पोस्ट्स

अल्याड पल्याड चित्रपटाला प्रेक्षकांची दाद

इमेज
अल्याड पल्याड चित्रपटाला प्रेक्षकांची दाद प्रतिनिधी गणेश तळेकर  अनेक चांगल्या कलाकृतींना प्रेक्षकांनी नेहमीच उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या ‘अल्याड पल्याड’ या मराठी चित्रपटालाही मान्यवरांच्या आणि प्रेक्षकांच्या पसंतीचा कौल मिळाला आहे. लहानांसोबत मोठ्यांनाही हा सिनेमा चांगलाच भावतोय. मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, ओरंगाबाद, कोल्हापूर या शहरांतून चित्रपटाला भरघोस प्रतिसाद मिळत आहे. २०० हून अधिक चित्रपटगृहांतून प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाबाबत सगळ्या वर्गामध्ये उत्सुकता पहायला मिळतेय प्रसार माध्यमांतूनही चित्रपटाविषयी उत्सुकता होती आणि प्रदर्शनानंतरही बातम्या, समीक्षणांतून कौतुकाचा वर्षाव होतोय. रहस्य, थरार आणि सोबत मनोरंजन असं पॅकेज मराठीत अभावानेच पाहायला मिळतं. ‘अल्याड पल्याड’ च्या निमित्ताने एक वेगळा चित्रपट पाहायला मिळाल्याचं समाधान प्रेक्षक व्यक्त करताहेत.   आयुष्यात घडणाऱ्या काही चमत्कारिक गोष्टी आणि त्यांचा मागोवा घेताना निर्माण होणारे रहस्य याचा थरारक अनुभव देणारा एस. एम.पी प्रोडक्शनचा ‘अल्याड पल्याड’ ह...

दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई

इमेज
दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई प्रतिनिधी गणेश तळेकर  विरक्ती, ज्ञान, भक्ती आणि मुक्ती यांचे मूर्तिमंत स्वरूप घेऊन निवृत्ती, ज्ञानदेव, सोपान, मुक्ता जन्माला आली. साक्षात दिव्यत्वाची ही चार रूपे रुक्मिणी अन विठ्ठलपंतांचे मातृ-पितृत्व धन्य करणारी !  शिव तो निवृत्ती । विष्णू ज्ञानदेव पाही । सोपान तो ब्रह्मा । मूळ माया मुक्ताई ।।  असे या भावंडांचे वर्णन संत कान्होपात्रांनी केलंय. या भावंडांच्या संतपणाची महती सांगत मुक्ताईच्या दृष्टीकोनातून संत ज्ञानेश्वरांच्या दिव्य कुटुंबाची भेट घडवणारा दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित ‘संत ज्ञानेश्वरांची मुक्ताई’ हा भव्य आध्यात्मिक मराठी चित्रपट २ ऑगस्टला आपल्या भेटीला येतोय. दिव्य अनुभवाची प्रचिती देणाऱ्या या चित्रपटाची पहिली झलक नुकतीच प्रदर्शित झाली आहे. चित्रपटात बालपणीच्या संत ज्ञानेश्वरांच्या भूमिकेत मानस बेडेकर, मुक्ताईच्या भूमिकेत ईश्मिता जोशी तर निवृत्तीच्या भूमिकेत साहिल धर्माधिकारी आणि सोपानच्या भूमिकेत अभीर गोरे आहे.    महिला संतमालिकेत मुक्ताबाई यांचा जीवनसंघर्ष आणि...

