बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. त्याने पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर तीन गोळ्या झाडून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.

बदलापूरमध्ये दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचाराची घटना घडली होती. या प्रकरणातला मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा मृत्यू झाला आहे. त्याने पोलिसांच्या बंदुकीतून स्वतःवर तीन गोळ्या झाडून घेतल्याची सूत्रांची माहिती आहे.         ट्रान्झिट रिमांडसाठी नेत असताना एका पोलिसाची सर्व्हिस रिव्हॉल्वर हिसकावून अक्षय शिंदे यानं तीन गोळ्या स्वतःवर झाडून घेतल्या आहेत. यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे. यावेळी त्याला वाचवण्यासाठी पुढे आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्यालादेखील गोळी लागली असून हा पोलीस कर्मचारी देखील गंभीररित्या जखमी झाल्याची सूत्रांची माहिती आहे. 17 ऑगस्टपासून अक्षय शिंदे हा तुरुंगात होता.

नेमकं काय घडलं?

बदलापूरमध्ये शिशु वर्गात शिकणाऱ्या दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतच अत्याचार झाला. शाळेत कर्मचारी असलेला अक्षय शिंदे याला पोलिसांनी २४ तासांच्या आत अटक केली. मात्र या घटनेचे तीव्र पडसाद शहरात उमटले आणि २० ऑगस्ट रोजी शाळा परिसर तसेच रेल्वे स्टेशन मध्ये १० तास रेल रोको आंदोलन झाले. शेवटी या प्रकरणाची गंभीर दखल सरकारने घेतली व फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालविण्याचे काम सुरु करण्यात आले.

खटला सुरु असलेल्या कल्याण न्यायालयमध्ये एका विशिष्ठ रूममध्ये पीडित तीन आठवड्यांपूर्वी मुलींसमोर आरोपीची ओळख परेड पार पडली . विशेष म्हणजे नॉन रिफ्लेक्टेड काचेच्या माध्यमातून ही ओळख परेड झाल्याने पीडित मुलगी आरोपीला पाहू शकत होती, मात्र आरोपीला पीडित मुलगी दिसत नव्हती. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून ओळख परेड दरम्यान पुरेपूर दक्षता घेण्यात आली होती.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

उल्हासनगर मध्ये पुन्हा एकदा नवजात बच्चू ला जन्मताच शौचालय मध्ये फेकले

श्रीराम हाऊसिंग फायनान्स मधून लोन घेताय तर सावधान श्रीराम हाउसिंग फायनान्स आणि जे पी रेजन्सी यांनी महिलेची केली फसवणूक

"उचल" एकांकिकेला प्रथम क्रमांकाचा गोपीनाथ सावकार पुरस्कार