शेकडो भगिनींची माजी आमदार नरेंद्र पवार यांना राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी

माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यंदाही जपली 'सामाजिक रक्षाबंधना' ची संवेदना

शेकडो भगिनींची नरेंद्र पवार यांना राखी बांधण्यासाठी मोठी गर्दी
9
कल्याण : *प्रतिनिधी कल्याणी आगटे*
 
रक्षाबंधन बहीण आणि भावाच्या पवित्र नात्याची महती अधोरेखित करणारा आपल्या संस्कृतीतील एक प्रमूख सण.आजच्या या पवित्र सणाचे औचित्य साधत कल्याण पश्चिमेचे माजी आमदार नरेंद्र पवार यांनी यंदाही आपली सामूहिक रक्षाबंधनाची संवेदना जपल्याचे दिसून आले. 

पवार यांना राखी बांधण्यासाठी कल्याण पश्चिमेतील शेकडो महिला भगिनींनी त्यांच्या निवासस्थानी मोठी गर्दी केली होती. 
गेल्या कित्येक वर्षांपासून माजी आमदार नरेंद्र पवार यांच्या पुढाकाराने हा सामाजिक आणि सामुदायिक रक्षाबंधनाचा उपक्रम साजरा केला जात आहे. त्यामध्ये आता केवळ फरक इतकाच आहे की यापूर्वी तो मतदारसंघातील प्रत्येक प्रभागामध्ये जाऊन साजरा केला जायचा. आणि यंदा हा सोहळा पवार यांच्या निवासस्थानी साजरा झाला. मात्र त्यानंतरही त्याची व्याप्ती यत्किंचितही कमी झाली नाही. कल्याण पश्चिमेच्या विविध भागातील शेकडो महिला भगिनींनी मोठी गर्दी केली होती. ज्यामध्ये तरुणींपासून ते वयस्कर महिलांचाही समावेश होता. तसेच शांतीदूत गृहनिर्माण हौसिंग सोसायटीतील महिला वर्गानेही नरेंद्र पवार यांना राखी बांधण्यासाठी उपस्थिती दर्शवली. 
रक्षाबंधन हा भाऊ आणि बहिणीच्या पवित्र नात्याचा सण असला तरी माजी आमदार नरेंद्र पवार यांनी आपल्या संवेदनशील आणि सामाजिक जाणिवेतून या नात्याला एक नवा आयाम दिला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून सामुदायिक रक्षाबंधनाच्या सोहळ्यातून त्यांनी आजही शेकडो महिला भगिनींच्या रक्षणाचा वसा घेतला असल्याची प्रतिक्रिया या भगिनींनी व्यक्त केली.

विशेष म्हणजे यावेळी माजी उपमहापौर उपेक्षा भोईर, माजी नगरसेविका दमयंती वझे, माजी नगरसेविका मीनाक्षी डोईफोडे यांच्यासह पारनाका, टिळक चौक, आधारवाडी, फडके मैदान येथील भगिनीं, दूधनाका व बनेली येथील मुस्लिम भगिनीं,  बिर्ला कॉलेज येथील आदिवासी भगिनीं तसेच गुजराथी समाज आणि उत्तर भारतीय अशा विविध समाजाच्या शेकडो महिला भगिनींचा या रक्षाबंधन सोहळ्या मध्ये समावेश होता.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

राजमाता जिजाऊ, राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले, पहिल्या स्त्री शिक्षिका फातिमा शेख, त्यागमुर्ती माता रमाई यांचा संयुक्त जयंती महोत्सव संपन्न झाला.

विठ्ठल रुक्मिणी पतपेढी संस्था कल्याण ब्रांचचा मनमानी कारभार..

पुणे स्टेशनसमोरील दुकानाला आग; लाॅजमधील प्रवाशांची सुखरुप सुटका