अनुष्काने घेतलं ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण

इमेज
अनुष्काने घेतलं ट्रॅक्टर चालविण्याचे प्रशिक्षण अनुष्का  चालवतेय  ट्रॅक्टर प्रतिनिधी गणेश तळेकर  आपल्याला विविधांगी आणि आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळावी असं प्रत्येक कलाकाराला वाटत असतं.त्यामुळे अशा भूमिकांची ऑफर आली की कलाकारांचा उत्साह व्दिगुणीत होतो. त्या भूमिकेचं सोनं करण्यासाठी कलाकार वाट्टेल ती मेहनत घेतो. आता हेच बघा ना...‘सोनी मराठी’ वाहिनीवरील ‘भूमिकन्या- साद घालते निसर्गराजा’ या मालिकेत मध्यवर्ती भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री अनुष्का बोऱ्हाडेने मालिकेतल्या भूमिकेची गरज म्हणून ट्रॅक्टर चालवण्याचे  प्रशिक्षण घेतले.   मुख्य अन्नदाता म्हणून ज्याची ओळख आपल्याला आहे तो म्हणजे आपला बळीराजा. 'भूमिकन्या' ही मालिका एका सामान्य शेतकऱ्याच्या आयुष्यावर आधारित आहे. मालिकेत अनुष्का लक्ष्मीच्या भूमिकेत असून लक्ष्मी ही कर्तव्य आणि प्रेम यांचा समन्वय साधत कणखर ‘भूमिकन्या’म्हणून आपल्या वडिलांच्या पाठीशी कशी खंबीरपणे उभी राहते ? याची रंजक कथा ‘भूमिकन्या -साद घालते निसर्गराजा’या मालिकेत आहे.    भूमिकेची गरज म्हणून  ट्रॅक्टर कसा चालवा...

बोलायचं राहून गेलं' या मराठी चित्रपटाची घोषणा

इमेज
' बोलायचं राहून गेलं' या मराठी चित्रपटाची घोषणा प्रतिनिधी गणेश तळेकर   आजवर प्रेमकथांवर आधारलेल्या बऱ्याच चित्रपटांनी रसिकांचं मनोरंजन करण्यात यश मिळवलं आहे. रसिकांची आवड ओळखून लेखक-दिग्दर्शकांनीही गुलाबी प्रेमाचे वेगवेगळे पैलू रुपेरी पडद्यावर सादर केले आहेत. तरीही प्रेमाची गोडी तसूभरही कमी झालेली नाही. प्रेमाच्या अप्रकाशित पैलूंवर आधारलेल्या एका नवीन चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. 'बोलायचं राहून गेलं' या चित्रपटात प्रेक्षकांना एक अजब-गजब प्रेमकहाणी पाहायला मिळणार आहे. जिजा फिल्म्सची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे निर्माते अभिषेक उत्कर्ष कोळी आणि सुरेश मगनलाल प्रजापती आहेत. निर्मितीसोबतच कथा, पटकथा लेखन आणि दिग्दर्शनाची जबाबदारीही अभिषेक उत्कर्ष कोळी यांनी सांभाळली आहे. नुकताच या चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. याप्रसंगी निर्माते, दिग्दर्शक, कलाकारांसोबत तंत्रज्ञही उपस्थित होते. या चित्रपटात अभिषेक कोळी एक अनोखी लव्ह स्टोरी सादर करणार असल्याचं 'बोलायचं राहून गेलं' या शीर्षकावरून सहज लक्षात येतं. इतर प्रेमकथांपेक्षा हा चित्रपट व...

अष्टपदी' चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोल्हापूरमध्ये सुरूवात

इमेज
अष्टपदी' चित्रपटाच्या चित्रीकरणाला कोल्हापूरमध्ये सुरूवात ... खासदार छत्रपती शाहू महाराज यांच्या उपस्थितीत पार पडला मुहूर्त... प्रतिनिधी गणेश तळेकर   अष्टपदी' या आगामी मराठी चित्रपटाच्या चित्रीकरणाला नुकतीच सुरुवात करण्यात आली आहे. अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी 'अष्टपदी' चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला होता. तेव्हापासून अनोख्या शीर्षकामुळे या चित्रपटाबाबत कुतूहल वाढलं आहे. चित्रपटात नेमकं काय पाहायला मिळणार आणि यात कोणकोणते कलाकार झळकणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. आजवर गुलदस्त्यात असलेल्या गोष्टी हळूहळू बाहेर येऊ लागल्या आहेत. निर्माते उत्कर्ष जैन आणि महेंद्र पाटील यांनी महश्री प्रॉडक्शन आणि युवराज सिने क्रिएशनच्या बॅनरखाली 'अष्टपदी' चित्रपटाची निर्मिती करीत आहेत. उत्कर्ष जैन या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. श्रीगणेश गीताच्या रेकॅार्डिंगने 'अष्टपदी'चा मुहूर्त झाल्यानंतर सध्या या चित्रपटाची संपूर्ण टिम कोल्हापूर मुक्कामी आहे. कोल्हापूरमध्ये चित्रीकरण सुरू करण्यापूर्वी खासदार छत्रपती शाहू महाराज, ज्येष्ठ कलादिग्दर्शक संतोष फुटाणे य...

