शेकडो भगिनींची माजी आमदार नरेंद्र पवार यांना राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी
माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यंदाही जपली 'सामाजिक रक्षाबंधना' ची संवेदना शेकडो भगिनींची नरेंद्र पवार यांना राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी 9 कल्याण : *प्रतिनिधी कल्याणी आगटे* रक्षाबंधन बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याची महती अधोरेखित करणारा आपल्या संस्कृतीतील एक प्रमूख सण.आजच्या या पवित्र सणाचे औचित्य साधत कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यंदाही आपली सामूहिक रक्षाबंधनाची संवेदना जपल्याचे दिसून आले. पवार यांना राखी बांधण्यासाठी कल्याण पश्चिमेतील शेकडो महिला भगिनींनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती. गेल्या कित्येक वर्षांपासून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने हा सामाजिक आणि सामुदायिक रक्षाबंधनाचा उपक्रम साजरा केला जात आहे. त्यामध्ये आता केवळ फरक इतकाच आहे की यापूर्वी तो मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन साजरा केला जायचा. आणि यंदा हा सोहळा पवार यांच्या निवासस्थानी साजरा झाला. मात्र त्यानंतरही त्याची व्याप्ती यत्किंचितही कमी झाली नाही. कल्य...