करण्यात आले आहे

इमेज