पोस्ट्स

किन्नरमित्र व महिलांसाठी आयोजित शिबिरात चित्राताई वाघ यांची उपस्थिती...अंबरनाथ शहर भारतीय जनता पार्टी तर्फे 25 जुलै रोजी आयोजित किन्नरमित्र व महिलांच्या आत्मसम्मान व स्वयंपूर्णते साठी रोजगार मार्गदर्शन व प्रशिक्षण शिबिर मध्ये महाराष्ट्र प्रदेश भाजपा नेत्या चित्राताई वाघ उपस्थित राहिल्या, व त्यानी मार्गदर्शन करुन प्रशस्तिपत्रक देऊन उपस्थित महिला व किन्नर मित्रांचे मनोबल वाढवले,सदर प्रसंगी हळदी कुंकु, ओटीभरण कार्यक्रम, महिलांना तुळशी वृंदावन अर्पण व राशन वाटप करण्यात आले,ह्या प्रसंगी महाराष्ट्राच्या सुपसिद्ध लावणी सम्राट विद्यासागर देडे यानी उपस्थितां समोर सुंदर लावणी प्रस्तुत करुन समा बांधला.

इमेज

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त जेष्ठ नागरिकांना मोफत छत्री वाटप. मोहोने कोळीवाडा प्रभाग क्रमांक १४ मधीलवसुमारे १५० जेष्ठ नागरिकांना .. शिवसेना मोहाने शाखेचे शिवसैनिक रोहन पांडुरंग कोट . यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसा निमित्त मोफत छत्री वाटप करण्यात आले

इमेज

रस्त्यावरील खड्डे बुजविण्यासाठी नागरिक सरसावले पुढे कल्याण मधील अंबिवली मोहोने बाजारपेठ या ठिकाणी रस्त्यावर खड्डे पडल्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता तसेच दुचाकी वाहन चालवताना दुचाकीचे चाक खड्ड्यात अडकून अपघात होण्याची शक्यता असल्याचे लक्षात घेऊन मोहोने अंबिवली शिवसेने शाखेतील तरुणांनी तसेच नागरिकांनी मोहोने अंबिवली रस्त्यावर पडलेले खड्डे बुजविण्यासाठी पुढाकार घेतला व सर्वांनी रस्त्यावरील खड्डे बुजविले

इमेज

अनुप्रिता मोरे यांना राजमाता जिजाऊ रत्न पुरस्काराने केले सन्मानित राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर यांच्या वतीने दिनांक 23 जुलै 2021 रोजी. ऑनलाइन कार्यक्रमात अनुप्रिता जाईबाई मोरे यांना सामाजिक शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात चांगल्या प्रकारे काम करीत असल्याने बीड येथील अनुप्रिता जाईबाई मोरे यांनी वृत्तपत्राच्या माध्यमातून दलित कष्टकरी आणि वंचितांचा आवाज बुलंद करण्याच्या उद्देशासह साहित्यसंमेलन व्याखाने परिषदा आणि समाजोपयोगी काम केल्याची दखल घेत राजमाता बहुउद्देशीय सेवाभावी संस्था लातूर चे संस्थापक अध्यक्ष बालाजी जाधव यांनी हा पुरस्कार दिला आहे .हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव आणि कौतुक यावेळी करण्यात आले

इमेज

जीवन संघर्ष पुस्तकावर विश्वविक्रमाची ऐतिहासिक मोहर सन्मानित कवी लेखक नवनाथ रणखांबे लिखित शारदा प्रकाशनाने प्रकाशित केलेले "जीवन संघर्ष" पुस्तक, हे त्यांचे पहिलेच पुस्तक असून ते तुफान गाजले आहे. जीवन संघर्ष पुस्तकावरील १७७ परिक्षणांची नोंद ओ एम जी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२१ मध्ये झाली आहे. मराठी साहित्य क्षेत्रात एक अनोखे ऐतिहासिक विश्व रेकॉर्ड निर्माण झाले आहे. डॉ . दिनेश गुप्ता ( सईओ आणि चिफ एडिटर ओ एम जी बुक ऑफ रेकॉर्ड ) यांच्या हस्ते जीवन संघर्षकार नवनाथ रणखांबे यांना ओ एम जी बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड २०२१ ने सन्मानित करण्यात आले आहे

इमेज

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढ दिवसा निमित्त अंबरनाथ चे नगरसेवक सुभाष साळुंके यांच्या वतीने मोफत छत्री वाटपशिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्रीउद्धव ठाकरेयांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रम आयोजित करण्यात आलेअंबरनाथ येथील वडवली विभाग,कृष्णनगर,ताडवाडी,राणे चाळ, वॉर्ड क्र.४४ व ४५ परिसरातील ज्येष्ट नागरीक, महिला, घरकाम करणाऱ्या महिला यांना चांगल्या दर्जाच्या ५०० छत्र्याचे मोफत वाटप संवाद व शिवसंवाद जनसंपर्क कार्यालयात करण्यात आलेतत्पूर्वी तळीये दरड दुर्घटना, कोकण व पश्चिम महाराष्ट्र मध्ये झालेल्या अस्मानी संकटामुळे मृत्युमुखी पडलेल्या निष्पाप नागरीकांना तसेच महाडचे माजी आमदार स्व. माणिकराव जगताप यांना सामुहिक भावपूर्ण श्रद्धांजली वाहण्यात आली

