अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ विमान कोसळून भीषण अपघात झाला होता. या विमानात एकूण २४२ जण प्रवास करत होते.
अहमदाबादमध्ये गुरुवारी एअर इंडियाचे बोईंग ७८७ ड्रीमलायनर एआय-१७१ विमान कोसळून भीषण अपघात झाला होता. या विमानात एकूण २४२ जण प्रवास करत होते. अहमदाबादवरुन लंडनला जाण्यासाठी उड्डाण घेतले असताना काही मिनिटांतच ते कोसळले. मात्र आता अहमदाबाद विमान अपघातातील मृतांची संख्या २७४ वर पोहोचली आहे. प्रवाशांव्यतिरिक्त स्थानिक लोकांचाही मृतांमध्ये समावेश आहे. अपघातस्थळी ढिगारा काढण्याचे काम अजूनही सुरू आहे. शुक्रवारी सकाळपर्यंत २६५ जणांचा मृ्त्यू झाल्याचे सांगण्यात येत होतं. मात्र आता हा आकडा वाढल्याने आणखी धक्का बसला आहे. गुजरातमधील अहमदाबाद विमानतळाजवळ गुरुवारी झालेल्या एअर इंडियाच्या विमान अपघातातील मृतांची संख्या २७४ वर पोहोचली आहे, तर स्थानिकांमध्ये ३३ जण मृत्यूमुखी पडले आहेत. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार शुक्रवारी विमानाचा ढिगारा बाहेर काढणाऱ्या बचाव पथकांना क्रॅश झालेल्या ७८७-८ ड्रीमलाइनर विमानाचा ब्लॅक बॉक्स आणि आणखी २९ मृतदेह सापडले. त्यामुळे...