पुण्यामध्ये सुरक्षा भिंत कोसळली दोन जनांचा मृत्यु तीन जन जखमी

इमेज
पुण्यामध्ये सुरक्षा भिंत कोसळली दोन जनांचा मृत्यु तीन जन जखमी पुणे:डिंग्रजवाडी (ता. शिरूर) येथील आयटीडब्ल्यू कंपनीसमोर असलेली 15 फूट उंचीची भिंत कोसळून भिंतीशेजारी उभ्या असलेल्या एका कामगाराचा जागीच, तर दुसर्‍याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.            या दुर्घटनेत आणखी तीन जण जखमी झाल्याची प्राथमिक मिळाली असून, तेथे उभ्या असलेल्या 1 चारचाकी, 1 बस, 9 दुचाकी व 2 सायकलींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. मृत्युमुखी पडलेल्यांची नावे राजीव कुमार व मंजित कुमार अशी असून, बंडू विधाटे, विजय गायकवाड आणि सतीश कानगुडे हे जखमी झाले आहेत. ही दुर्घटना बुधवारी (दि. 19) सकाळी साडेआठच्या सुमारास घडली. काही कामगार दुचाकींजवळ असताना अचानकपणे कंपनीसमोरील सुरक्षा भिंत कोसळली. पाच कामगार भिंतीखाली दबले गेले. काही कामगारांनी त्यांना बाहेर काढले. दरम्यान घटनेची माहिती मिळताच पोलिस उपनिरीक्षक महेश डोंगरे, पोलिस हवालदार आत्माराम तळोले, प्रतिक जगताप आदींनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात हलवले. परंतु उपचारापूर्वी राजीव कुमार यांचा मृत्यू झाला, तर उपचारादरम्यान मंजीत कु...

ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याबाबत जबरदस्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.

इमेज
ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याबाबत जबरदस्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.   पुणे : 'ख्रिस्ती धर्म स्वीकारला तर, तुमचे आयुष्य चांगले जाईल. तुमच्या सगळ्या व्याधी दुर होतील. गीतेचे वाचन करण्यापेक्षा बायबलचे वाचन करा.' असे म्हणत घरात घुसून हातामध्ये बायबल ठेवत ख्रिस्ती धर्म स्वीकारण्याबाबत जबरदस्ती करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे.                  या धर्म प्रचारकांनी मुर्ती पुजा करु नका असे सांगत धार्मिक भावना दुखावल्याप्रकरणी चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार शनिवारी सकाळी साडेदहाच्या सुमारास विडी कामगार वसाहतीमध्ये घडला.  याप्रकरणी प्रेरणा दिलीप भंडारी (वय २५, रा. शनी मंदिराशेजारी, विडी कामगार वसाहत, चंदननगर) यांनी फिर्याद दिली आहे. याप्रकरणी रिना रामदास मनसा (वय ५०, रा. गंगापुरम सोसायटी, दोराबजी मॉल समोर, विमाननगर), एलिसा रमेश आल्फ्रेड् (वय ७०, रा. साईकृपा सोसायटी, वडगाव शेरी), रिबेका अनुराज सिगामनी (वय ४८, रा. बालाजी उद्यमनगर, वडगाव शेरी), शारदा जगदिश सोदे (रा. ओम गंगोत्री सोसायटी, ...