इमेज

अस्वस्थतेला वाट मोकळी करून रंगकर्मींनी घेतला आंदोलनाचा पवित्रा शासन दरबारी आपल्या मागण्या सादर करणार. करोना महामारीची झळ आज सर्वांनाच बसली आहे. मनोरंजन क्षेत्र ही याला अपवाद नाही. गेले दीड वर्ष करोनाची लढाई संयमाने लढल्यानंतर आता रंगकर्मींचा धीर सुटत चालला आहे. हाताला काम नसल्याने सर्व रंगकर्मी अस्वस्थ आहेत. आपल्या या अस्वस्थतेला वाट मोकळी करून देत आंदोलनाचा पवित्रा सर्व रंगकर्मीनी घेतला असून शासन दरबारी आपल्या मागण्या ते सादर करणार आहेत. या आंदोलनाची दिशा कशी असेल? रंगकर्मीच्या नेमक्या मागण्या काय आहेत? यासाठी नुकत्याच पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. अभिनेते विजय पाटकर, विजय गोखले, दिग्दर्शक विजय राणे, संचित यादव, मेघा घाडगे, शीतल माने, चंद्रशेखर सांडवे, हरी पाटणकर, सुभाष जाधव, प्रमोद मोहिते आदि मान्यवर मंडळी तसेच संघटक व सहसंघटक यांच्या उपस्थितीत ही परिषद संपन्न झाली. यावेळी रंगकर्मींच्या मनातील अस्वस्थता व्यक्त झाली. व त्यांच्या मागण्यांचा आढावा घेण्यात आला. रंगकर्मींचे झालेले हाल लक्षात घेऊन आमच्या या मागण्यांची शासनाने अवश्य दखल घ्यावी व आवश्यक ते सर्व सहकार्य करावे असे प्रतिपादन उपस्थित सर्वांनी यावेळी केले. सिनेमा, मालिका, नाटक क्षेत्रातील कलाकार तंत्रज्ञांसोबतच तमाशा, भजन, कीर्तन, भारुड, गोंधळ, जागरण, पोवाडा, लावणी, दशावतार, डोंबारी, लेझीम, वासुदेव, पोतराज, नंदीबैल, पिंगुळा, भराड इ.लोककला सादर करणाऱ्या तसेच वाद्यवृंद क्षेत्रातील कलाकारांचाही या आंदोलनात समावेश असणार आहे.या पत्रकार परिषदेत करण्यात आलेल्या मागण्या पुढील प्रमाणे आहेत.*करोना काळातील मागण्या* १.एकपात्री किंवा दोन-तीन लोकांच्या मदतीने सोसायटीच्या आवारात, मोकळ्या जागेत, पटांगणात सादर होणाऱ्या कलांना तात्काळ परवानगी मिळावी. २. फी न भरल्यामुळे रंगकर्मीच्या मुलांना शाळेतून काढून टाकण्यात आले आहे. तात्काळ संबंधित शिक्षण संस्थांशी बोलून हा प्रश्र्न निकाली काढावा. ३. गेल्या दीड वर्षात काम नसल्याने कमाई झालेली नाही. त्यामुळे घरभाडे आणि इलेक्ट्रीसिटी बिल भरण्यास अडचण होत आहे. आपल्या अखत्यारीत असलेल्या संबंधित आस्थापनांना आपण आदेश देऊन रंगकर्मींना सवलत मिळवून द्यावी ही विनंती. ४. अटी नियमांचे पालन करून आम्हां रंगकर्मींना आमची कला सादर करण्याची परवानगी द्यावी. ५. काही प्रमाणात चित्रीकरण सुरु झाले आहे परंतु लोकल प्रवासाची मुभा नसल्यामुळे मिळणारे उत्पन्न आणि खर्च तसेच वेळेचा ताळमेळ घालणे कठीण झाले आहे, त्यामुळे शुटिंग चालू असलेल्या कलाकार-तंत्रज्ञांना लोकल प्रवासाची परवानगी मिळावी. ६. महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींसाठी 'रंगकर्मी रोजगार हमी योजना' लागू करावी. ७. कोरोना काळातील परिस्थिती पूर्ववत होईपर्यंत महाराष्ट्रातील सर्व रंगकर्मींना दरमहा रुपये ५,०००/- इतका उदरनिर्वाह भत्ता मिळावा.*कायमस्वरूपी मागण्या*१. महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात विखुरलेल्या रंगकर्मींची शासन दरबारी नोंद व्हावी. २. कलाकार पेन्शन योजनेचा लाभ घेण्यासाठी असलेल्या अटीं मध्ये शिथिलता आणावी. तसेच मानधनाच्या आकड्यात वाढ करावी. ३. रंगकर्मी हा असंघटित आहे. माथाडी कामगार बोर्डाच्या धर्तीवर 'रंगकर्मी बोर्डा' ची स्थापना करावी. ४. मुंबईत कला सादर करण्यासाठी येणाऱ्या रंगकर्मींना भाडे तत्वावर देण्यासाठी शासनातर्फे बांधण्यात येणाऱ्या निवासी गाळ्यांमध्ये प्राधान्याने व सवलतीच्या दरात सोय करण्यात यावी. तसेच जिल्ह्याच्या ठिकाणी रंगकर्मींना विश्रांतीगृहांमध्ये राहण्याची सोय असावी. ५. शासनातर्फे रंगकर्मीं साठी राखीव ठेवलेल्या म्हाडा व सिडको च्या घरांसाठीच्या संख्येत ५% वाढ करावी. ६. निराधार, वयोवृद्ध रंगकर्मींची शासकीय आणि खासगी वृद्धाश्रमात प्राधान्याने व्यवस्था करावी. सोबत त्यांची जबाबदारी शासनाने घ्यावी. ७. महाराष्ट्रातील सरकारी तसेच नगरपालिका / जिल्हा परिषद हॉस्पिटल्स मध्ये रंगकर्मींसाठी राखीव बेड असावेत . अशी मागणी रंगकर्मी संघटनांनी केली आहे अशी माहिती हरि पाटणकर यांनी दिली

इमेज