मधुसुदन कालेलकर सुवर्णकाळाचे साक्षीदार नव्हेत तर भागीदार!
मधुसुदन कालेलकर सुवर्णकाळाचे साक्षीदार नव्हेत तर भागीदार! कै. मधुसूदन कालेलकर जन्मशताब्दी महोत्सवाला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लेखक, नाटककार, गीतकार, नाट्यनिर्माते अशी बहुआयामी ओळख असलेल्या कै. मधुसूदन कालेलकर यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून मनोरंजनसृष्टीतील त्यांच्या अमूल्य योगदानाला मानवंदना देण्यासाठी सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र शासन तसेच मधुसूदन कालेलकर यांचे सुपुत्र अनिल कालेलकर, अलका कुबल-आठल्ये, दिग्दर्शक विजय राणे, मनोहर सरवणकर या मान्यवरांच्या पुढाकाराने १९ मार्च ते २२ मार्च या कालावधीत मुंबईत श्री शिवाजी मंदिर येथे चार दिवस रंगलेल्या जन्मशताब्दी महोत्सवाचा सांगता सोहळा संपन्न झाला. कै. मधुसूदन कालेलकर यांच्या नाटकांचा आणि त्यांनी शब्दबद्ध केलेल्या गीतांच्या सांगीतिक मैफिलीला रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ज्येष्ठ कलाकार प्रदीप वेलणकर, विजय पाटकर, चेतन दळवी, सविता मालपेकर, अर्चना नेवरेकर आदी मान्यवरांनी या महोत्सवाला आवर्जून उपस्थिती लावली. या जन्मशताब्दी महोत्सवात मधुसूदन कालेलकर लिखित ‘दिवा जळू दे सारी रात, ‘डार