जगाला युद्ध नको बुद्ध हवा - आनंदराज आंबेडकर
जगाला युद्ध नको बुद्ध हवा - आनंदराज आंबेडकर उल्हासनगर (अशोक शिरसाट) आज एक रिक्षावाला माणूस मुख्यमंत्री होते, एक चाय वाला देशाचा पंतप्रधान होतो ते फक्त भारतीय संविधानामुळे , भगवान गौतम बुद्धाचा धम्म हा जगातील शांतता प्रिय आहे म्हणून आजही जगाला युद्ध नको बुद्ध हवा असे उदगार रिपब्लिकन सेनेचे सर सेनानी आदरणीय आनंदराज आंबेडकर, हे उल्हासनगरात एका बाल श्रामणेर शिबिरात उद् घाटन सोहळ्यात बोलत होते तसेच उल्हासनगर- २ मध्ये एम, आय ,डी ,सी, रोड, हनुमान नगर, येथे अखिल भारतीय भिक्खुसंघ अंतर्गत यशोधरा फाऊंडेशन ट्रस्ट च्यावतीने पाच दिवसाचे बाल श्रामणेर, शिबिर आणि भगवान गौतम बुद्धांच्या मूर्तीचे अनावरण उद्घाटन सोहळ्याचे आयोजन भिक्खु महामोग्गलायन यांनी केले होते तसेच उल्हासनगर - २ मध्ये हनुमान नगर येथे यशोधरा बुद्ध विहार फाउंडेशन या ठिकाणी जगाला शांततेचा संदेश देणारे तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्या मुतीचे अनावरण उद्घाटन सोहळा हा इंदूमिल प्रणेते आनंदराज आंबेडकर, मनीषाताई आनंदराज आंबेडकर, आणि पुज्य भंतेजी धम्मप्रिय, यांच्या हस्ते झाले तसेच या बाल श्रामणेर शिबिराच्या कार्यक्रमात