बालनाट्य स्पर्धेत' पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालयाची 'पधारो म्हारे देस' अव्वल
बालनाट्य स्पर्धेत' पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालयाची 'पधारो म्हारे देस' अव्वल मुंबई: जेष्ठ नाट्य - चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत '३७व्या रविकिरण बालनाट्य स्पर्धेत' पार्ले टिळक मराठी माध्यम, विद्यालयाची 'पधारो म्हारे देस' अव्वल तर गुरुकुल द डे स्कूलच्या ऋग्वेद आमडेकर आणि डीएव्ही पब्लिक स्कुलच्या (नवीन पनवेल) दिक्षा शिलवंत यांना अभिनयाचे प्रथम पारितोषिक जेष्ठ नाट्य - चित्रपट समीक्षक कमलाकर नाडकर्णी स्मृतिगत 'रविकिरण मंडळाच्या ३७व्या बालनाट्य स्पर्धे'ची भव्य स्पर्धा नुकतीच मुंबईतील यशवंत नाट्यमंदिर येथे मोठ्या उत्साहात संपन्न झाली. या स्पर्धेत सर्वोत्कृष्ट बालनाट्याचे प्रथम क्रमांकाचे पारितोषिक, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शन, संगीत, प्रकाश - योजना तसेच अभिनय (मुलींमध्ये) तृतीय व अभिनय (मुलांमध्ये) उत्तेजनार्थ पारितोषके पटकावून अव्वल ठरली. यासोबत द्वितीय क्रमांक सेक्रेड हार्ट, हायस्कुलच्या 'को म की का' या बालनाट्यास तर तृतीय पुरस्कार आर्टिस्ट प्लानेट काळाचौकी शाळेच्या 'जा रे जा, सारे जा