पोस्ट्स

बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. त्याने पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर तीन गोळ्या झाडून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. त्याने पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर तीन गोळ्या झाडून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.          ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून अक्षय शिंदे यानं तीन गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या आहेत. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. यावेळी त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यालादेखील गोळी लागली असून हा पोलीस कर्मचारी देखील गंभीररित्या जखमी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 17 ऑगस्टपासून अक्षय शिंदे हा तुरुंगात होता. नेमकं काय घडलं? बदलापूरमध्ये शिशु वर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच अत्याचार झाला. शाळेत कर्मचारी असलेला अक्षय शिंदे याला पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. मात्र या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले आणि २० ऑगस्ट रोजी शाळा परिसर तसेच रेल्वे स्टेशन मध्ये १० तास रेल रोको आंदोलन झाले. शेवटी या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली व फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालविण्याचे काम सुरु करण्यात आले. खटला सुरु असलेल्य