पोस्ट्स

सावकारी कर्ज आणि कायद्यातील तरतूद

इमेज
सावकारी कर्ज आणि कायद्यातील तरतूद  नंदुरबार महाराष्ट्र:सावकारी नियमनाचा कठोर कायदा असला तरी आजही गरजू सर्वसामान्य, शेतकऱ्यांना परवानाधारक किंवा विनापरवाना सावकाराकडून कर्ज घ्यावे लागते. याचे कारण बँकांकडून कर्ज मिळण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची आणि वेळखाऊ असते.                             तातडीच्या गरजा आणि नैसर्गिक आपत्तीच्या वेळी पैसा सुलभपणे मिळत नाही. तसेच कर्जाची परतफेड न झाल्यामुळे बँकांकडून नवीन कर्जासाठी नकार देण्यात येतो. त्यामुळे सावकार हा एकमेव पर्याय उरतो. अनेकदा शेतकऱ्यांना बँकांच्या विविध कर्ज योजनांची माहितीच नसते. या कारणामुळे शेतकऱ्यांना अनेकदा सावकारांच्या जाळ्यात अडकावे लागते. ज्यामुळे त्यांची आर्थिक पिळवणूक होते. कायद्याने दंडाची तरतूद कर्जदाराची कोणतीही स्थावर मालमत्ता कर्जापोटी स्वतःच्या नावावर करून घेता येत नाही. कर्ज वसुलीसाठी दमदाटी, मारहाण करता येत नाही. कायद्याच्या अंमलबजावणीसाठी आणि कर्जदारांच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हा निबंधक व इतर प्राधिकृत अधिकाऱ्यांची ने...

लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे.

इमेज
लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे. मुंबईतील प्रत्येक लोकल ट्रेनमध्ये लागणार 'हा' एक्स्ट्रा डब्बा; तयारीही झाली, 'या' प्रवाशांना सर्वाधिक फायदा.           मध्य रेल्वेने एका नव्या बदलासंदर्भातील निर्णय घेतला असून त्याबद्दलचे रचनात्मक बदलही करण्यात आले आहेत. या निर्णायचा फायदा ज्येष्ठ नागरिकांना होणार आहेत.           रेल्वेने प्रवास आरामदायी होण्यासाठी लोकलचा मालडबा ज्येष्ठ नागरिकांसाठी खुला करण्यात आला आहे. मध्य रेल्वेने माटुंगा कारखान्यात लोकलच्या मालडब्यात बदल करून, ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र आकर्षक डबा तयार झाला आहे. नेमका काय आहे हा सारा प्रकार मध्य रेल्वेवरील प्रत्येक लोकलमध्ये प्रवाशांची प्रचंड गर्दी असते. लोकलमध्ये प्रथम श्रेणी, द्वितीय श्रेणी असे डब्याचे प्रकार आहेत. तर, महिला, दिव्यांग आणि मालवाहतुकीसाठी स्वतंत्र डबे आहेत. गरोदर स्त्रियांना आणि ज्येष्ठ नागरिकांना लोकलच्या डब्यात काही आसने राखीव आहेत. मात्र, ज्येष्ठ नागरिकांना गर्दीतून प्रवास करणे कठीण होते....

मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण ब्लॉक

इमेज
मध्य रेल्वेवर ठाणे ते कल्याण ब्लॉक मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ठाणे ते कल्याण स्थानकांदरम्यान सकाळी 10.40 ते दुपारी 3.40पर्यंत जलद मार्गावर ब्लॉक असेल. तसेच हार्बर लाईनवर पनवेल ते वाशी स्थानकांदरम्यान सकाळी 11.05 ते दुपारी 4.05पर्यंत ब्लॉक राहणार आहे. ब्लॉक काळात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सकाळी 9.34 ते दुपारी 3.03पर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद/अर्धजलद लोकल ठाणे व कल्याणदरम्यान धिम्या मार्गावर वळवल्या जातील.

फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले

इमेज
फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले  पनवेल शहरातील तक्का परिसरात शनिवारी (दि.२८) सकाळी एक मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली. फुटपाथवर एका बास्केटमध्ये ठेवलेले नवजात अर्भक आढळून आले असून, त्यासोबत सापडलेल्या एका इंग्रजीतील भावनिक चिठ्ठीने संपूर्ण शहरात खळबळ उडवून दिली आहे.   आपल्या बाळाला सांभाळण्यास असमर्थ असल्याचे या चिठ्ठीतून पालकांनी म्हटले आहे. नेमके काय घडले? शनिवारी सकाळी तक्का परिसरातील नागरिकांना एका बास्केटमधून बाळाच्या रडण्याचा आवाज आला. त्यांनी आवाजाच्या दिशेने जाऊन पाहिले असता, त्यांना बास्केटमध्ये एक नवजात बाळ दिसले. नागरिकांनी क्षणाचाही विलंब न लावता तात्काळ पनवेल शहर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी बाळाला ताब्यात घेऊन उपचारासाठी पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. सध्या बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती रुग्णालय प्रशासनाने दिली आहे. चिठ्ठीतील भावनिक मजकूर समोर बास्केटमध्ये बाळासोबत एक इंग्रजीत लिहिलेली चिठ्ठी सापडली, ज्यामुळे या घटनेला एक भावनिक वळण मिळाले ...

इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला आहे. ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाचा भाग उद्ध्वस्त केला

इमेज
*जेरुसलेम/तेहरान : इराण आणि इस्रायलमधील संघर्ष तीव्र झाला आहे. ऑपरेशन रायझिंग लायन अंतर्गत इस्रायलने इराणवर हल्ला केला. या हल्ल्यात इस्रायलने इराणच्या मुख्य अणुऊर्जा प्रकल्पाचा भाग उद्ध्वस्त केला.*.    यानंतर शनिवारी पहाटे इराण आणि इस्रायलने एकमेकांवर पुन्हा हवाई हल्ले केले. इराणने या हल्ल्याला जोरदार प्रत्युत्तर देत इस्रायलवर १५० हून अधिक क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा केला आहे. आज पहाटे इस्रायलची दोन मोठी शहरे तेल अवीव आणि जेरुसलेममध्ये हवाई हल्ल्याचे सायरन वाजू लागले, त्यामुळे रहिवाशांनी आश्रयस्थानांकडे धाव घेतली. लष्कराने सांगितले की, त्यांची हवाई संरक्षण यंत्रणा कार्यरत असून इराणी क्षेपणास्त्रांना रोखण्याचा प्रयत्न करत आहे. गेल्या तासाभरात इराणमधून इस्रायलवर अनेक क्षेपणास्त्रे डागण्यात आली, त्यापैकी काहींना रोखण्यात यश आले आहे, असे लष्कराने सांगितले. इराणची राजधानी तेहरानमध्ये अनेक स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचे वृत्त आहे. दोन क्षेपणास्त्रे तेहरानच्या मेहराबाद विमानतळावर आदळली. या विमानतळावर लढाऊ विमाने आणि वाहतूक विमानांचा तळ आहे. स्फोटानंतर आगीचा भडका उडाल्याचे इर...