आदिवासी कातकरी मुला मुलींची अनुदानित आश्रम शाळा मध्ये शालेय क्रीडा महोत्सव

आदिवासी कातकरी मुला- मुलींची अनुदानित आश्रम शाळा बाबरे येथे शालेय क्रीडा महोत्सव  संपन्न
( प्रतिनिधी शहापूर / ठाणे) 

      ए बी एम समाज प्रबोधन संस्था संचलित आदिवासी कातकरी मुला- मुलींची अनुदानित आश्रमशाळा बाबरे,ता. शहापूर, जि. ठाणे, येथे शालेय क्रीडा महोत्सव  मोठ्या आनंदात  उत्साहात  नुकताच संपन्न झाला.   
       या कार्यक्रमाचे उदघाटन किनव्हली  पोलीस स्टेशनचे पी. स.आय. संजय सुरळकर  यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाला किन्हवली पोलीस स्टेशनचे  मेजर पारधी  तसेच संस्थेच्या संचालिका शितल गायकवाड  , शाळेच्या माध्यमिक चेअरमन पुनम भडांगे ,  कार्यकारी चेअरमन संतोष पडवळ, पोलीस   जिल्हास्तरीय महिला दक्षता कमिटीच्या तसेच आश्रम शाळेच्या माध्यमिक मुख्याध्यापिका आशा नवनाथ  रणखांबे , प्राथमिक मुख्याध्यापक कपिल सातपुते तसेच  सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
          क्रीडा प्रमुख- संदीप भालके आणि विवेक पष्टे यांनी या महोत्सवाचे माध्यमिक मुख्याध्यापिका आशा रणखांबे यांच्या सर्व सुचनांनुसार  आणि मार्गदर्शनाने नियोजन करून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडला. इ . 1 ली ते इ .10 वी च्या सर्व विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर रित्या प्रत्येक सामन्यात भाग घेतला.  या महोत्सवाचे सूत्रसंचालन कविता खारीक  यांनी केले. तसेच  शालेय क्रीडा मोहत्सवात  पंच म्हणून कामकाज - सचिन उगले, हितेश पाटील ,भीमराव राऊत, संदीप पडवळ, शीतल सूर्यवंशी, जयश्री खंडवी, मयुरी घायवट यांनी  पाहिले तर  स्कोअरर  म्हणून कामकाज   योगिता जाधव यांनी   केले.
जनहित न्यूज महाराष्ट्र 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार