श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक
श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान घर घेताना व बँक लोन करताना ग्राहकांनी बँकेतून खात्री करून होम लोन घ्यावे बदलापूर : जे पी रेजन्सि अंबरनाथ येथील प्रकरण समोर आले आहे श्रीराम हाउसिंग फायनान्स बँकचे कर्मचारी संतोष जाधव आणि त्याचे सहकारी यांनी एका गरीब महिलेला दिड पावणे दोन लाखाची फसवणूक केली आहे साडे सतरा लाखाचे लोन झाले असल्याचा चेक दाखवून अंबरनाथ पूर्व येथील जे पी रेजन्सीच्या पटेल या बिल्डरला 1 लाख रुपये भरणा करायला सांगितले आणि बदलापूर मधील रजिस्ट्रेशन ऑफिस येथे दहा हजार रुपये भरणा करून घराचे कागदपत्र रजिस्टर करून दिले पूर्ण रक्कम भरणा होताच श्रीराम हाउसिंग फायनान्स चे कर्मचारी अंधेरी ब्रांचचे राकेश लोन धारकाच्या घरी आले व सदर महिलेकडून महिन्याचा ई एम आय ची रक्कम भरणा करून घेतली एवढे पैसे भरणा केल्यानंतर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला घराची चावी देत आहोत असे बिल्डरच्या ऑफिस मधील कर्मचारी पायल बसंतानी यांचा कडून सांगण्यात आले होते त्या वेळी बँकेचे कर्मचारी संतोष जाधव यांनी सुद्धा 17 तारखेला जे पी बिल्डर यांना साडे सतरा